Mercury Transit 2022: प्रत्येक दिवसाप्रमाणे प्रत्येक महिना हा राशींसाठी (Rashi) एक बदल घेऊन येत असतो. काही दिवसांनी नवीन ऑगस्ट महिना (August Month) सुरू होणार आहे. या महिन्यात अनेक राशींच्या जीवनात बदल होणार आहे. या महिन्याच्या काळात बुध ग्रहाचे सिंह राशीमध्ये संक्रमण होणार आहे.
बुध ग्रहाच्या संक्रमणाचा बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, पैसा, व्यवसाय यावर मोठा प्रभाव पडतो. 31 जुलै 2022 रोजी रात्री उशिरा बुध ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह राशीतील बुधाचे परिवर्तन 5 राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. 21 ऑगस्टपर्यंत बुध सिंह राशीत राहतील तोपर्यंत या लोकांना भरपूर पैसा मिळेल.
बुध ग्रहाचे संक्रमण मेष राशीच्या लोकांना अनेक सुख देणारं असेल. ते त्यांच्या कामात कठोर परिश्रम करतील आणि त्यांना त्यांचे फळही मिळेल. त्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात ज्यामुळे त्यांचा प्रभाव वाढेल. सहलीला जाऊ शकता. प्रेमी युगुलांसाठीही हा काळ चांगला राहील. धनलाभ होईल.
Read Also : संत सावता माळी पुण्यतिथीनिमित्त शेअर करा अभिवादनपर संदेश
सिंह राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण शुभ परिणाम देईल. त्यांचा संवाद अधिक चांगला होईल, ज्यामुळे त्यांचे काम सोपे होईल. धनलाभ होईल. नवीन योजनांवर काम करण्यासाठी उत्तम वेळ आहे. नोकरी-व्यवसायात लाभ होईल. नफा वाढेल. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल.
बुधाचे संक्रमण कन्या राशीच्या लोकांना जोरदार लाभ देईल. कोणतीही कामगिरी साध्य होईल, उत्पन्न वाढेल. व्यावसायिकांची कामे चांगली होतील. कुटुंबाशी संबंध चांगले राहतील. जे नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना संधी मिळेल.
Read Also : रणबीर कपूरमुळे विकी कौशलवर चिडली कतरिना कैफ
धनु राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना अनेक आनंद देईल. वैवाहिक सुख मिळेल. ज्यांचे लग्न झालेले नाही, त्यांचे नाते संबंध निश्चित होऊ शकतील. धार्मिक कार्यक्रमात भाग घेता येईल. कठोर परिश्रमाचे फळ मोठ्या यशाच्या रूपात मिळणा असून जातकांच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे.
कुंभ राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी बुधाचे संक्रमण लाभ देईल. त्याच्या कामाचे कौतुक होईल. पदोन्नती मिळू शकते. व्यावसायिकही चांगले काम करतील. लग्नाचे प्रकरण पुढे जाऊ शकते. अविवाहितांना जोडीदार मिळू शकतो. तसेच अनेकांचा आपल्या कामात आयुष्यात आदर वाढेल. नशिबाच्या सहकार्याने कामे पूर्ण होतील.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. टाइम्स नाउ याची पुष्टी करत नाही.)