Shukra Gochar 2023: राशी परिवर्तनाचा आपल्या जीवनमानासह भविष्यावर देखील सकारात्मक तसेच नकारात्मक परिणाम होत असतो. ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह वेळोवेळी गोचर अर्थात संक्रमण किंवा वक्र स्थितीत येत असतो. त्यानुसार राशी आणि नक्षत्र देखील बदलत असतात. अशातच प्रेम, धन आणि वैभवकारक ग्रह शुक ग्रह नुकताच वृषभ राशीत स्थिर झाला आहे. परंतु पुढील 48 तासांत शुक्र ग्रह वृषभ राशीच्या उच्च स्थानी विराजमान होणार आहे. या संक्रमनाचा काही राशीच्या लोकांना लाभ मिळणार आहे. त्यांचं नशीब फळफळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
शुक्र 12 एप्रिल रोजी एक पाऊल उच्च स्थानी म्हणजे विवाह आणि नवव्या कुंडलीत विराजमान होणार आहे. त्यामुळे शुक्राची शक्ति सर्वोच्च होणार आहे. याचा अर्थ असा, की इतक राशींवर शुक्राचा प्रभाव आणखी मजबूत होणार आहे. शुक्र ग्रह कुंडलीत 12 ते 15 एप्रिल 2023 या कालावधीत विराजमान राहील. त्यामुळे वृषभ, कन्या आणि कर्क राशीच्या लोकांचं नशीब पालटणार आहे. त्यांच्यावर धन वर्षाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शुक्र ग्रहाचं वृषभ राशीतील सर्वोच्च स्थानावर परिवर्तन होत आहे. त्यामुळे वृषभ राशीचे लोक मालामाल होण्याचे संकेत मिळत आहेत. इतकंच नाही तर वृषभ राशीच्या लोकांना सामाजिक प्रतिष्ठा मिळणार आहे. मालमत्तेत वाढ होणार आहे. या लोकांचा आत्मविश्वास देखील वाढू शकतो. अप्रत्यक्षपणे आई-वडिलांकडून देखील आर्थिक सहकार्य मिळू शकते. उद्योग-व्यवसायात भरभराटीचे देखील संकेत आहेत.
शुक ग्रहाच्या संक्रमनाचा लाभ कन्या राशीच्या लोकांना देखील मिळेल. आधी केलेल्या गुंतवणुकीतून मोठा लाभ मिळू शकतो. विशेष म्हणजे विदेश यात्रेचे योग आहेत. धार्मिक-सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. मन: शांती मिळेल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. वैवाहीक जीवनातील समस्या सुटतील.
शुक्र ग्रहाच्या उच्चस्थानी विराजमान होण्याचा लाभ कर्क राशीच्या लोकांना मिळणार आहे. या लोकांना चंद्रावरील सुखाचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे. कर्क राशीच्या लोकांचं एका रात्रीतून नशीब पालटणार आहे. 'देने वाला जब भी देता..पूरा छप्पर फाड के देता है', याचा देखील अनुभव कर्क राशीच्या लोकांना मिळणार आहे. विशेष म्हणजे कर्क राशीच्या लोकांना हा लाभ अनंत काळापर्यंत मिळत राहाणार आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांना प्रमाणापेक्षा जास्त परतावा मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी अधिक परिश्रम घेतल्यास त्यांना प्रगतीपासून कोणीही रोखू शकत नाही.