Zodiac Sign:या राशीचे लोक असतात प्रचंड रागीट, रागामध्ये गमावतात नियंत्रण

भविष्यात काय
Updated May 27, 2022 | 14:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

Zodiac Sign:ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीच्या व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. आज आम्ही तुम्हाला त्या राशीबद्दल सांगणार आहोत ज्यांचा स्वभाव प्रचंड रागीट असतो. यांच्याशी दुश्मनी घेणे परवडणारे नसते. 

angry
या राशीचे लोक असतात प्रचंड रागीट, रागामध्ये गमावतात नियंत्रण 
थोडं पण कामाचं
  • वृषभ राशीच्या व्यक्तींचा स्वभाव अतिशय तापट असतो.
  • सिंह राशीच्या व्यक्तीही रागीट असतात.
  • वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मान-सन्मान अतिशय प्रिय असतो.

मुंबई: प्रत्येक व्यक्तीचा स्वत:चा एक स्वभाव असतो. त्या राशीनुसार(zodiac sign people) त्या व्यक्तीचा स्वभाव, भविष्य आणि व्यक्तिमत्व ठरत असते. काही राशींच्या व्यक्ती खूप शांत असतात तर काही खूप रागीट(angry) असतात. प्रत्येकाची आवड-निवड ही वेगळी असते. ज्योतिषशास्त्रात अशा ४ राशींबाबत सांगितले आहे ज्यांना खूप राग येतो. तसेच छोट्या-छोट्या गोष्टींवरून हे लोक चिडतात. त्यांचे रागावर नियंत्रण  नसते. या लोकांपासून जरा सजगच राहिले पाहिजे. जाणून घेऊया या राशींबद्दल...This zodiac sign people are very angry

अधिक वाचा - संपूर्ण देशात 75 हजार सरोवर करण्याचा संकल्प - नितीन गडकरी

मेष रास

ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. याच्या प्रभावामुळे या व्यक्तींचा स्वभावही गरम असतो. तशा तर या व्यक्ती मस्त बिलंदर असतात मात्र जेव्हा यांना राग येतो तेव्हा त्यांना शांत करणे कठीण होते. या व्यक्ती कोणत्याही गोष्टी आपल्या मनाला लावून घेतात. तसेच रागात आपले नियंत्रण गमावतात.

 

वृषभ रास

वृषभ राशीच्या व्यक्तींचा स्वभाव अतिशय तापट असतो. यांना चुकीची गोष्ट अजिबात आवडत नाही. रागामध्ये ते आपल्या मनातील खदखद बाहेर काढतात. बोलताना काहीही बोलून जातात. त्यांचे स्वत:वरील नियंत्रण सुटते आणि काहीही बोलून मोकळ्या होतात. अनेकदा या चुकीमुळे त्याचे स्वत:चेच नुकसान होते. 

सिंह रास

सिंह राशीच्या व्यक्तीही रागीट असतात. जर या लोकांना एकदा राग आला तर त्या कोणाचेच ऐकत नाहीत. या व्यक्ती थोडंस कोणी बोललं तरी मनाला लावून घेतात. रागामध्ये त्यांना चांगले काय वाईट काय हे कळत नाही. अनेकदा स्वत:चेच त्यांचे नुकसान होते. 

अधिक वाचा - सोन्याच्या भावात कासवाच्या गतीने वाढ, चांदीची चमक वाढली

वृश्चिक रास 

या राशीच्या व्यक्तींना मान-सन्मान अतिशय प्रिय असतो. जर यांच्या मनाला कोणी ठेस पोहोचवली तर त्या व्यक्तीला या सोडत नाहीत आणि स्वत:वरील नियंत्रण गमावतात. यांच्या मनाला गोष्टी पटकन लागतात. जर यांना एकदा राग आला तर तो लवकर जात नाही. यांना शांत होण्यास वेळ लागतो.  
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी