मुंबई : शनीदेवाने बुधवार 15 मार्चपासून शतभिषा म्हणजेच राहुच्या नक्षत्रात प्रवेश केला आहे. शनीदेव या नक्षत्रात 7 ऑक्टोबरपर्यंत राहणार आहेत. शनीदेवाच्या या प्रवेशाने राशीचक्रातील 6 राशींचे भविष्य चमकणार आहे. पुढील 7 महिने पर्यंत या राशींना आर्थिकची प्रगती होणार असल्याचं ज्योतिष म्हणणं आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या राशींना शनीदेवाच्या प्रवेशाचा फायदा होणार आहे. (Shani's entry into Rahu's Nakshatra;6 signs Financial crisis will be removed)
अधिक वाचा : पांढरे आणि चमकदार दातांसाठी करा हे उपाय
या राशीतील लोकांना हा काळ खूप चांगला आहे. नवीन व्यवसाय ज्यांना चालू करायचा आहे त्यांच्यासाठी हा काळ भारी आहे. तर जे लोक व्यापार आधीपासून करत आहेत, त्यांना हा काळ आर्थिक लाभ देणारा आहे. शनी महाराज आपल्या मूळ राशी शतभिषा नक्षत्रात विराजमान होतील. याचा परिणाम मेष राशीच्या जातकांना आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. त्यांना प्रत्येक कामात यश मिळेल.
अधिक वाचा : महिलेला संतृष्ट करण्यासाठी अंगी हवीत कुत्र्यासारखे हे गुण
मिथुन राशीतील लोकांसाठी शनीदेवाचा प्रवेश लाभकारक आहे. या राशीतील जे लोक परदेशात शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी जाण्याचं स्वप्न पाहत आहेत, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. करिअरमध्ये चांगले परिणाम पाहण्यास मिळतील. आव्हानांना सामोरे जावे लागले तरी मेहनतीपासून दूर जाऊ नका. तुमच्या संधी गमावू नका. शनीचा मुक्काम जितक्या दिवस असेल त्या काळात पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे.
सिंह राशीतील जे लोक नोकरी करत आहेत आणि बदलीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासाठी हा काळ खूप चांगला आहे. शनीदेवाचे शतभिषा नक्षत्रात प्रवेश झाल्याने करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. तर जे उमेदवार नवीन नोकरी शोधत आहेत, त्यांना नव-नवीन ऑफर मिळतील. तसेच व्यापार करणाऱ्यांना चांगला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा : उन्हाळ्यात पुण्यात फिरता येणारी ठिकाणं
राहुच्या नक्षत्रात शनीचा प्रवेश झाल्याने तुळ राशीतील लोकांना त्यांच्या करिअरमध्ये चांगल्या गोष्टी घडतील. तुळ राशीतील लोकांसाठी हा काळ खूप चांगला आहे. जे लोकांचा व्यावसाय आहे त्यांना या काळात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचा स्रोत वाढू शकतो.
अधिक वाचा : तुमच्या या चुका खराब करतील लिव्ह-इन-रिलेशनशिप
धनु राशीतील लोकांही हा काळ खूप भारी असेल. शनिचं हा प्रवेश धनु राशीच्या लोकांसाठी यश देणारा आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन आणि त्यांच्या उत्पन्न स्रोतात वाढ होण्याची शक्यता आहे. काही लोकांना इच्छेनुसार नोकरी मिळू शकते. तसेच या राशीच्या लोकांना हा काळ सकारात्मक असेल.
मकर राशीचा स्वामी शनी आणि शनीचं शतभिषा नक्षत्रात प्रवेश हा मकर राशीच्या जातकांसाठी खूप फायदेशीर आहे. अनेकांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळू शकते. तर जे लोक नोकरी शोधत आहेत त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे.