Surya Rashi Gochar 2022: सूर्याच्या संक्रमणामुळे येणार 'अच्छे दिन; या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब 

भविष्यात काय
Updated May 12, 2022 | 09:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

Surya Rashi Gochar 2022 | ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एक निश्चित कालावधी नंतर संक्रमण करत असतो. याशिवाय ग्रहांच्या संक्रमणाचा कालावधी काही राशीतील लोकांसाठी शुभ असतो तर काही राशींसाठी हा कालावधी अशुभ मानला जातो.

The transition of the sun will bring 'good days
सूर्याच्या संक्रमणामुळे येणार 'अच्छे दिन, वाचा सविस्तर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एक निश्चित कालावधी नंतर संक्रमण करत असतो.
  • ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य १५ मे रोजी वृषभ राशीमध्ये संक्रमण करत आहे.
  • मेष राशीतील लोकांच्या कुंडलीमध्ये सूर्यदेव दुसऱ्या भावात संक्रमण करणार आहेत.

Surya Rashi Gochar 2022 In Marathi | मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित कालावधी नंतर संक्रमण करत असतो. याशिवाय ग्रहांच्या संक्रमणाचा कालावधी काही राशीतील लोकांसाठी शुभ असतो तर काही राशींसाठी हा कालावधी अशुभ मानला जातो. लक्षणीय बाब म्हणजे ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य १५ मे रोजी वृषभ राशीमध्ये संक्रमण करत आहे. (The transition of the sun will bring 'good days). 

अधिक वाचा : आदित्य ठाकरेंनी सांगितलं राजकारणात येण्याचं कारण

दरम्यान, वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याचे संबंध वडील, प्रशासकीय पद आणि समाजातील मान-सन्मानाशी आहे. त्यामुळे सूर्य ग्रहाच्या संक्रमणाचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे. मात्र ३ राशी अशा आहेत ज्यांच्यासाठी हे संक्रमण अत्यंत फायदेशीर सिद्ध होऊ शकते. चला तर म जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या तीन लकी राशी. 

अधिक वाचा : दुबईत शिवसेना आमदार रमेश लटकेंचा मृत्यू

१) मेष राशी - मेष राशीतील लोकांच्या कुंडलीमध्ये सूर्यदेव दुसऱ्या भावात संक्रमण करणार आहेत, ज्याला धन आणि वाणी यांचे स्थान म्हटले आहे. या कालावधीत तुम्हाला अचानक मोठ्या धनाचा लाभ मिळू शकतो. याशिवाय जर तुमचे पैसे इतर ठिकाणी अडकले असतील तर या कालावधीत मिळण्याचा योग आहे. तसेच या कालावधीत तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत राहील. लक्षणीय बाब म्हणजे तुम्हाला नवीन जॉब मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रमोशन होऊ शकते. जर तुमचा व्यवसाय सूर्यदेव आणि गुरू ग्रहाशी निगडीत असेल तर तुम्हाला चांगल्या पैशाचा लाभ होऊ शकतो. मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. मंगळ देवतेमध्ये मित्रतेचा भाव असल्याकारणाने या संक्रमणाची क्रिया तुमच्यासाठी फायदेशीर आहे. 

२) कर्क राशी - कर्क राशीतील लोकांसाठी सूर्याचे संक्रमण लाभदायक ठरू शकते. कारण सूर्यदेव तुमच्या ११ व्या भावात संक्रमण करणार आहेत, ज्याला महसूल आणि लाभ यांचे स्थान मानले जाते. त्यामुळे या कालावधीत तुमच्या महसूलात वाढ होऊ शकते. महसूलाचे नवनवीन स्त्रोत बनू शकतात. जीवनात अचानक धनाचा लाभ होऊ शकतो. लक्षणीय बाब म्हणजे हा कालावधी कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी शुभ आहे. गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फलदायी ठरू शकते. याशिवाय जे लोक प्रॉपर्टी डिलिंग आणि रियल स्टेट संबंधित व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हा कालावधी अनुकूल असणार आहे. कर्क राशीचे स्वामी ग्रह चंद्रदेव आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रदेवामध्ये मित्रतेचा भाव आहे, त्यामुळे हे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर असेल. 

सिंह राशी - सिंह राशीत सूर्यदेव दहाव्या भावात संक्रमण करतील, ज्याला कार्यक्षेत्र आणि नोकरीचा भाव म्हटले जाते. त्यामुळे या कालावधीत तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमचे या काळात प्रमोशन देखील होईल. यादरम्यान तुमच्या कार्यक्षेत्रात सुधारणा होऊ शकते. ऑफिसमध्ये तुमची प्रशंसा होईल. ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीवर सूर्यदेवांचे अधिपत्य आहे. त्यामुळे या कालावधीत तुमच्या आर्थिक स्थितीतही सुधारणा होईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी