मुंबई: मे २०२२ ज्योतिषाच्या(astrology) नजरेतून पाहायचे झाल्यास खूप खास राहणार आहे. या महिन्यात ४ महत्त्वाचे ग्रह(planet transist) राशी बदलणार आहेत. याशिवाय वर्षातील पहिले चंद्रग्रहणही असणार आहे. १० मेला बुध(venus) उलटी चाल खेळणार आहे त्यानंतर १४ मेला सूर्य(sun) आणि त्यानंतर १७ मेला मंगळाचे(mars) राशी परिवर्तन होणार आहे. यातच १६ मेला चंद्र ग्रहण लागणार आहे. ज्योतिष गणनेनुसार हे सर्व बदल ५ राशींच्या लोकांसाठी चांगले दिवस घेऊन येणार आहेत. जाणून घ्या मे महिना कोणत्या राशींसाठी लकी ठरणार आहे. This 5 zodiac sign people start good days after 5 days
अधिक वाचा - लग्नात नवरीने घातला चक्क २४ कॅरेट सोन्याचा ड्रेस
वृषभ (Taurus)-वृषभ राशींच्या लोकांसाठी मे महिना अनेक प्रकारची सुखे घेऊन येणारा आहे. थांबलेली सर्व महत्त्वाची कामे या महिन्यात धडाधड होतील. नवी नोकरी मिळू शकते. जीवनात लव्ह रोमान्सची एंट्री होणार.
कन्या (Virgo)- कन्या राशीच्या लोकांसाठी ही वेळ शुभ राहणार आहे. त्यांना करिअरमध्ये चांगली वाढ मिळणार आहे. सरकारी क्षेत्राशी संबंधित लोकांना मोठे लाभ होतील. आतापर्यंतच्या समस्या संपतील.
तूळ(Libra)-तूळ राशीच्या लोकांना मे महिन्यात होत असलेले गोचर करिअरच्या दृष्टीने लाभदायक ठरणार आहेत. नवी नोकरी मिळू शकते. प्रमोशन अथवा इन्क्रिमेंट होईल. व्यापाराशी संबंधित व्यक्तींना मोठी ऑर्डर मिळू शकते. कोणतेही नवे काम सुरू करू शकता.
मकर (Capricorn)- मकर राशीच्या लोकांसाठी मे मध्ये होणार ग्रह परिवर्तन करिअरमध्ये लाभदायक ठरणार आहेत. त्यांना मोठे यश मिळणार आहे. बेरोजगारांना नोकरी मिळेल. पदोन्नतीचे तेच पगारवाढीचे संकेत आहेत. ज्यांना परदेशात जाण्याचे स्वप्न आहे त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते.
अधिक वाचा - तिसऱ्या मुलाला जन्म द्या अन् मिळवा ११ लाख रूपये
मीन (Pisces)- मीन राशीच्या व्यक्तींसाठी मे महिन्यात करिअरमध्ये मोठा फायदा होणार आहे. त्यांना जबरदस्त प्रगती होणार आहे. इन्कमही वाढेल. मनपसंत नोकरी मिळेल. ज्यांना ट्रान्सफरची अपेक्षा होती त्यांची इच्छा पूर्ण होईल. एकूण मिळून वेळ चांगली असणार आहे.