सूर्य गोचर २०२२, १६ जुलैपासून ३ राशींच्या त्रासात वाढ, सूर्याचा अशुभ प्रभाव

Surya Rashi Parivartan 16 July 2022, Surya Gochar 2022, surya transit 2022 from july 16, sun transit 2022 from july 16, problems of 3 zodiac signs will increase, inauspicious effects : ज्योतिषशास्त्रानुसार शनिवार १६ जुलै २०२२ रोजी सूर्य सकाळी सात वाजून २२ मिनिटांनी मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल.

Surya Rashi Parivartan 16 July 2022, Surya Gochar 2022, surya transit 2022 from july 16, sun transit 2022 from july 16, problems of 3 zodiac signs will increase, inauspicious effects
सूर्य गोचर २०२२, १६ जुलैपासून ३ राशींच्या त्रासात वाढ, सूर्याचा अशुभ प्रभाव  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • सूर्य गोचर २०२२, १६ जुलैपासून ३ राशींच्या त्रासात वाढ, सूर्याचा अशुभ प्रभाव
  • तीन राशींवर सूर्याच्या कर्क राशीतील गोचर स्थितीचा वाईट परिणाम होणार
  • परिणामाचे स्वरुप

Surya Rashi Parivartan 16 July 2022, Surya Gochar 2022, surya transit 2022 from july 16, sun transit 2022 from july 16, problems of 3 zodiac signs will increase, inauspicious effects : ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य दर महिन्याला वेगवेगळ्या राशीत या पद्धतीने बारा राशींमधून प्रवास करतो. सध्या सूर्यदेव मिथुन राशीत आहेत. पण शनिवार १६ जुलै २०२२ रोजी सूर्य सकाळी सात वाजून २२ मिनिटांनी मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. सूर्याच्या राशी बदलामुळे काही काही राशींच्या नागरिकांना फायदा होईल तर काही राशींच्या नागरिकांना त्रास सहन करावा लागण्याची चिन्हं आहेत.  जाणून घेऊ कोणत्या तीन राशींवर सूर्याच्या कर्क राशीतील गोचर स्थितीचा वाईट परिणाम होणार आहे आणि त्या परिणामाचे स्वरुप काय असेल?

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

  1. धनु : म धनु राशीवर दिसून येईल. सध्या धनु राशीची साडेसाती सुरू आहे. साडेसातीचा प्रभाव जानेवारी २०२३ पर्यंत आहे. यामुळे सूर्य गोचर काळात वाहन जपून चालवा. आर्थिक बाबतीत हलगर्जीपणा टाळा.
  2. मकर : सूर्याच्या कर्क राशीतील गोचर स्थितीचा वाईट परिणाम मकर राशीवर दिसून येईल. दांपत्य जीवनात अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. वाद वाढण्याचा धोका आहे. शब्द जपून वापरणे, संयम राखणे आणि वाद टाळणे हिताचे. समजुतदारपणे वागणे लाभाचे. 
  3. मीन : मीन राशीत सूर्य गोचर पंचम भावात होत आहे. यामुळे सूर्याच्या कर्क राशीतील गोचर स्थितीचा वाईट परिणाम मीन राशीवर दिसून येईल. कामाच्या ठिकाणी सावध राहा. वेळेचे नियोजन करून वेळेत कामं पूर्ण करा. संयम राखा.

त्रास कमी करण्यासाठी सूर्य मंत्राचा दररोज सकाळी आंघोळ करून किमान १०८ वेळा मनोभावे जप करा. 

सूर्यमंत्र (नमूद मंत्रांपैकी कोणत्याही सूर्यमंत्राचा जप त्रास कमी करण्यासाठी उपयुक्त)

  1. ॐ घृ‍णिं सूर्य्य: आदित्य:
  2. ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणराय मनोवांछित फलम् देहि देहि स्वाहा।।
  3. ॐ ऐहि सूर्य सहस्त्रांशों तेजो राशे जगत्पते, अनुकंपयेमां भक्त्या, गृहाणार्घय दिवाकर:।
  4. ॐ ह्रीं घृणिः सूर्य आदित्यः क्लीं ॐ ।
  5. ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय नमः ।
  6. ॐ सूर्याय नम: ।
  7. ॐ घृणि सूर्याय नम: ।

डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाउ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू  इच्छीत नाही, पण ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे ते अधिक महितीसाठी तज्ज्ञांची मदत घेऊ शकतात. टाइम्स नाउ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी