Shanivar Upay and Shani Kavach : शनि पीडा टाळण्यासाठी सोपे उपाय आणि शनि कवच

Shanivar Upay and Shani Kavach For Avoid Shani Peeda शनिवार हा शनिदेवाचा दिवस समजतात. शनि ग्रहाचा आपल्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव पडू नये यासाठी तर काही सोपे उपाय करता येतील.

Shanivar Upay and Shani Kavach For Avoid Shani Peeda
शनि पीडा टाळण्यासाठी सोपे उपाय आणि शनि कवच 
थोडं पण कामाचं
 • शनि पीडा टाळण्यासाठी सोपे उपाय आणि शनि कवच
 • शनि पीडा टाळण्यासाठी शनिवारी करायचे सोपे उपाय
 • शनि कवच पठण

Shanivar Upay and Shani Kavach For Avoid Shani Peeda शनिवार हा शनिदेवाचा दिवस समजतात. शनि ग्रहाचा आपल्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव पडू नये यासाठी तर काही सोपे उपाय करता येतील. शनि सती, शनि साडेसाती, शनि ढय्या, शनि दोष यापैकी कसलाही त्रास असेल तर नमूद उपायांपैकी शक्य असलेला किमान एक उपाय करा. ज्यांचा ज्योतिषशास्त्र, धर्म, अध्यात्म यावर विश्वास त्यांनी उपाय करुन बघावा. शनि पीडा टाळण्यास मदत होईल.

शनि पीडा टाळण्यासाठी शनिवारी करायचे सोपे उपाय

 1. कणिक, काळे तीळ आणि साखर यांचे मिश्रण करुन मुंग्यांना खाऊ घाला.
 2. सूर्यास्ताच्या वेळी काळ्या घोड्याची नाल किंवा बोटीच्या खिळ्याने अंगठी बनवून मधल्या बोटात घाला.
 3. शनिदेवाच्या नावाचा जप करा.
 4. काळे कापड, लोखंडी भांडी, काळे तीळ, घोंगडी, उडीद डाळ या वस्तूंचे दान करा.
 5. माकडांना गूळ आणि हरभरा खायला द्या.
 6. हनुमान चालिसाचे पठण करा.
 7. शनिदेवाला निळ्या रंगाची फुले अर्पण करा आणि रुद्राक्ष सामग्रीसह ॐ शं शनिश्चराय नमः चा जप करा.
 8. एका भांड्यात तेल घेऊन त्यात तुमचा चेहरा पहावा, नंतर ते तेल एखाद्या गरीब व्यक्तीला दान करावं.
 9. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून त्याखाली दिवा लावावा.
 10. तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन शिवलिंगाला अर्पण करावे.
 11. शनि कवचाचे पठण करावे.

कवच म्हणजे ढाल किंवा संरक्षण. शनि कवच पठण करणार्‍याला शनि महाराज त्रास देत नाहीत. लक्षात ठेवा दर शनिवारी शनि कवच पठण केल्यानंतर उदबत्ती अथवा दिवा घेऊन शनि देवाची मनोभावे आरती करा. 

शनि कवच

अस्य श्रीशनैश्चर कवच स्तोत्रमंत्रस्य कश्यप ऋषि:, अनुष्टुप् छन्द: शनैश्चरो देवता ।
श्रीं शक्ति: शूं कीलकम्, शनैश्चर प्रीत्यर्थे पाठे विनियोग: ।।

नीलाम्बरो नीलवपु: किरीटी गृध्रस्थितत्रासकरो धनुष्मान्।।
चतुर्भुज: सूर्यसुत: प्रसन्न: सदा मम स्याद्वरद: प्रशान्त:।।1।।

श्रृणुध्वमृषय: सर्वे शनिपीडाहरं महत् ।।
कवचं शनिराजस्य सौरेरिदमनुत्तमम् ।।2।।
कवचं देवतावासं वज्रपंजरसंज्ञकम्।।
शनैश्चरप्रीतिकरं सर्वसौभाग्यदायकम् ।।3।।

ॐ श्रीशनैश्चर: पातु भालं मे सूर्यनंदन: ।।
नेत्रे छायात्मज: पातु कर्णो यमानुज: ।।4।।

नासां वैवस्वत: पातु मुखं मे भास्कर: सदा ।।
स्निग्धकण्ठश्च मे कण्ठ भुजौ पातु महाभुज: ।।5।।

स्कन्धौ पातु शनिश्चैव करौ पातु शुभप्रद:।।
वक्ष: पातु यमभ्राता कुक्षिं पात्वसितस्थता ।।6।।
नाभिं गृहपति: पातु मन्द: पातु कटिं तथा ।।
ऊरू ममाSन्तक: पातु यमो जानुयुगं तथा ।।7।।

पदौ मन्दगति: पातु सर्वांग पातु पिप्पल: ।।
अंगोपांगानि सर्वाणि रक्षेन् मे सूर्यनन्दन: ।।8।।

इत्येतत् कवचं दिव्यं पठेत् सूर्यसुतस्य य: ।।
न तस्य जायते पीडा प्रीतो भवन्ति सूर्यज: ।।9।।

व्ययजन्मद्वितीयस्थो मृत्युस्थानगतोSपि वा ।।
कलत्रस्थो गतोवाSपि सुप्रीतस्तु सदा शनि: ।।10।।
अष्टमस्थे सूर्यसुते व्यये जन्मद्वितीयगे ।।
कवचं पठते नित्यं न पीडा जायते क्वचित् ।।11।।

इत्येतत् कवचं दिव्यं सौरेर्यन्निर्मितं पुरा ।।
जन्मलग्नस्थितान्दोषान् सर्वान्नाशयते प्रभु: ।।12।।

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी