या नावाच्या मुलींमध्ये असतात लीडरशिपचे गुण, कामाच्या ठिकाणी लवकर बनतात बॉस

भविष्यात काय
Updated Jan 04, 2022 | 18:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

Name Astrology: येथे आपण जाणून घेार अहोत अशा अक्षरांबाबत ज्यांच्यापासून सुरू होणाऱ्या नावाच्या मुलींमध्ये जन्मपासूनच नेतृत्वगुण असतात. या साहसी आणि मेहनती असतात. 

horoscope
Astrology: या नावाच्या मुलींमध्ये असतात लीडरशिपचे गुण 
थोडं पण कामाचं
  • ज्योतिषानुसार नाव हे केवळ त्या व्यक्तीची ओळख नसते तर नावाचे पहिले अक्षर त्या व्यक्तीच्या जीवनावर प्रभाव टाकत असते.
  • हिंदू धर्मात नाव हे विचारपूर्वक ठेवले जाते.
  • ज्या मुलींचे नाव A अक्षऱापासून सुरू होते त्या मुली दयाळू वृत्तीच्या असतात.

मुंबई: प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात नावाला(name) अतिशय महत्त्व असते. ज्योतिषानुसार(Horoscope) नाव हे केवळ त्या व्यक्तीची ओळख नसते तर नावाचे पहिले अक्षर त्या व्यक्तीच्या जीवनावर प्रभाव टाकत असते. यासाठी हिंदू धर्मात नाव अतिशय विचारपूर्वक ठेवले जाते. येथे आपण जाणून घेणार आहोत अशा अक्षरांबाबत ज्याच्यापासून सुरू होणाऱ्या नावाच्या मुलींमध्ये जन्मपासूनच नेतृत्व गुण असतात. या मुली साहसी आणि मेहनती असतात. या कामाच्या ठिकाणी लवकरच सगळ्यांच्या बॉस बनतात. The girl name start with this letter became good leader

ज्या मुलींचे नाव A अक्षऱापासून सुरू होते त्या मुली दयाळू वृत्तीच्या असतात. दुसऱ्यांची मदत करण्यासाठी या नेहमी तयार असतात. यांच्यात आत्मविश्वास प्रचंड प्रमाणात भरलेला असतो. एकदा एखादे काम यांनी हातात घेतले तर त्या पूर्ण करूनच थांबतात. यांच्यामध्ये जन्मापासूनच नेतृत्वगुण असतात. या मेहनत करून कामाच्या ठिकाणी सर्वांच्या बॉस बनतात. सरकारी नोकरीच्या ठिकाणी या भरपूर नाव कमावतात. यांच्या मनात जे असते ते बोलून टाकतात. 

ज्या मुलींचे नाव Cया अक्षरापासून सुरू होते त्या स्मार्ट आणि बुद्धिमान असतात. आपल्या बोलण्याने या सर्वांची मने जिंकतात. आपल्या स्वभावामुळे या कामाच्या ठिकाणी आपल्या स्वभावामुळे चांगले पद मिळवतात. या लगेचच एखाद्यांसोबत मिळून मिसळून जातात. यांच्याकडे धनधान्याची कमतरता नसते. यांना लक्ष्मीचे रूप मानले जाते. कामाच्या बाबतीत यांना भाग्याची साथ मिळते. या करिअरमध्ये खूप पुढे जातात. या कामाच्या ठिकाणी लवकरच साऱ्यांच्या बॉस बनतात. 

ज्या मुलींचे नाव M अक्षरापासून सुरू होते त्या मुली खूप मेहनती असतात. त्या नेहमी पुढे जाण्याबाबत विचार करत असतात. यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करतात. या आपल्या जीवनात खूप फोकस्ड असतात. प्रत्येक क्षेत्रात नवनवे प्रयोग करण्यास या घाबरत नाहीत. या खूपच प्रॅक्टिकल असतात. प्रत्येक काम नियोजनबद्ध पद्धतीने करतात. कामाच्या ठिकाणी अधिकाधिक बॉसची भूमिका निभावतात. कारण यांच्यात लीडरशिपचे गुण असतात. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी