Surya Grahan सूर्यग्रहणाची वेळ आणि सूतककाळ

Surya Grahan Solar Eclipse 2021 नवी दिल्ली: यंदाच्या वर्षातले शेवटचे सूर्यग्रहण उद्या म्हणजेच शनिवार ४ डिसेंबर २०२१ रोजी आहे. हे सूर्यग्रहण सकाळी अकरा वाजता सुरू होईल आणि दुपारी ३ वाजून ७ मिनिटांनी संपेल. हे ग्रहण भारतातून दिसणार नाही.

Surya Grahan Solar Eclipse 2021 date time sutak kaal Solar Eclipse time
सूर्यग्रहणाची वेळ आणि सूतककाळ 
थोडं पण कामाचं
  • सूर्यग्रहणाची वेळ आणि सूतककाळ
  • ४ डिसेंबरचे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही
  • भारतात सूतककाळ नाही

Surya Grahan Solar Eclipse 2021 नवी दिल्ली: यंदाच्या वर्षातले शेवटचे सूर्यग्रहण उद्या म्हणजेच शनिवार ४ डिसेंबर २०२१ रोजी आहे. हे सूर्यग्रहण सकाळी अकरा वाजता सुरू होईल आणि दुपारी ३ वाजून ७ मिनिटांनी संपेल. विशेष म्हणजे हे या वर्षीचे दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण आहे. याआधी गुरुवार १० जून २०२१ रोजी सूर्यग्रहण झाले होते. 

पहिले सूर्यग्रहण भारतात लडाख आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागांमधूनच दिसले होते. भारतात बहुतांश ठिकाणी हे ग्रहण दिसलेच नव्हते. आता ४ डिसेंबर रोजी होणार असलेले सूर्यग्रहण पण भारतातून दिसणार नाही. यापूर्वी बुधवार २६ मे २०२१ रोजी सुपर ब्लड मून चंद्रग्रहण लागले होते. पण तेसुद्धा भारतातून पाहता आले नव्हते.

अमावस्येच्या दिवशी एका सरळ रेषेत सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये चंद्र आला की चंद्रामागे सूर्य झाकला जातो. सूर्याला ग्रहण लागते. पृथ्वीवरुन बघताना चंद्रामुळे सूर्य पूर्णपणे झाकला गेल्याचे दिसले तर त्याला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. सूर्याचा केवळ काही भाग झाकलेला दिसला तर त्याला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात. 

चंद्र पृथ्वी आणि सूर्यापेक्षा लहान आहे. पण चंद्र पृथ्वीपासून जवळ आहे. यामुळे पृथ्वीवरुन बघताना चंद्र आणि सूर्य एकसमान आकाराचे भासतात. यामुळेच खग्रास ग्रहणात चंद्रबिंब सूर्यबिंबाला पूर्ण झाकत असल्यासारखे दिसते. 

पृथ्वी आणि चंद्राच्या कक्षा लंबगोलाकार आहेत. जेव्हा चंद्र पृथ्वीपासून दूर असतो त्यावेळी पृथ्वीवरून चंद्रबिंबाचा आकार सूर्यबिंबापेक्षा लहान दिसतो. या सुमारास सूर्यग्रहण झाल्यास चंद्र सूर्यबिंबाच्या मधोमध येतो. यामुळे पृथ्वीवरुन बघणाऱ्यास चंद्राने सूर्याचा मधला भाग झाकलेला दिसतो. कंकणासारखी म्हणजे बांगडीसारखी सूर्याची कडा दिसते. याला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. या ग्रहण स्थितीला रिंग ऑफ फायर, अग्निवलय, अग्निकंकण या नावांनी पण ओळखले जाते. 

कंकणाकृती ग्रहणात चंद्राच्या थेट छायेखाली असलेल्या प्रदेशातच रिंग ऑफ फायर दिसते. आसपासच्या प्रदेशात खंडग्रास ग्रहण पाहायला मिळते. भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसण्याचा पुढचा योग २१ मे २०३१ रोजी येणार आहे.

सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. पण शुभअशुभावर विश्वास ठेवणारे सूर्यग्रहणाचा काळ अशुभ समजतात. या काळात मंदिराच्या गाभाऱ्याचे दरवाजे बंद करतात. देवदर्शन करणे, शुभकार्य करणे टाळतात. 

सूतकाचा काळ

सूर्यग्रहण सुरू होण्याच्या बारा तास आधी सूतकाचा काळ सुरू होतो. ४ डिसेंबर रोजी होणार असलेले सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. यामुळे भारतात सूतकाचा काळ नाही. 

सूर्यग्रहण कोणत्या भागांमधून दिसणार?

यंदाच्या वर्षातले शेवटचे सूर्यग्रहण दक्षिण अमेरिका, अंटार्कटिका, ऑस्ट्रेलिया, अटलांटिकचा दक्षिणेकडील भाग, दक्षिण आफ्रिका येथे दिसेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी