Astrology: १० ऑगस्ट पर्यंत या ४ राशीतील लोक होणार मालामाल; २७ जूनपासून सुरू होतील 'अच्छे दिन'

भविष्यात काय
Updated Jun 21, 2022 | 16:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mangal Gochar 2022 |  मंगळ हा धैर्य आणि पराक्रमाचा कारक ग्रह मानला जातो. मंगळदेव २७ जून रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहेत. मंगळ ग्रहाच्या या राशी परिवर्तनाचा प्रभाव मेष ते मीन राशीवर राहील.

till August 10 people in these 4 zodiac signs will be wealthy
१० ऑगस्ट पर्यंत या ४ राशीतील लोक होणार मालामाल, वाचा सविस्तर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मंगळ हा धैर्य आणि पराक्रमाचा कारक ग्रह मानला जातो.
  • मंगळदेव २७ जून रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहेत.
  • मंगळ ग्रहाच्या या राशी परिवर्तनाचा प्रभाव मेष ते मीन राशीवर राहील.

Mangal Transit in Mesh Rashi 2022 । मुंबई : मंगळ हा धैर्य आणि पराक्रमाचा कारक ग्रह मानला जातो. मंगळदेव २७ जून रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहेत. मंगळ ग्रहाच्या या राशी परिवर्तनाचा प्रभाव मेष ते मीन राशीवर राहील. परंतु काही राशींना मंगळ राशी परिवर्तनाचा जबरदस्त लाभ मिळेल. १० ऑगस्टपर्यंत मंगळ या राशीत राहणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे मंगळ मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशीतील लोकांचे नशीब या काळात चमकणार आहे. (till August 10 people in these 4 zodiac signs will be wealthy). 

अधिक वाचा : एकनाथ शिंदेंच्या नाराजीची ही आहेत प्रमुख कारणे 

 या ४ राशीतील लोक होणार मालामाल

  1. मेष राशी - मेष राशीच्या लोकांसाठी मंगळ ग्रह अत्यंत लाभदायक ठरू शकतो. या काळात तुम्हाला करिअर आणि व्यवसायात शुभ परिणाम मिळतील. भागीदारीच्या कामात यश मिळू शकते. मंगळाचे संक्रमणामुळे तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळू शकते. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. कामगिरीत सुधारणा होऊ शकते. जोडीदारासोबत तुमचा वेळ आनंदात जाईल.
  2. मिथुन राशी - ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण शुभ राहील. नोकरीत तुम्हाला चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होतील. उत्पन्नात वाढ होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा सुधारेल.
  3. सिंह राशी - सिंह राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात शुभ परिणाम मिळू शकतात. गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल आहे. अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होऊ शकतात. पैसा येण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील आणि तुमची प्रतिमा सुधारेल.
  4. तूळ राशी - तूळ राशीच्या लोकांचे नोकरीमध्ये प्रमोशन होऊ शकते. करिअरच्या दृष्टीने हा काळ चांगला आहे. भागीदारीच्या कामात आर्थिक लाभ होऊ शकतो. वैवाहिक जीवन सुखकर राहील. मुलाच्या बाजूने चांगली बातमी मिळू शकते.


डिस्क्लेमर : वरील दिलेल्या गोष्टी या पूर्वापारपासून सुरू असलेल्या मान्यता आहेत. त्यामुळे टाइम्स नाऊ मराठी या सर्वांचे समर्थन करत नाही. अनेकांच्या मान्यतांचा सन्मान करून वरील गोष्टी दिलेल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी