Shani transit in Capricorn: सर्व ग्रहांचा प्रभाव कधी ना कधी राशीवर पडत असतो. शनी ग्रहाला न्यायदेवता म्हटले जाते. शनिदेवाला फक्त मनुष्यच नव्हे तर देवताही घाबरत असतात. शनिदे आपल्या भक्तांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. पाप करणार्या माणसांना शिक्षा दिली जाते तर पुण्य करणार्या मनुष्यांना त्याचे फळ दिले जाते. शनिदेव सध्या कुंभ राशीत आहे. परंतु १२ जुलै रोजी हा शनी मकर राशीत प्रवेश करणार आहे. शनी गोचर म्हणजेच शनीच्या राशी परिवर्तनामुळे काही राशींवर प्रभाव पडणार आहे. शनी गोचरमुळे तीन राशीच्या लोकांचे नशीब बदलणार आहे. तसेच या शनी गोचरमुळे काही राशींच्या लोकांना संकटाचा सामना करावा लागणार आहे.
शनिदेवाच्या मकर राशीत प्रवेश केल्यामुळे धनु, मकर आणि कुंभ राशीवरील शनीची साडेसाती संपणार आहे. तर मिथून आणि तुळ राशीच्या लोकांवर संकट वाढणार आहे. या काळात मिथून आणि तुळ राशीच्या लोकांना काही समस्या जाणवतील तसेच आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण शनीचे संकट आणि साडेसाती हा कठीण काळ मानला जातो. असे असले तरी मिथून आणि तुळ राशीच्या लोकांना आपल्या मेहनतीचे फळही मिळेल.
शनी ग्रहाची मकर राशीत परिवर्तनामुळे वृषभ राशीच्य लोकांना चांगले दिवस येणार आहेत. नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल. थांबलेली किंवा अडकेलेली कामे पूर्ण होती. नोकरी शोधत असाल लवकरच मनासारखी नोकरी मिळेल. इतकेच नाही तर नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन आणि पगार वाढ होईल. उद्योजकांना व्यापारात यश मिळेल. शनी गोचरमुळे वृषभ राशी लोकांना खूप फायदा होणार आहे.
शनी गोचरमुळे मकर राशीच्या लोकांना धन लाभ होण्याची शक्यता आहे. कर्जमुक्ती होऊन सर्व आर्थिक संकटं दूर होणार आहेत. नोकरी व्यापारात उत्पन्न वाढणार आहे. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ आहे.
शनीदेवाच्या मकर राशीत प्रवेशामुळे मीन राशीच्य लोकांनाही फायदा होणार आहे. मीन राशीच्या लोकांना शनी गोचरमुळे धनलाब होणार आहे. तसेच उत्पन्नाचे नवे मार्ग निर्माण होणार आहेत. व्यवसायात यश मिळेल तसेच विद्यार्थ्यांना आगामी परीक्षेत यश लाभेल. करीअर मार्गी लागेल.