Shukra Gochar 2022:  उद्यापासून या राशींवर प्रसन्न होणार लक्ष्मी, एक महिना राहणार कृपा

काल गणनेनुसार २३ मे सोमवारी रोजी शुक्र ग्रह मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करत आहे. शुक्र २७ दिवस मेष राशीत राहणार आहे. शुक्राच्या राशी परिवर्तनामुळे लोकांवर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळणार असून काही राशींच्या लोकांवर लक्ष्मी मातेची कृपा होणार आहे. काही राशींवर एक महिना ही कृपा रहाणर आहे.

shukra gochar 2022
शुक्र गोचर २०२२  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • काल गणनेनुसार २३ मे सोमवारी रोजी शुक्र ग्रह मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करत आहे.
  • शुक्र २७ दिवस मेष राशीत राहणार आहे.
  • शुक्राच्या राशी परिवर्तनामुळे लोकांवर सकारात्मक प्रभाव पडणार आहे.

Shukra Gochar 2022: काल गणनेनुसार २३ मे सोमवारी रोजी शुक्र ग्रह मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करत आहे. शुक्र २७ दिवस मेष राशीत राहणार आहे. शुक्राच्या राशी परिवर्तनामुळे लोकांवर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळणार असून काही राशींच्या लोकांवर लक्ष्मी मातेची कृपा होणार आहे. काही राशींवर एक महिना ही कृपा रहाणर आहे. या राशींनी या वेळी धैर्य आणि संयम ठेवणे गरजेचे आहे. शुक्र राशीच्या परिवर्तनामुळे पाच राशींवर लक्ष्मी मातेची विशेष कृपा असणार आहे.

या राशींवर राहणार लक्ष्मी मातेची कृपा

सिंह राशी

सिंह राशींच्या लोकांवर शुक्र गोचरचा अनुकूल प्रभाव राहणार आहे. या राशीच्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती मिळणार आहे. कार्यक्षेत्रात यश मिळणार आहे. फक्त या काळात जिभेवर ताबा ठेवा, लोकांशी चांगले संबंध ठेवा.

मकर राशी

शुक्र गोचरमुळे सर्वात जास्त फायदा मकर राशीला होणार आहे. मकर राशीच्या लोकांना नवीन वाहन मिळण्याची शक्यता आहे. लग्नातील अडचणी दूर होती. हा काळ मकर राशीसाठे खूप अनुकूल आहेत त्यांनी फक्त धैर्य आणि संयम ठेवणे गरजेचे आहे.

मिथुन राशी

मिथून राशीच्या लोकांच्या आयुष्यात शुक्र राशीच्या परिवर्तनामुळे सकारात्मक बदल होणर आहे. या राशीच्या लोकांना धन, यश आणि वैभव मिळेल. व्यावसायिक आयुष्यात यश मिळेल तसेच अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेली कामे होतील आणि मानसिक शांतता मिळेल.

मेष राशी

शुक्र गोचरमुळे मेष राशींच्या लोकांवर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. त्यांच्यावर लक्ष्मीमातेची कृपा होणार आहे. करियरमध्ये यश मिळणार आहे. तसे शिक्षणातही प्रगती होणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात प्रभाव वाढण्याची शक्यता.

कुंभ राशी

कुंभ राशीच्या लोकांवर शुक्र गोचरचा १ महिना प्रभाव राहणार आहे. कुंभ राशीच्या लोकांना नोकरीत नवी संधी मिळणार आहे तसेच नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी नवे बदल अनुभवता येणार आहे. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी