राशीभविष्य : शनि जयंती आणि सूर्यग्रहण 'या' राशींना लाभणार

Daily Horoscope राशी भविष्य 10 जून 2021 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

horoscope
राशीभविष्य : सोमवार, १० जून २०२१ 

थोडं पण कामाचं

 • राशीभविष्य : शनि जयंती आणि सूर्यग्रहण 'या' राशींना लाभणार
 • राशीभविष्य : सोमवार, १० जून २०२१
 • काय आहे आपले भविष्य?

Daily Horoscope, राशी भविष्य 10 June 2021 : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

शनि जयंती विशेष

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: नोकरी करणाऱ्या व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग - लाल.
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी दिवस खूपच चांगला असेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - निळा.
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: ऑफिसमधील कामं बऱ्याच मेहनतीनंतर पूर्ण होतील. वाद विवाद टाळा. शुभ रंग - निळा.
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेलं काम पूर्ण होईल. आयटी तसेच मीडिया क्षेत्रातील व्यक्तींना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. शुभ रंग - केशरी.
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना वरिष्ठांचे आशीर्वाद मिळतील. बाहेरील खाद्य-पदार्थ खाणं टाळा. शुभ रंग - पिवळा.
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: व्यवसायात चांगलं यश प्राप्त होईल. बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना चांगले यश मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना चांगली बातमी मिळेल. कौटुंबिक आयुष्य आनंदमय असेल. आनंदाची बातमी मिळेल. शुभ रंग - निळा.
 7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील. वाद टाळा आणि गोड बोलून काम साधा. शुभ रंग - हिरवा.
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: मीडिया, आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील व्यक्ती आपलं काम वेळेआधी पूर्ण करतील. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग - पांढरा.
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी संघर्षाचा असेल. लेखन आणि सिनेक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी दिवस चांगला जाईल. वायफळ खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. शुभ रंग - पिवळा.
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: व्यवसायात एखाद्या व्यक्तीला पैसे देताना सावधानता बाळगा. प्रलंबित काम पूर्ण होईल, धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आयुष्य आनंदी असेल. आरोग्य चांगले असेल. शुभ रंग - निळा.
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: कामात चांगली प्रगती कराल.  धनलाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग- हिरवा.
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: एखाद्या कामाचे पैसे बऱ्याच दिवसांनंतर आता मिळण्याची शक्यता आहे. मित्रांच्या भेटीगाठी होतील. कामात प्रगती होईल. आरोग्याची समस्या जाणवू शकते. शुभ रंग - पांढरा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी