सूर्य गोचर २०२२, ३ राशींना फायदा, सूर्याचा शुभ प्रभाव

Surya Rashi Parivartan 16 July 2022, Surya Gochar 2022, surya transit 2022 from july 16, sun transit 2022 from july 16, effects on 3 zodiac signs will increase, auspicious effects : जाणून घेऊ कोणत्या तीन राशींना सूर्याच्या कर्क राशीतील गोचर स्थितीचा फायदा होत आहे. या फायद्याचे स्वरुप काय आहे?

Surya Rashi Parivartan
सूर्य गोचर २०२२, ३ राशींना फायदा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • सूर्य गोचर २०२२, ३ राशींना फायदा
  • सूर्याचा शुभ प्रभाव
  • परिणामाचे स्वरुप

Surya Rashi Parivartan 16 July 2022, Surya Gochar 2022, surya transit 2022 from july 16, sun transit 2022 from july 16, effects on 3 zodiac signs will increase, auspicious effects : ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य दर महिन्याला वेगवेगळ्या राशीत या पद्धतीने बारा राशींमधून प्रवास करतो. शनिवार १६ जुलै २०२२ रोजी सूर्याने सकाळी सात वाजून २२ मिनिटांनी मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश केला. सूर्याच्या राशी बदलामुळे काही काही राशींच्या नागरिकांना फायदा होत आहे तर काही राशींच्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.  जाणून घेऊ कोणत्या तीन राशींना सूर्याच्या कर्क राशीतील गोचर स्थितीचा फायदा होत आहे. या फायद्याचे स्वरुप काय आहे?

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

  1. मिथुन रास : कर्क राशीतील सूर्य गोचर स्थितीमुळे मिथुन राशीच्या नागरिकांना फायदा होणार आहे. आर्थिक सुबत्ता येईल. उत्पन्नात वाढ होईल. धन आणि शब्द यांचा सुयोग्य वापर प्रगतीसाठी सहाय्यक ठरेल. कोणाकडून येणे असलेली रक्कम, एखाद्या कारणामुळे अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या नोकरीची संधी आहे. आवडते काम करण्याची संधी आहे. बुध आणि सूर्य प्रसन्न राहावेत यासाठी ॐ बुधाय नमः आणि ॐ सूर्याय नम: या दोन मंत्रांचे प्रत्येकी १०८ वेळा दररोज सकाळी आंघोळीनंतर पठण करा.
  2. कन्या रास : कर्क राशीतील सूर्य गोचर स्थितीमुळे कन्या राशीच्या नागरिकांना फायदा होणार आहे. काळ उत्तम आहे. आर्थिक लाभाचे योग दिसत आहेत. उत्पन्न वाढेल. तज्ज्ञांच्या सल्ल्याने केलेले गुंतवणूक फायद्याची ठरेल. तज्ज्ञांच्या सल्ल्याने हाताच्या बोटात योग्य रत्न धारण केल्यास मोठा फायदा होईल. बुध आणि सूर्य प्रसन्न राहावेत यासाठी ॐ बुधाय नमः आणि ॐ सूर्याय नम: या दोन मंत्रांचे प्रत्येकी १०८ वेळा दररोज सकाळी आंघोळीनंतर पठण करा.
  3. तुळ रास : कर्क राशीतील सूर्य गोचर स्थितीमुळे तुळ राशीच्या नागरिकांना फायदा होणार आहे. नव्या नोकरीची संधी आहे. तसेच जिथे काम करत आहात तिथे बढतीचा आणि पगारवाढीचा योग दिसत आहे. आपल्या कामाचे कौतुक होईल. प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यापाऱ्यांना आर्थिक लाभ होईल. उत्पन्न वाढेल. आर्थिक संपन्नता लाभेल. बुध आणि सूर्य प्रसन्न राहावेत यासाठी ॐ बुधाय नमः आणि ॐ सूर्याय नम: या दोन मंत्रांचे प्रत्येकी १०८ वेळा दररोज सकाळी आंघोळीनंतर पठण करा. मीडिया, मनोरंजन, बँकिंग, कला, फॅशन डिझायनिंग, ज्वेलरी डिझायनिंग या क्षेत्रात असलेल्यांना फायदा होईल. तज्ज्ञांच्या सल्ल्याने हाताच्या बोटात योग्य रत्न धारण केल्यास मोठा फायदा होईल.

गोचर काळ

प्रत्येक ग्रह/तारा/नक्षत्र प्रत्येक राशीत विशिष्ट कालावधीसाठी असतो. यालाच संबंधित ग्रहाचे/ताऱ्याचे/नक्षत्राचे त्या त्या राशीतले गोचर म्हणून ओळखले जाते. सूर्य, शुक्र, बुध प्रत्येक राशीत एक महिना तर चंद्र प्रत्येक राशीत सव्वा दोन दिवस गोचर करतो. मंगळ प्रत्येक राशीत ५७ दिवस तर गुरु प्रत्येक राशीत एक वर्ष गोचर करतो. राहू आणि केतू प्रत्येक राशीत दीड वर्ष तर शनि (शनी) प्रत्येक राशीत अडीच वर्ष गोचर करतो.

डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाउ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू  इच्छीत नाही, पण ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे ते अधिक महितीसाठी तज्ज्ञांची मदत घेऊ शकतात. टाइम्स नाउ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी