राशीभविष्य : रविवार १० ऑक्टोबर २०२१

Daily Horoscope राशी भविष्य, १० ऑक्टोबर २०२१ : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

today horoscope, bhavishya in marathi, rashi bhavishya, bhavishya, 10 october 2021 sunday
राशीभविष्य : रविवार १० ऑक्टोबर २०२१ 

थोडं पण कामाचं

 • राशीभविष्य : रविवार १० ऑक्टोबर २०२१
 • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
 • काय आहे आपले भविष्य?

राशी भविष्य 10 october 2021 : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

 1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope: प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवल्यास यश मिळेल. ओळखीतल्यांचे सहकार्य लाभेल. गृहसौख्य लाभेल. जवळच्यांना वेळ देणे आवश्यक आहे. शुभ रंग - किरमिजी
 2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope: वेळ पाहून बोलणे आणि योग्य वेळी संधी साधणे हिताचे ठरेल. जबाबदारीने काम केल्यास फायदा होईल. नियोजन लाभाचे आहे. शुभ रंग - निळा
 3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope: ज्येष्ठांचा आदर करा. चर्चेतून तोडगा सापडेल. जाणत्यांचे सल्ले लाभदायी ठरतील. रखडलेली कामं पूर्ण होतील. शुभ रंग - पोपटी
 4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope: ऊर्जेचा सकारात्मक वापर लाभ मिळवून देईल. लेखनकार्य फायद्याचे ठरेल. वाणी, संयम आणि कृतीवर भर दिल्यास प्रगती होईल. शुभ रंग - पांढरा
 5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope: जाणत्यांचा सल्ला हिताचा आहे. चर्चेने प्रश्न सोडवू शकाल. शब्द जपून वापरा. शुभ रंग - गुलाबी
 6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope: शब्द, वेळ आणि पैसा यांचे नियोजन अत्यावश्यक आहे. परिस्थितीशी जुळवून घेणे लाभाचे आहे. प्रयत्नांमध्ये सातत्य राखा. शुभ रंग - हिरवा
 7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope: दक्षता घ्यावयास हवी. गोड बोलुन कार्यभाग साधण्याचे धोरण स्विकारावे. झेपतील अशाच जबाबदाऱ्या स्विकारा. थोडे हिशोबी राहणे आवश्यक आहे. शुभ रंग - आकाशी
 8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope: परिस्थितीशी जुळवून घेणे लाभाचे. घरच्यांना वेळ द्याल. चर्चेतून मार्ग काढाल.  शुभ रंग - नारिंगी
 9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope: तब्येत सांभाळा. शब्द, पैसा आणि वेळ यांचे नियोजन फायद्याचे ठरेल. शुभ रंग - पिवळा
 10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope: आर्थिक नियोजन हिताचे. कोणतीही कृती विचारपूर्वक आणि आवश्यक ती चौकशी करुनच करा. शुभ रंग - जांभळा
 11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope: जबाबदाऱ्या सांभाळूनच धाडस करा. कार्यात सातत्य राखल्यास आत्मविश्वास वाढेल. व्यवहार करताना सावधानता बाळगावयास हवी. शुभ रंग - तपकिरी
 12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope: प्रयत्नांमधील सातत्य यश मिळवून देईल. आर्थिक नियोजनावर भर देणे हिताचे. शुभ रंग - सोनेरी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी