लवकरच येणार तुमचे अच्छे दिन, असे ओळखा चांगल्या दिवसांचे 7 शुभ संकेत

चला जाणून घेऊया की चांगले दिवस येणार असल्यास त्याचे काय काय संकेत असतात.

Astro time Sign
Astro good time Sign  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आयुष्यात वेळ ही खूप महत्त्वाची आहे.
  • वाईट किंवा चांगला काळ येण्यापूर्वी निसर्ग आपल्याला त्याबाबतचे अनेक संकेत देतो.
  • गाय घरी आल्यावर तिला नक्कीच पोळी खायला द्या.

नवी दिल्ली: आयुष्यात वेळ ही खूप महत्त्वाची आहे. वेळेला नेहमी महत्त्व असते. आयुष्यात वेळ नेहमी एकसारखी नसते. वेळ ही राजाला गरीब आणि गरीबाला श्रीमंतही बनवू शकते. जेव्हा वेळ वाईट असते तेव्हा सगळीकडे निराशा असते, पण जेव्हा वेळ चांगली असते तेव्हा सर्व समस्या झटकन निघून जातात. आयुष्यात आनंद, समृद्धी, प्रगती, यश, गोडवा येतो. असं म्हणतात की, वाईट किंवा चांगला काळ येण्यापूर्वी निसर्ग आपल्याला त्याबाबतचे अनेक संकेत देतो. चला जाणून घेऊया की चांगले दिवस येणार असल्यास त्याचे काय काय संकेत असतात. 

चांगले दिवस येण्याचे संकेत 

  • जर गाय तुमच्या घराच्या दारात येऊन हंबरत असेल तर ते घराच्या सुखात वाढ होण्याचे संकेत आहेत. अशावेळी गाय घरी आल्यावर तिला नक्कीच पोळी खायला द्या. 
  • घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत चिमण्या आल्या आणि त्यांनी किलबिलाट करत असतील तर समजा तुमच्या आयुष्यात आनंदाचे दिवस लवकरच येणार आहेत.
  • कधी रस्त्यात घोड्याची नाळ दिसली तर ती शुभ मानली जाते. जर शनिवार सोडून इतर कोणत्याही दिवशी वाटेत नाळ सापडली तर ती ठेवावी.
  • कुठेतरी जाताना उजव्या बाजूला साप किंवा माकड दिसलं तर ते धनप्राप्तीचे लक्षण असल्याचं समजून जा. तर सकाळी उठल्यावर पूजेचा नारळ दिसला तर लक्ष्मी मातेची कृपा होणार आहे हे समजून जा. 
  • सुंदर फुलपाखरे देखील शुभतेचे प्रतीक मानलं जातं. जर तुम्हाला अचानक तुमच्या आजूबाजूला रंगीबेरंगी फुलपाखरे दिसली तर समजा तुमच्या आयुष्यात आनंद दार ठोठावत आहे.
  • जेव्हा जेव्हा तुमची चांगली वेळ येणार असेल तेव्हा तुमच्या घरासमोर रूईचं रोप उगवलेले दिसेल. हे देखील खूप शुभ मानलं जातं. 
  • ज्यावेळी तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडत असाल आणि त्याचवेळी एखाद्या व्यक्तीच्या हातात पाण्यानं भरलेले भांडे दिसलं तर ते समृद्धीचे लक्षण असल्याचं मानलं जातं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी