April 2022: प्रेम-पैसा-रोमान्सने भरून जाईल या ३ राशींचे जीवन

भविष्यात काय
Updated Apr 22, 2022 | 18:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

Venus Transit in Aquarius: शुक्राचे राशी परिवर्तन ३ राशींसाठी भरपूर आनंद घेऊन येत आहे. त्यांच्या खाजगी आयुष्यापासून ते प्रोफेशनल लाईफमध्ये त्यांना अनेक लाभ होणार आहेत. 

venus
April 2022: प्रेम-पैसा-रोमान्सने भरून जाईल या ३ राशींचे जीवन 
थोडं पण कामाचं
  • शुक्राचे राशी परिवर्तन वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगला दिवस घेऊन येईल.
  • कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्राचे गोचर भाग्य चमकवणारे असणार आहे.
  • मिथुन राशीच्या लोकांसाठी शुक्राचे राशी परिवर्तन बऱ्याच कारणांनी आनंददायी ठरणार आहे.

मुंबई: प्रेम(love), रोमान्स(romance), सुख आणि सौंदर्याचा कारक ग्रह शुक्र(venus) आहे. जेव्हा तो राशी बदल करतो तेव्हा त्याचा चांगला-वाईट परिणाम सर्व १२ राशींवर होतो. २७ एप्रिल २०२२मध्ये शुक्र ग्रह राशीबदल करत आहे. याचा परिणाम सर्व व्यक्तींवर विविध पद्धतीने होणार आहे. मात्र ३ राशींच्या व्यक्तींना या शुक्र राशीबदलाचा परिणाम खूप शुभ असणार आहे. त्यांना लव्ह पार्टनर मिळू शकतो, विवाह होऊ शकतात आणि भरपूर पैसाही मिळू शकतो. This 3 zodiac sign wil get money, romance and love in his life

अधिक वाचा - 'ब्रह्मास्त्र'च्या स्टारकास्टने घेतली कोट्यवधींची फीज

शुक्राचे होणार कुंभ राशीमध्ये गोचर

आता शुक्र देव शनिची रास कुंभमध्ये आहे. २७ एप्रिल २०२२मध्ये ते मीन राशीमध्ये गोचर करणार आहेत. शुक्राचे गोचर संध्याकाळी ६.०६मिनिटांनीहोईल. हे गोचर ३ राशीच्या व्यक्तींसाठी खूप शुभ असणार आहे. त्यांना जीवनात भरपूर आनंद मिळणार आहे. 

वृषभ राशी - शुक्राचे राशी परिवर्तन वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगला दिवस घेऊन येईल. त्यांची इनकम वाढेल. धनलाभ होईल. अडकलेले पैसे मिळतील. याशिवाय नोकरी आणि व्यापारासाठीही हा काळ चांगला आहे. आवडती नोकरी मिळू शकते. पदोन्नती होऊ शकते. व्यापाऱ्यांना चांगला फायदो होईल. लव्ह पार्टनर मिळू शकतो. लग्न झालेल्यांची नाती अधिक चांगली होतील. 

मिथुन राशी - मिथुन राशीच्या लोकांसाठी शुक्राचे राशी परिवर्तन बऱ्याच कारणांनी आनंददायी ठरणार आहे. त्यांना करिअरमध्ये मोठे यश मिळेल. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. पदोन्नती मिळू शकते. आधी केलेल्या मेहनतीचे फळ एखाद्या अवॉर्डच्या रूपात मिळेल. व्यापाऱ्यांना लाभ मिळेल. परदेशातून फायदे मिळण्याचे योग आहेत. आधी केलेल्या गुंतवणुकीतून चांगले रिटर्न मिळतील. 

अधिक वाचा - हॉस्पिटलमध्ये आयुष्याची लढाई लढतोय हा दिग्गज क्रिकेटर

कर्क राशी - कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्राचे गोचर भाग्य चमकवणारे असणार आहे. त्यांना प्रत्येक कामात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील. प्रमोशन-इन्क्रिमेंट अथवा एखादा अवॉर्ड मिळण्याचे योग आहेत. दूरच्या प्रवासाला जाण्याचे योग आहेत. संपत्ती-गाडी खरेदी करू शकता. जीवनात सुख-सुविधा वाढल्याने तु्म्हाला आनंद मिळणार आहे. खाजगी जीवनात आनंद येईल. सिंगल लोकांना पार्टनर मिळेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी