मुंबई : १८ जूनला शुक्र(venus) वृषभ राशीमध्ये आला आहे आणि आता १३ जुलैपर्यंत याच राशीत राहणर आहे. शुक्र, वृषभ आण तूळ राशीचा स्वामी आहे. यासाठी आपल्याच राशीत आल्याने याचे शुभ फळ आणखी वाढणार आहे. साधारणपणे शुक्र ग्रह एका राशीत २३ दिवसांसाठी राहतो मात्र यावेळेस दोन दिवस जास्त म्हणजेच २५ दिवस राहणार आहे. शुक्र आपल्या राशीत आल्याने बऱ्याच राशींवर याचा परिणाम होणार आहे. shukra gochar will good effect on this 7 zodiac sign
अधिक वाचा - या योजनेत पैसे गुंतवा आणि मिळवा दुप्पट पैसे, वाचा सविस्तर
या ग्रहाचा शुभ-अशुभ परिणाम लव्ह लाईफ, पैसा, ऐश्वर्य, आनंद, घर, वाहन, ज्वेलरी, कॉस्मेटिक सामान यावर होणार आहे. याच्या चांगल्या परिणामाने ही सुखे मिळतात. तर अशुभ परिणामाने फालतू खर्च होतात. शुक्रांच्या राशी परिवर्तनाने १२ पकी ७ राशींना धनलाभ तसेच अनेक सुखे मिळणार आहेत.
शुक्राच्या या चालीने मेष, वृषभ, कर्क, कन्या, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांची चांगली वेळ येणार आहे. या ७ राशींच्या नोकरी करणाऱ्या तसेच बिझनेस करणाऱ्या लोकांना फायदा होऊ शकतो. कामाचे कौतुक होईल. तसेच पुढे जाण्याची संधी मिळू शकते. नशीबाची साथ मिळेल. दुश्मनांवर विजय मिळेल. लव्ह लाईफ आणि दाम्पत्य जीवनात आनंद येईल.
आपल्याच राशीत शुक्र आल्याने मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांसाठी मिळतीजुळता काळ राहणार आहे. या राशीच्या लोकांच्य आरोग्यात सुधारणा होईल मात्र रोजच्या दैनंदिन जीवनातील कामांमध्ये अडथळ येऊ शकतात. दाम्पत्य जीवनात सुखाची कमतरता येऊ शकते. भागीदारीच्या संबंधी प्रकरणांमध्ये अडथळे येऊ शकतात. व्यापार-उद्योगातील निर्णय विचारपूर्वक घ्या.
अधिक वाचा - कन्नड अभिनेता सतीश वज्रची राहत्या घरी हत्या
शुक्राचे राशी परिवर्तन झाल्याने सिंह,वृश्चिक आणि धनू राशीच्या लोकांना सांभाळून राहावे लागेल. या राशीच्या व्यक्तींचे फालतू खर्च वाढू शकतात. दाम्पत्य जीवनात सुखाची कमतरता येऊ शकते. मेहनत वाढेल. संबंध बिघडू शकतात. वादावादी होऊ शकते. धावपळ कराल.