मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार(astrology) गुरूचे राशी परिवर्तन(zodiac sign transition) सर्व राशींसाठी खूप महत्त्वाचे असते. गेल्या १२ एप्रिलला गुरूने आपली प्रिय राशी मीनमध्ये(pisces) प्रवेश केला आहे. ते पुढील एक वर्ष आता या राशीत राहणार आहेत. देवगुरूचा दर्जा मिळालेली गुरू राशी दरवर्षी राशी बदल करत असते. म्हणजेच पुढील एप्रिल २०२३मध्ये ते आपली रास बदलतील. या संपूर्ण वर्षादरम्यान ते ३ राशींवर चांगलेच मेहरबान असणार आहेत तसेच त्यांच्यावर खूप आनंदाचा वर्षाव करणार आहेत. This 3 zodiac sign will get more money till year 2023
अधिक वाचा - ४९ वर्षीय पाक खासदाराचे तिसरेही लग्न मोडले, वाचा सविस्तर
गुरूच्या मीन राशीत प्रवेश करताच वृषभ राशीसाठी चांगले दिवस सुरू होतील. पुढील एका वर्षापर्यंत गरू ग्रह खूप फायदा देणार आहे. करिअरमध्ये मोठे यश मिळेल. असेही होऊ शकते की करिअरबाबतचे मोठे स्वप्न पूर्ण होऊ शकते. इन्कमममध्ये मोठी वाढ होणार आहे. ज्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या संपतील.तुम्ही चांगले काम कराल आणि सर्वांकडून कौतुक करून घ्याल. याशिवाय लव्हलाईफ, मॅरिड लाईफसाठीही हा चांगला काळ आहे. सिंगल्सना पार्टनर मिळेल. विवाहाची प्रतीक्षा करणाऱ्यांचा विवाह होईल.
मिथुन राीच्या लोकांसाठी ही वेळ करिअर आणि व्यापारात शुभ फळ देईल. त्यांना प्रमोशन मिळू शकेल. सॅलरीमध्ये वाढ मिळेल. काही व्यक्तींना मोठे पद मिळू शकते. व्यापाऱ्यांचे नेटवर्क मजबूत होईल. मीडिया आणि मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठा फायदा होईल.
अधिक वाचा - महाराणा प्रताप जयंती निमित्त शानदार WhatsApp Messages
कर्क राशीच्या लोकांसाठी यावेळेस नशीब पूर्ण साथ देईल. हातात घेतलेले काम होईल. इतकंच नव्हे तर अडकलेली कामेही होतील. प्रवास होईल. त्यात खूप यश मिळेल. व्यापाऱ्यांना लाभ होईल. व्यापार वाढवण्यास मदत मिळेल. शत्रूंवर विजय मिळेल.