शनि ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार, संपणार ३ राशींची महादशा

shani transit in kumbh rashi 2023 these zodiac sign get relief : शनि ग्रह सध्या मकर राशीत गोचर करत आहे. आता शनि ग्रह १७ जानेवारी २०२३ रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. वक्री चाल सुरू असल्यामुळे शनिचे मकर राशीतले गोचर सुरू आहे.

shani transit in kumbh rashi 2023 these zodiac sign get relief
शनि ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार, संपणार ३ राशींची महादशा 
थोडं पण कामाचं
  • शनि ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार, संपणार ३ राशींची महादशा
  • ज्योतिषशास्त्रानुसार शनि ग्रहाची महती
  • गोचर काळ

shani transit : शनि ग्रह सध्या मकर राशीत गोचर करत आहे. आता शनि ग्रह १७ जानेवारी २०२३ रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. वक्री चाल सुरू असल्यामुळे शनिचे मकर राशीतले गोचर सुरू आहे. ( shani transit in kumbh rashi 2023 these zodiac sign get relief )

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

  1. शनि ग्रहाच्या सध्याच्या स्थितीमुळे निवडक राशींना फायदा होईल तर निवडक राशींना तोटा होईल. शनि ग्रहाने मकर राशीत प्रवेश केल्यापासून मिथुन, तुळ आणि धनु राशीच्या नागरिकांना त्रासांना सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती १७ जानेवारी २०२३ रोजी संपणार आहे.
  2. शनि ग्रहाने कुंभ राशीत प्रवेश करताच मिथुन, तुळ आणि धनु राशीच्या नागरिकांचे त्रास दूर होतील. त्यांची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. त्यांच्या आयुष्यातील नकारात्मकता कमी होईल आणि सकारात्मकता वाढेल. उत्पन्न वाढेल, कौतुक होईल, बढती मिळेल, प्रगती होईल.
  3. शनि ग्रहाने कुंभ राशीत प्रवेश करताच कर्क, वृश्चिक आणि मीन राशीच्या नागरिकांच्या त्रासात वाढ होईल. 
  4. ज्यांना शनि ग्रहाच्या महादशेचा त्रास होत आहे. शनिची पीडा आहे ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः या मंत्राचा दररोज जास्तीत जास्त वेळा जप करावा. 

ज्योतिषशास्त्रानुसार शनि ग्रहाची महती

शनिच्या दशा, अंतर्दशा आणि महादशा यामध्ये कर्मांनुसार फळ प्राप्त होते. शनीची महादशा १९ वर्षाची आहे. शनिची दशा ही अडीच वर्षे आणि परिणाम साडेसात वर्षे दिसून येतो. म्हणून जेव्हा एकाद्या व्यक्तीच्या जन्मराशीत आणि त्या राशीच्या अलीकडील-पलीकडील राशीत शनि असतो तेव्हा त्या व्यक्तीस साडेसाती आहे असे म्हणतात. (आकाशातला शनि हा ग्रह एका राशीत अडीच वर्षे असतो. मध्यंतरीच्या काळात वक्री झाला नसता तर त्याच राशीत ३० वर्षांनी आला असता. मात्र आकाशस्थ शनि अनेकदा वक्री होतो(म्हणजे मागच्या राशीत जातो), आणि त्यानंतर साधारणपणे १३५ दिवसांनी मार्गी होतो.) हा न्यायप्रिय ग्रह आहे. व्यक्तीच्या कर्मानुसार त्याला साडेसातीचे फळ मिळते. काळा रंग हा शनिला प्रिय आहे असे म्हणतात. ज्योतिषशास्त्रातील कल्पनेनुसार शनि हा रवीचा म्हणजेच सूर्याचा पुत्र आहे. शनिचे कारकत्त्व यश, ऐश्वर्य, दीर्घ आयुष्य आणि चिंतनशक्ति यात आहे. हे स्थानानुसार आणि भावानुसार बदलते. याचे वाहन कावळा आहे.

गोचर काळ

प्रत्येक ग्रह/तारा/नक्षत्र प्रत्येक राशीत विशिष्ट कालावधीसाठी असतो. यालाच संबंधित ग्रहाचे/ताऱ्याचे/नक्षत्राचे त्या त्या राशीतले गोचर म्हणून ओळखले जाते. सूर्य, शुक्र, बुध प्रत्येक राशीत एक महिना तर चंद्र प्रत्येक राशीत सव्वा दोन दिवस गोचर करतो. मंगळ प्रत्येक राशीत ५७ दिवस तर गुरु प्रत्येक राशीत एक वर्ष गोचर करतो. राहू आणि केतू प्रत्येक राशीत दीड वर्ष तर शनि (शनी) प्रत्येक राशीत अडीच वर्ष गोचर करतो.

डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाउ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू  इच्छीत नाही, पण ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे ते अधिक महितीसाठी तज्ज्ञांची मदत घेऊ शकतात. टाइम्स नाउ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी