Zodiac sign: या राशीच्या मुलींसाठी सोपे नाही पती आणि सासरच्यांना खुश ठेवणे...तुमची रास यात नाही ना?

भविष्यात काय
Updated Jun 02, 2022 | 17:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार राशी आणि ग्रहांच्या स्थितीवरून सासरबाबत जाणून घेतले जाऊ शकते.ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या मुलींना लग्नाच्या सुरूवातीनंतर अनेक प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. 

marriage
पती - सासरच्यांना खुश ठेवणे या राशीच्या मुलींसाठी नाही सोपे  
थोडं पण कामाचं
  • ज्योतिषानुसार व्यक्तीच्या कुंडलीचा सातवा भाग महत्त्वाचा असतो.
  • सातव्या भागात व्यक्तीच्या दाम्पत्य जीवनाबद्दल सांगण्यात आले आहे.
  • या राशीच्या मुलींना लग्नानंतर सुरूवातीला सासरच्या ठिकाणी काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. 

मुंबई: प्रत्येक आई-वडिलांना ही चिंता सतावत असते की त्यांच्या मुलीला कसे सासर मिळणार. यावरून ते खूप चिंतेत असतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का ज्योतिषशास्त्रावरूनही(astrology) याबबात माहिती मिळवली जाऊ शकते की लग्नानंतर मुलीचे सासर(sasural0 कसे असणार आहे. कुंडलीच्या(kundli) सप्तम म्हणजे सातव्या घरावरून याबाबत माहिती मिळवली जाऊ शकते. ज्योतिषानुसार जेव्हा व्यक्तीच्या या घरात पाप आणि क्रूर ग्रहाची दृष्टी असते तेव्हा त्या व्यक्तीला विविध प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागतो. 

अधिक वाचा - सौदीत बनणार जगातील सर्वात मोठी इमारत

ज्योतिषानुसार व्यक्तीच्या कुंडलीचा सातवा भाग महत्त्वाचा असतो. सातव्या भागात व्यक्तीच्या दाम्पत्य जीवनाबद्दल सांगण्यात आले आहे. या राशीच्या मुलींना लग्नानंतर सुरूवातीला सासरच्या ठिकाणी काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. 

या राशीच्या मुलींना सासरी करावा लागतो आव्हानांचा सामना

कर्क रास

कर्क राशीच्या मुली लग्नानंतर सासरच्यांसोबत ताळमेळ बसवण्यात थोडे कठीण जाते. या मुली स्वभावाने भावनात्मक असतात. यांचा स्वामी ग्रह चंद्रमा अतो. चंद्रमा हा मनाचा कारक असतो. या कारणामुळे या राशीच्या मुलींना सासरच्या ठिकाणी, पती, सासू-सासरे यांच्यासोबत सामंजस्य करण्यात काही अडथळ्यांचा सामना करावा ागतो. मात्र हे सगळे ठीक होण्यास काही काळ लागतो. त्यामुळे जास्त घाबरण्याची गरज नाही. ज्या मुलींचे नाव ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो, वे ने सुरू होते त्यांची रास कर्क असते. 

अधिक वाचा - मासिक पाळीमुळे शरीरावर आणि मनावर होणारे परिणाम

मकर रास

ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीच्या मुली स्टेट फॉरवर्ड असतात. याच कारणामुळे या मुलींना अनेक प्रकारच्या त्रासांचा सामना करावा लागतो. मकर राशीचा स्वामी शनी देव आहे. या राशीवर शनीचा प्रभाव असतो. शनिदेव न्यायाची देवता आणि कर्मफलदाता नावाने ओळखला जातो. याच कारणामुळे राशीचे लोक योग्यला योग्य आणि चुकीला चूक म्हणण्यात वेळ घालवत नाहीत. या राशीच्या मुली प्रत्येक काम गंभीरतेने करतात. तोंडावर जे काही असे ते बोलतात. ही बऱ्यादचा त्यांची घाई ठरते. मात्र वेळेसोबत हळू हळू सगळ्यांची मने जिंकून घेतात. कोणत्याही समस्येचा सामना या मुली मजबूतीने करतात.  भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी, है, नावापासून सुरू होणाऱ्या मुली मकर राशीच्या असतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी