Zodiac sign: एप्रिलमध्ये या राशींचे बदलणार नशीब! लक्ष्मी मातेची राहणार विशेष कृपा

भविष्यात काय
Updated Mar 29, 2022 | 22:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह-नक्षत्रांनुसार एप्रिल महिना काही राशींसाठी खास राहणार आहे. या महिन्यांत अनेक ग्रह परिवर्तन होणार आहे. ग्रहांच्या परिवर्तनाचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे. 

astrology
Zodiac sign: एप्रिलमध्ये या राशींचे बदलणार नशीब!  
थोडं पण कामाचं
  • होणार आर्थिक लाभ
  • नोकरीमध्ये लाभ होण्याची शक्यता
  • शनी देव राहतील मेहरबान

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार(astrology) ग्रह-नक्षत्रांच्या दृष्टिकोनातून एप्रिल महिना काही राशींसाठी खास असणार आहे. खरंतर, या महिन्यात अनेक ग्रहांमध्ये राशी परिवर्तन होत आहे. याशिवाय अनेक नक्षत्रांचेही परिवर्तन होणार आहे. ग्रह-नक्षत्रांचा परिणाम सर्व राशींवर होत असतो. अनेकदा यामुळे काही जातकांना त्रास सहन करावा लागतो तर काहींना याचा आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो. अशातच जाणून घ्या एप्रिल महिन्यात कोणत्या ग्रहांचे राशीपरिवर्तन होणार आहे आणि कोणत्या राशींना जबरदस्त फायदा होणार आहे. This zodiac sign will change there future

अधिक वाचा - 'अमोलने राजकारणाच्या गटारगंगेत वक्तृत्वाची तलवार चालवू नये'

एप्रिल २०२२मध्ये ग्रहांचे गोचर

ज्योतिषशास्त्रानुसार ७ एप्रिलला मंगळ कुंभ राशीत गोचर करेल. यानंतर पुढील दिवशी ८ एप्रिलला बुध, मेष राशीत प्रवेश करेल. यानंतर १२ एप्रिलपासून राहु-केतु उलटी चाल चालणार आहे. राहु मेष राशीमध्ये तर केतु तुला राशीमध्ये प्रवेश करेल. १३ एप्रिलला बृहस्पती देव मीन राशीमध्ये गोचर करेल. १४ एप्रिलला सूर्य मेष राशीमध्ये गोचर करेल. २७ एप्रिलला बुध वृषभ राशीत प्रवेश करेल. महिन्याच्या अखेरीस २९ एप्रिलला शनी देव कुंभ राशीत गोचर करेल. 

या राशींना होणार जबरदस्त फायदा

मिथुन (Gemini): एप्रिलचा महिना मिथुनराशीसाठी खूप लाभदायक ठरणार आहे. खरंतर, या राशीमध्ये शनिच्या ढय्येचा प्रभाव राहणार आहे. दरम्यान, शनीच्या राशी परिवर्तनसह या जातकांना शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल..यामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. नवीन बातमी ऐकायला मिळू शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. याशिवाय लग्नात येणारे अडथळे दूर होतील. 

कन्या (Virgo):एप्रिल महिना कन्या राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकतो. नोकरीमध्ये परिवर्तनाचे योग आहेत. सराकरी नोकरी करणाऱ्या व्यक्तींचे स्थान परिवर्तन होऊ शकते. कार्यालयात मान-सन्मान वाढू शकतो. उत्पन्नाचे स्त्रोत बनतील. याशिवाय नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. घरात आनंदाचे वातावरण राहील. 

अधिक वाचा - या लोकांसाठी आधार-पॅन लिंक करणे आवश्यक नाही, तुमचे काय...

मकर (Capricorn): या वेळेस मकर राशीत शनी आहे. २९ एप्रिलला शनी देव मकरमधून निघून कुंभ राशीत प्रवेश करेल. शनीच्या राशी परिवर्तनामुळे आर्थिक स्थिती अधिक दृढ होईल. सोबतच या महिन्यात भाग्याची साथ मिळेल. नोकरीमध्ये अनेक लाभाच्या संधी मिळतील. रागावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी