somvati amavasya : अडचणी दूर व्हाव्या म्हणून आजच्या सोमवती अमावस्येला करायचे उपाय

somvati amavasya 2022 astrological upay astrological remedies : आज सोमवार ३१ जानेवारी २०२२. आजच दुपारी २.२० पासून मंगळवार १ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११.१६ पर्यंत सोमवती अमावस्या (मौनी अमावस्या mauni amavasya) आहे. आपल्या नोकरी व्यवसायात तसेच अन्य कामांमध्ये येणाऱ्या अडचणी आणि अडथळे दूर करण्यासाठी आजच्या दिवशी करायचे सोपे उपाय जाणून घ्या.

somvati amavasya 2022 astrological upay astrological remedies
अडचणी दूर व्हाव्या म्हणून आजच्या सोमवती अमावस्येला करायचे उपाय  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • अडचणी दूर व्हाव्या म्हणून आजच्या सोमवती अमावस्येला करायचे उपाय
 • धर्म-कर्म, ज्योतिष यावर श्रद्धा आहे अशांनी इच्छा असल्यास मनोभावे हे उपाय करावे
 • अचडणी दूर होण्यास आणि प्रगतीसाठी मदत होईल

somvati amavasya 2022 astrological upay astrological remedies : आज सोमवार ३१ जानेवारी २०२२. आजच दुपारी २.२० पासून मंगळवार १ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११.१६ पर्यंत सोमवती अमावस्या (मौनी अमावस्या mauni amavasya) आहे. आपल्या नोकरी व्यवसायात तसेच अन्य कामांमध्ये येणाऱ्या अडचणी आणि अडथळे दूर करण्यासाठी आजच्या दिवशी करायचे सोपे उपाय जाणून घ्या.

 1. दूध आणि तांदूळ यांचा वापर करून खीर तयार करा. गोवऱ्या जाळून त्यावर खिरीचे भांडे ठेवून खीर तापवून घ्या आणि दक्षिण दिशेला पितरांची आठवण करून ही खीर कावळ्यासाठी म्हणून मोकळ्या जागेवर ठेवा. खीर ठेवल्यावर दक्षिण दिशेला नमस्कार करा आणि पितरांचे स्मरण करून कळत नकळत त्यांच्या सेवेत झालेल्या चुकांसाठी माफी मागा. प्रगती होण्यास मदत होईल.
 2. खिरीचा उपाय शक्य नसल्यास घरातील ताज्या अन्नाचे ताट तयार करा. केळीच्या पानावर पदार्थ वाढून ताट तयार करा. हे ताट दक्षिण दिशेला पितरांची आठवण करून कावळ्यासाठी म्हणून मोकळ्या जागेवर ठेवा. दक्षिण दिशेला नमस्कार करा आणि पितरांचे स्मरण करून कळत नकळत त्यांच्या सेवेत झालेल्या चुकांसाठी माफी मागा. प्रगती होण्यास मदत होईल.
 3. गरजूंना धान्य, कपडे, अंथरूण-पांघरूण, पैसे अशा स्वरुपात यथाशक्ती दान करा. प्रगती होण्यास मदत होईल.
 4. घरातील ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींची सेवा करा. आजच्या दिवशी आंघोळीनंतर आपण घरातील आजारी व्यक्तींच्या कपड्यातील एक छोटा धागा काढून तो कापसासोबत जोडा आणि त्या कापसाची वळून वात तयार करा. या वातीचा आणि मोहरीच्या तेलाचा वापर करून दिवा पेटवा. हा दिवा हनुमान मंदिरात ठेवा. आजारी व्यक्तीला आराम पडेल.
 5. लिंबू घेऊन त्याचे चार तुकडे करा आणि चौकात जाऊन ते तुकडे गुपचूप चार दिशांना चार तुकडे या पद्धतीने टाका. कामाच्या ठिकाणी आपली प्रगती होण्यास मदत होईल.
 6. देवीच्या मंदिरात जाऊन नारळ फोडा. आतील खोबऱ्याचे ४२ तुकडे करा. यातील ३ तुकडे शंकराला तर नऊ तुकडे कुमारिकांना वाटा. दोन तुकडे शिंप्याला, दोन तुकडे माळ्याला आणि दोन तुकडे कुंभाराला प्रसाद म्हणून द्या. चार तुकडे स्वतः प्रसाद म्हणून घ्या आणि उर्वरित सर्व तुकडे मंदिरात आलेल्यांना प्रसाद म्हणून वाटा. एखादे महत्त्वाचे अडलेले काम पूर्ण होण्यास मदत होईल.
 7. पाणी असलेला नारळ घेऊन त्यावर लाल धागा सात वेळा गुंडाळा आणि आपल्या इष्ट देवाचे नामस्मरण करून हा नारळ वाहत्या पाण्यात सोडा. प्रगती होण्यास मदत मिळेल.
 8. पाच लाल फुलं आणि पाच तेलाचे दिवे वाहत्या पाण्यात सोडा. कौटुंबिक अडचणी दूर होण्यास मदत होईल. सूर्यास्तानंतर हा उपाय करणे सर्वाधिक लाभाचे.
 9. आंघोळ करून देवी मातेची मनोभावे पूजा करा. धूप-दीप यांनी देवीची सेवा करा. तांदूळ वापरून देवीसमोर हवन करा. आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होईल.

ज्यांची धर्म-कर्म, ज्योतिष यावर श्रद्धा आहे अशांनी इच्छा असल्यास मनोभावे हे उपाय करावे. 'टाइम्स नाउ मराठी' या उपायांविषयी कोणतीही खात्री देत नाही. आपण उपाय करण्याआधी स्वतःच्या ज्योतिषाचा सल्ला घेणे हिताचे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी