मुंबई: २०२१हे वर्ष आता अवघ्या काही तासांत संपणार आहे आणि नवे २०२२(year 2022) हे वर्ष सुरू होणार आहे. येणारे हे २०२२ हे नवीन वर्ष आपल्याला कसे जाणार आहेत. आपल्या आयुष्यात काय घडणार. कोणत्या क्षेत्रात प्रगती होणार आणि कोणत्या नव्या संधी उपलब्ध होणार हे जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकाला असते. ज्योतिषशास्त्रानुसार(horoscope) ग्रहांचा माणसाच्या जीवनवर प्रभाव पडत असतो. जव्हा एखादा ग्रह राशी परिवर्तन करतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व १२ राशींच्या व्यक्तींवर होत. ज्योतिषशास्त्रानुसार २०२२ या वर्षात त्रिग्रही योग निर्माण होत आहे ज्याचा सरळ परिणाम मनुष्याच्या जीवनावर पडणार आहे. This 4 zodiac sign will get benefit in new year 2022
२०२२ या वर्षात शनी मकर राशीत त्रिग्रही योग बनवत आहे. शनी ग्रह आधीपासून मकर राशीत स्थित आहे ५ जानेवारीला बुधही या राशीत पोहोचणार आहे आणि यानंतर १४ जानेवारीला सूर्यही मकर राशीत गोचर करत आहे. मकर राशीत शनी, सूर्य आणि बुध या ग्रहांच्या युतीने त्रिग्रही योग बनत आहे. हा योग काही राशींसाठी अशुभ असणार आहे तर काही राशींसाठी शुभ असणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या ४ राशी ज्यांना धनलाभ होऊ शकतो.
कन्या राशी - त्रिग्रही योग बनण्याने कन्या राशीच्या व्यक्तींना भाग्याची साथ लाभेल. हे लोक जे काम हातील घेतील त्यात त्यांना लाभ मिळेल. कन्या राशीसूर्याचा म बुध ग्रहाची राशी आहे. यासाठी यांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल होतील. या लोकांना नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. सोबतच पगार वाढण्याचीही शक्यता आहे. करिअरमध्ये चांगली ग्रोथ होण्याची शक्यता आहे.
वृषभ राशी - या राशीच्या लोकांसाठी हा योग म्हणजे आर्थिक रूपाने सकारात्मक राहील. तुम्हाला अचानक धनलाभाची प्राप्ती होऊ शकते. वृषभ राशीवर शुक्र देवाचे अधिपत्य आहे आणि ज्योतिषानुसार शुक्र ग्रह आणि शनी ग्रह यांच्यात मित्रतेचा भाव आहे. कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळू शकते. जर अनेक महिन्यांपासून तुमचे इन्क्रिमेंट थांबले असेल तर त्यासाठी हा योग्य काळ आहे. या वर्षी मार्चनंतर विवाहाचे योग बनतात.
तूळ राशी - ज्योतिषानुसार या राशीच्या लोकांसाठी हा योग खूपच फलदायी सिद्ध होईल. तूळ राशीवर शुक्र देवाचे अधिपत्य आहे आणि शुक्र ग्र आणि शनि देव यांच्यात मित्रतेचा भाव आहे. यासाठी या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण होतील. जेव्हा एखादा ग्रह कुंडलीच्या पाचव्या, दहाव्या आणि अकराव्या भावात गोचर करतो तेव्हा करिअरमध्ये बदल आणि नवीन नोकरी मिळण्याची शक्यता असते. नोकरीमध्ये बदलासोबतच चांगल्या प्रगतीच्या दाट शक्यता आहेत.
धनू राशी - या राशीच्या व्यक्तींसाठी नव्या वर्षात धन कमावण्याची संधी आहे. त्रिग्रही योगाची निर्मिती तुमच्यासाठी शुभ असेल. ऑफिसमध्ये तुमचा बॉस तुमच्या कामावर खुश राहील. सोबतच पगारवाढ होण्याचीही शक्यता आहे. विविध माध्यमातून धनप्राप्ती होऊ शकते. या वर्षी तुम्हाला एकापेक्षा अधिक माध्यमातून धन प्राप्ती होईल.