Vastu Shastra: हे ५ प्राणी खूप भाग्यवान मानले जातात, त्यांना पाळल्यास घरात सुख-शांती राहते

Vastu Tips In Marathi | वास्तुशास्त्रानुसार घरात काही प्राणी आणि पक्षी ठेवणे शुभ असते. असे मानले जाते की हे प्राणी आणि पक्षी घरात सुख-समृध्दी आणतात. याशिवाय त्यांच्या येण्याने घरातील समस्यांचा त्रास देखील दूर होतो. या प्राण्यांमध्ये देव-देवतांचे रूप असल्याचे बोलले जाते.

These 5 animals are considered to be very lucky if they are kept, there will be happiness and peace in the house
हे ५ प्राणी पाळल्यास घरात सुख-शांती राहते  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वास्तुशास्त्रानुसार घरात काही प्राणी आणि पक्षी ठेवणे शुभ असते.
  • कुत्रा हा भैरवाचा सेवक असल्याचे मानले जाते.
  • वास्तुशास्त्रानुसार घोडा पाळल्याने लकी असल्याचे सिध्द होते.

Vastu Tips In Marathi | मुंबई : वास्तुशास्त्रानुसार घरात काही प्राणी आणि पक्षी ठेवणे शुभ असते. असे मानले जाते की हे प्राणी आणि पक्षी घरात सुख-समृध्दी आणतात. याशिवाय त्यांच्या येण्याने घरातील समस्यांचा त्रास देखील दूर होतो. या प्राण्यांमध्ये देव-देवतांचे रूप असल्याचे बोलले जाते. चला तर मग जाणून घेऊया त्या ५ भाग्यशाली प्राण्यांबद्दल अधिक माहिती. (These 5 animals are considered to be very lucky if they are kept, there will be happiness and peace in the house). 

१) कुत्रा 

dog

कुत्रा हा भैरवाचा सेवक असल्याचे मानले जाते. असे मानले जाते की कुत्रा पाळल्याने लक्ष्मी घरात वास करते. तसेच पैशाच्या आगमनाचा मार्ग मोकळा होतो. याशिवाय कुत्रा कुटुंबातील सदस्यांवर आलेले कोणतेही संकट स्वत:वर ओढवून घेतो. एकूणच एखाद्या ढालीप्रमाणे तो आपले रक्षण करतो. 

२) मासा

वास्तुशास्त्रानुसार घरात मासे पाळणे शुभ आहे. मासे पाळल्याने घरातील दारिद्र्य दूर होते. सोबतच घरात एका सकारात्मक ऊर्जेचे वातावरण निर्माण होते. मत्स्यालयात सोनेरी रंगाचा मासा ठेवणे शुभ मानले जाते. याशिवाय मत्स्यालयात काळा मासा ठेवल्यास कुटुंबातील संकट टळते. 

३) घोडा 

horse

वास्तुशास्त्रानुसार घोडा पाळल्याने लकी असल्याचे सिद्ध होते. घोडा खूप मेहनती आणि कष्टाळू प्राणी आहे. लक्षणीय बाब म्हणजे जर घोडा पाळणे शक्य नसेल तर कमीत कमी त्याचा फोटो किंवा त्याची मूर्ती लावली जाऊ शकते. 

४) कासव 

tortoise

वास्तुशास्त्रानुसार कासवाला पाळल्याने चांगली प्रगती होते. असे बोलले जाते की कासव घरात असल्यास कोणतेही काम लगेचच मार्गी लागते. याशिवाय याला घरात ठेवल्याने माता लक्ष्मीची कृपा राहते. 

५) ससा

rabit

वास्तुशास्त्रानुसार ससा हा सुख-समृध्दीचा प्रतिक असल्याचे म्हटले आहे. ससा पाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा संपते. त्याला पाळल्यास घरात आनंद टिकून राहतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी