2021 Astrology Predictions: २०२१मध्ये २० वर्षांनंतर येत आहे 'हा' अशुभ योग, यावर्षी कोरोना पूर्णपणे संपणार नाही

भविष्यात काय
Updated Jan 02, 2021 | 16:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

२०२१मध्ये गुरू आणि शनी हे कुंभ राशीत प्रवेश करतील. हे दोन ग्रह २० वर्षांनंतर एकत्र येणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घ्या २०२१ हे वर्ष आपल्यासाठी काय काय आव्हाने घेऊन येणार आहे.

2021 year predictions
२०२१मध्ये २० वर्षांनंतर येत आहे हा अशुभ योग, यावर्षी कोरोना पूर्णपणे संपणार नाही 

थोडं पण कामाचं

  • संपूर्ण जगासाठी खडतर ठरलेले २०२०चे वर्ष संपले
  • लोकांना २०२१ या नववर्षाकडून खूप अपेक्षा आहेत
  • २०२१मध्ये २० वर्षांनंतर एक अशुभ योग येणार आहे

नवी दिल्ली: संपूर्ण जगासाठी (World) खडतर ठरलेले २०२०चे वर्ष संपले आहे. कोरोना (corona pandemic), लॉकडाऊन (lockdown), आर्थिक मंदी (economic recession), सीमांवर तणाव (border tensions) आणि मजूरांच्या स्थलांतर (labor migration) या घटनांमुळे गेली अनेक वर्षे २०२० लोकांच्या स्मरणात राहील. संपूर्ण जगाच्या आशेची (hope) दोरी आता २०२१ या नववर्षाच्या हातात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार (astrology) जाणून घ्या २०२१ हे वर्ष आपल्यासाठी काय काय आव्हाने (challenges) घेऊन येणार आहे.

नववर्ष २०२१साठी काय आहेत ज्योतिषशास्त्रतज्ञांचे अंदाज

वैदिक ज्योतिषी आचार्य डॉ. निर्मल त्रिपाठी यांच्या अंदाजानुसार, १४ जानेवारी रोजी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. मकर ही शनीची स्वामीरास आहे. तर गुरू आणि शनी कुंभ राशीत प्रवेश करतील. हे दोन्ही ग्रह दर २० वर्षांनी एकत्र येतात. २०२१मध्ये या दोन ग्रहांचे २०० वर्षांचे चक्र पूर्ण होणार आहे. शनी आणि गुरूचे एकत्र येणे अशुभ मानले जाते. पहिल्या त्रैमासिकात कोरोनाच संपण्याची लक्षणे दिसत आहेत, मात्र हा पूर्णपणे संपणार नाही. २०२१मध्ये मिथुन, धनू आणि वृश्चिक राशीच्यांनी एप्रिलपर्यंत थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

हा काळ असेल अवघड

६ एप्रिलनंतर गुरू आणि शनीच्या युतीमुळे एखादी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते ज्यामुळे जीवितहानी किंवा वित्तहानी होऊ शकते. त्यामुळे एप्रिलपासून सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंतचा काळ अवघड असू शकतो. भारताची रास मकर आहे. मकर राशीत साडेसाती चालू आहे. याशिवाय मेपासून ऑगस्टपर्यंत देशात धार्मिक तणावाची परिस्थिती निर्माण होण्याचीही शक्यता आहे. जागतिक दृष्टिकोनातून अमेरिका, फ्रान्स आणि युरोपचे देश मिळून चीनवर आंतरराष्ट्रीय दबाव आणू शकतील. याचा फायदा भारताला होईल.

अर्थव्यवस्थेत होणार काहीशी प्रगती

२०२०च्या तुलनेत २०२१ हे वर्ष अनुकूल असेल. भारताच्या अर्थव्यवस्थेत थोडी तेजी येईल आणि रोजगार वाढतील. बुध ग्रह वक्र असल्याने आयटी, संचार आणि डिजिटल सेक्टरला यावर्षी फायदा होईल. २०२१मध्ये महागाई वाढेल. सोने, तेलाच्या किंमती वाढतील. तर रिअल इस्टेट क्षेत्रात मंदी येऊ शकते. याशिवाय स्टील, लोखंड यांच्या किंमती कमी होऊ शकतात.

२०२२मध्ये परिस्थिती सुधारणार

२०२२च्या एप्रिल महिन्यात मीन, बृहस्पती आणि शनीचे गोचर होईल. या तीन राशींचा स्वभाव एकसारखा असतो. त्यामुळे २०२२पासून २०२३पर्यंत जागतिक आर्थिक संकट संपेल. २०२२मध्ये कोरोनाचे संकटही संपेल. त्यामुळे भारतासह संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेत तेजी येईल. २०२१मध्ये चंद्र पुष्य नक्षत्रात आहे आणि हस्त नक्षत्रात गोचर करत आहे. २०२१मध्ये जे लोक विवाह करतील त्यांच्यासाठी हे वर्ष भाग्यदायी असणार आहे. २०२१ हे वर्ष संकटातून वर येण्याचे असणार आहे ज्यात काही अडचणीही येऊ शकतात.    

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी