Horoscope 2022: नव्या वर्षात २०२२मध्ये या चार राशींवर राहणार गुरूची विशेष कृपा

भविष्यात काय
Updated Dec 15, 2021 | 12:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रह शिक्षण, मान-सन्मान, विवाह, भाग्य, अध्यात्म आणि संतती या गोष्टींचा कारक ग्रह मानला जातो. ज्या जातकांच्या कुंडलीत बृहस्पती बलवान असतात त्यांना अनेक प्रकारचे लाभ मिळतात. जीवनात

horoscope
नव्या वर्षात २०२२मध्ये या चार राशींवर राहणार गुरूची कृपा 
थोडं पण कामाचं
  • गुरु ग्रहएका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी एक वर्षाचा वेळ घेतो
  • गुरू ग्रहाचे राशी परिवर्तन काही राशींसाठी शुभ तर काही राशींसाठी अशुभ ठरते
  • जाणून घ्या कोणत्या ४ राशींसाठी गुरू ग्रह शुभ राहील. 

मुंबई: नवे वर्ष सुरू होण्यास अवघे काही दिवस बाकी आहेत. ज्योतिषशास्त्रात(horoscope) सर्व ९ ग्रहांचे परिवर्तन खूप महत्त्वाचे असते. ग्रहांचे राशी परिवर्तन नेहमीच माणसांच्या जीवनावर प्रभाव टाकते. सर्व ९ ग्रहांमध्ये गुरू ग्रह(jupiter) मोठा मानला जातो. ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला विशेष स्थान देण्यात आले आहे. गुरू ग्रह सर्व ग्रहांच्या अपेक्षेपेक्षा जास्त शुभ ग्रह प्रदान करतो. जातकाच्या कुंडलीतील गुरु ग्रहाचे स्थान आणि राशी(zodiac sign) परिवर्तन यावर विशेष प्रभाव टाकतो. ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रहएका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी एक वर्षाचा वेळ घेतो. गुरु ग्रह सध्या कुंभ राशीमध्ये भ्रमण करत आहे. २०२२ या वर्षात गुरू ग्रह १२ एप्रिलला आपल्या स्वयं राशीमध्ये प्रवेश करेल. गुरू ग्रहाचे राशी परिवर्तन काही राशींसाठी शुभ तर काही राशींसाठी अशुभ ठरते. जाणून घ्या कोणत्या ४ राशींसाठी गुरू ग्रह शुभ राहील. This 4 zodiac sign will be benefitial because of guru

कन्या राशी - २०२२ या वर्षात कन्या राशीच्या जातकांवर गुरूचा शुभ प्रभाव पडेल. कन्या राशीच्या जातकांना वर्षाच्या मध्यावधीत धनलाभ होईल. जुन्या कामात यश मिळेल. तसेच आर्थिक सुधारणा होईल. गुंतवणुकीत फायदा मिळेल. जमीनजुमल्यात चांगला फायदा होईल. मान-सन्मान वाढेल. 

वृश्चिक राशी - २०२२ या वर्षात गुरूचे आपली राशी मीनमध्ये परिवर्तन वृश्चिक राशीसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. यांच्यासाठी गुरूचे परिवर्तन चांगले फलदायी असेल. धनप्राप्तीचे अनेक मार्ग सापडतील. नोकरीमध्ये २०२२ या वर्षात अनेक संधी उपलब्ध होतील. आर्थिक लाभ होतील. यामुळे बँक बॅलन्स वाढेल. 

धनू राशी - २०२२ मध्ये गुरूचे मीन राशीमध्ये गोचर धनू राशीच्या जातकांसाठी चांगला अससेल. गेल्या वर्षातील आव्हाने संपून जातील आणि आर्थिक लाभाच्या अनेक संधी उपलब्ध होतील. जमीन आणि गृहखरेदीमध्ये गुंतवणूक केल्याने तुमच्या बचतीत वाढ होईल. व्यापाऱ्यांना अनेक यश मिळतील. 

कुंभ राशी - २०२२ या वर्षात मनाजोगती कामे आणि प्रगतीच्या संधी निर्माण होतील. गुरूचे गोचर तुम्हाला शुभदायी ठरेल. नोकरीमध्ये प्रमोशन आणि व्यापाऱ्यात फायदा होईल. विवाहेच्छुकांसाठी विवाह होण्याची संधी आहे. 

वैदिक ज्योतिषात गुरू ग्रह

ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रह शिक्षण, मान-सन्मान, विवाह, भाग्य, अध्यात्म आणि संतती या गोष्टींचा कारक ग्रह मानला जातो. ज्या जातकांच्या कुंडलीत बृहस्पती बलवान असतात त्यांना अनेक प्रकारचे लाभ मिळतात. जीवनात धनसंपत्ती, मानसन्मान, प्रतिष्ठा आणि उच्च पदाची प्राप्ती होते. धनू आणि मीन राशीवर गुरु ग्रहाचे अधिपत्य प्राप्त आहे. गुरू ग्र कर्क राशीमध्ये उच्च असतो तर मकर राशीमध्ये नीच असतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी