Shukra Gochar 2022: पुढील २३ दिवस 'शुक्र गोचर'चा ४ राशींवर वाईट परिणाम

Shukra Gochar 2022, venus transit in gemini, negative effect on 4 zodiac sign due to Shukra rashi parivartan : ज्योतिषशास्त्रानुसार सुख समृद्धीचे प्रतिक समजला जाणारा शुक्र ग्रह मिथुन राशीत प्रवेश करत आहे. शुक्र ग्रहाची मिथुन राशीतली ही गोचर स्थिती ७ ऑगस्ट २०२२ म्हणजेच पुढील २३ दिवसांपर्यंत राहणार आहे.

Shukra Gochar 2022, venus transit in gemini, negative effect on 4 zodiac sign due to Shukra rashi parivartan
Shukra Gochar 2022: पुढील २३ दिवस 'शुक्र गोचर'चा ४ राशींवर वाईट परिणाम  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • Shukra Gochar 2022: पुढील २३ दिवस 'शुक्र गोचर'चा ४ राशींवर वाईट परिणाम
 • शुक्र ग्रहाची मिथुन राशीतली ही गोचर स्थिती ७ ऑगस्ट २०२२ म्हणजेच पुढील २३ दिवसांपर्यंत राहणार
 • शुक्र ग्रहाच्या मिथुन राशीतील गोचर स्थितीमुळे काही राशींच्या नागरिकांना त्रास सहन करावा लागण्याची चिन्हं

Shukra Gochar 2022, venus transit in gemini, negative effect on 4 zodiac sign due to Shukra rashi parivartan : ज्योतिषशास्त्रानुसार सुख समृद्धीचे प्रतिक समजला जाणारा शुक्र ग्रह मिथुन राशीत प्रवेश करत आहे. शुक्र ग्रहाची मिथुन राशीतली ही गोचर स्थिती ७ ऑगस्ट २०२२ म्हणजेच पुढील २३ दिवसांपर्यंत राहणार आहे. यानंतर शुक्र ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रहाच्या मिथुन राशीतील गोचर स्थितीमुळे काही राशींच्या नागरिकांना फायदा होईल तर काही राशींच्या नागरिकांना त्रास सहन करावा लागण्याची चिन्हं आहेत.  जाणून घेऊ कोणत्या चार राशींवर शुक्र ग्रहाच्या मिथुन राशीतील गोचर स्थितीचा वाईट परिणाम होणार आहे त्या परिणामाचे स्वरुप काय असेल?

Guru purnima 2022 Daan:आज गुरुपौर्णिमेला होत आहेत 4 राजयोग, स्नान आणि दानासाठी आहे शुभ मुहूर्त

 1. वृषभ : कामाच्या ठिकाणी सांभाळून राहा. वाद टाळा. सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी जुळवून घ्या. कायदे आणि नियम पाळा. कोणाचेही म्हणणे नीट ऐकून आणि समजून घ्या.. प्रतिक्रिया देण्याची घाई टाळा. काही वेळा मौन हे राखणेही लाभाचे ठरते हे लक्षात ठेवा.
 2. कर्क : आर्थिक निर्णय तज्ज्ञांच्या, अनुभवींच्या सल्ल्याने घ्या. आर्थिक नियोजनावर भर द्या. खर्च जपून करा. तब्येत सांभाळा. घरच्यांसाठी वेळ काढा. वाद टाळणे आणि समजुतदारपणे वागणे हिताचे. निर्णयांची घाई करू नका.
 3. वृश्चिक : आर्थिक नियोजनावर भर द्या. अनावश्यक खर्च टाळा. पैसे जपून वापरा. वाद टाळा. तब्येत सांभाळा.
 4. मीन : तज्ज्ञांच्या सल्ल्याने पैसा वापरा. अनावश्यक खर्च टाळा. पैसे जपून वापरा. मोठे आर्थिक निर्णय टाळणे शक्य असल्यास फायदा होईल. वाद टाळणे आणि समजुतदारपणे वागणे हिताचे. परिस्थितीशी आणि सहकाऱ्यांशी तसेच वरिष्ठांशी जुळवून घेणे हिताचे.

त्रास कमी करण्यासाठी शुक्र मंत्राचा जप करा

 1. ज्यो ऊं शुं शुक्राय नम: किंवा ऊं द्रां द्रीं द्रौं सः शुक्राय नमः या शुक्र मंत्राचे पठण दररोज जास्तीत जास्त वेळा मनोभावे करा. 
 2. दर शुक्रवारी उपवास करा. आंबट पदार्थ खाऊ नका. मांसाहार टाळा. धूम्रपान, मद्यपान आदी कोणतेही शरीराला घात व्यसन कायमचे बंद करा. 
 3. दर शुक्रवारी ११ किंवा २१ कुमारिकांना भोजन द्यावे अथवा त्यांना यशाशक्ती दान करावे.
 4. दर शुक्रवारी गरजूंना यथाशक्ती दान करा
 5. तज्ज्ञांच्या सल्ल्याने शुक्राचा त्रास कमी करण्यासाठी योग्य ते रत्न विधीवत धारण करा.

डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाउ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू  इच्छीत नाही, पण ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे ते अधिक महितीसाठी तज्ज्ञांची मदत घेऊ शकतात. टाइम्स नाउ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी