शनि कुंभ राशीत करणार गोचर, या राशींवर होणार परिणाम

shani gochar 2023 will start sadesati on 3 zodiac signs and will end from 3 zodiac signs saturn transit read in marathi : न्यायदेवता शनि देव 17 जानेवारी 2023 रोजी मकर राशीतून बाहेर पडून कुंभ राशीत प्रवेश करतील. कुंभ राशीतील शनि महाराज यांच्या प्रवेशामुळे काही राशींच्या नागरिकांच्या आयुष्यावर मोठा परिणाम होणार आहे.

shani gochar 2023 saturn transit
शनि कुंभ राशीत करणार गोचर, या राशींवर होणार परिणाम  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • शनि कुंभ राशीत करणार गोचर, या राशींवर होणार परिणाम
  • शनि 17 जानेवारी 2023 रोजी मकर राशीतून बाहेर पडून कुंभ राशीत प्रवेश करेल
  • शनि कुंभ राशीत गोचर करेल

shani gochar 2023 will start sadesati on 3 zodiac signs and will end from 3 zodiac signs saturn transit read in marathi : न्यायदेवता शनि देव 17 जानेवारी 2023 रोजी मकर राशीतून बाहेर पडून कुंभ राशीत प्रवेश करतील. कुंभ राशीतील शनि महाराज यांच्या प्रवेशामुळे काही राशींच्या नागरिकांच्या आयुष्यावर मोठा परिणाम होणार आहे. शनि कुंभ राशीत गोचर करेल. यामुळे धनु रास साडेसातीच्या फेऱ्यातून मुक्त होईल. मिथुन आणि तुळ रास शनि ढय्येतून मुक्त होईल. याचवेळी कुंभ राशीच्या साडेसातीच्या फेऱ्याचा दुसरा टप्पा सुरू होईल. मीन राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होईल. मकर राशीची साडेसाती 29 मार्च 2025 रोजी संपेल.

भारतीयांना 719 रुपयांत मिळेल ट्विटरची ब्ल्यू टिक

T20 वर्ल्डकप : भारताच्या पराभवाने ICCला मोठा फटका

'शनि गोचर'चा राशींवर होणार असलेला परिणाम

  1. मिथुन : ज्योतिषशास्त्रानुसार 17 जानेवारी 2023 रोजी शनि मकर राशीतून बाहेर पडून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. शनि कुंभ राशीत गोचर करणार आहे. यामुळे मिथुन रास शनि ढय्येतून मुक्त होणार आहे. मिथुन राशीच्या नागरिकांची रखडलेली कामं पूर्ण होतील. कामातील अडचणी दूर होतील. शनि पीडेपासून सुटका होईल. प्रगती होईल.
  2. तुळ : ज्योतिषशास्त्रानुसार 17 जानेवारी 2023 रोजी शनि कुंभ राशीत गोचर करणार आहे. यामुळे तुळ रास शनि ढय्येच्या त्रासातून मुक्त होणार आहे. तब्येतीत सुधारणा होईल. प्रगती होईल. उत्पन्न वाढेल.
  3. धनु : ज्योतिषशास्त्रानुसार 17 जानेवारी 2023 रोजी शनि कुंभ राशीत गोचर करणार आहे. यामुळे धनु राशीच्या नागरिकांची साडेसातीच्या फेऱ्यातून मुक्तता होईल. सध्या धनु राशीचा साडेसातीचा अंतिम टप्पा सुरू आहे. हा टप्पा पूर्ण होईल. शनि महाराज जाता जाता दिलासा देतील.
  4. कुंभ : ज्योतिषशास्त्रानुसार 17 जानेवारी 2023 रोजी शनि कुंभ राशीत गोचर करणार आहे. कुंभ राशीच्या साडेसातीच्या फेऱ्याचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. हा त्रासदायक टप्पा आहे. शनि पीडेचा त्रास होईल. शारीरिक, मानसिक अडचणींना सामोरे जावे लागेल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. संयम राखणे, सावध राहणे, तब्येत जपणे, कायदे-नियम यांचे पालन करणे आणि वाद टाळणे हिताचे आहे. रागावर नियंत्रण ठेवणे आणि शब्दांचा जपून वापर करणे फायद्याचे आहे.
  5. मकर : ज्योतिषशास्त्रानुसार 17 जानेवारी 2023 रोजी शनि मकर राशीतून बाहेर पडून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. शनि कुंभ राशीत गोचर करणार आहे. मकर राशीची साडेसाती 29 मार्च 2025 रोजी संपेल. साडेसातीच्या काळात संयम राखणे, सावध राहणे, तब्येत जपणे, कायदे-नियम यांचे पालन करणे, वाद टाळणे, रागावर नियंत्रण ठेवणे आणि शब्दांचा जपून वापर करणे हिताचे आहे.
  6. मीन : ज्योतिषशास्त्रानुसार 17 जानेवारी 2023 रोजी शनि मकर राशीतून बाहेर पडून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. शनि कुंभ राशीत गोचर करणार आहे. मीन राशीची साडेसाती 17 एप्रिल 2030 रोजी संपेल. साडेसातीच्या काळात संयम राखणे, सावध राहणे, तब्येत जपणे, कायदे-नियम यांचे पालन करणे, वाद टाळणे, रागावर नियंत्रण ठेवणे आणि शब्दांचा जपून वापर करणे हिताचे आहे.

शनि देवता प्रसन्न व्हावी आणि शनि पीडेचा कमीत कमी त्रास व्हावा यासाठी यथाशक्ति दान करावे. शनि मंत्र आणि शनि चालीसा यांचे पठण करावे. दर शनिवारी शनि आणि हनुमान (मारुती) या दोन देवतांचे दर्शन घ्यावे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी