राशीभविष्य : सोमवार, २१ जून २०२१

Daily Horoscope राशी भविष्य, 21 जून 2021 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

horoscope
राशीभविष्य : सोमवार, २१ जून २०२१ 

थोडं पण कामाचं

  • आजचे राशीभविष्य : सोमवार, २१ जून २०२१
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

राशी भविष्य 21 June 2021 : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today:  अडचणीतून मार्ग शोधावा लागेल. संयम बाळगा. वाद टाळणे हिताचे. वेळ पाळणे लाभाचे. पैशांचे नियोजन महत्त्वाचे. शुभ रंग - किरमिजी
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: व्यावहारिक राहणे हिताचे. निर्णय घेताना घाई नको. संयम लाभदायी आहे. गोड बोलाल तर वाद टाळाल. स्वतःची आणि घरच्यांची तब्येत जपाल तर आनंदात राहाल. घरच्यांना वेळ द्या आणि रिलॅक्स राहा. शुभ रंग - आकाशी
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: राग आवराल, माणसांचा आदर कराल तर अनेकांची मनं जिंकाल. प्रभाव पाडाल तर यशस्वी व्हाल. प्रयत्न कराल तर प्रगती कराल. शुभ रंग - मोरपिशी
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: नव्या ओळखी होतील आणि लाभ होईल. पैशांची आवक वाढेल. प्रगती होईल. विचारपूर्वक काम कराल तर कमाल कराल. शुभ रंग - निळा
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: प्रयत्न कराल तर यश मिळवाल. नम्र स्वभाव यशाचं मोल वाढवेल. शब्द आणि पैसा जपून वापराल तर लाभ होईल. शुभ रंग - लाल
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: हिशेबी राहा. व्यावहारिक भान राखणे हिताचे. वेळ आणि पैसा यांचे नियोजन करा. अनावश्यक खर्च टाळणे लाभाचे. तब्येत जपा. वाद टाळा. शुभ रंग - मोरपिशी
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today:  सामंजस्य राखा. गोड बोलून काम साधाल. प्रगती कराल. वेळ आणि पैसा यांचे नियोजन करा. इतरांवर प्रभाव पाडाल. शुभ रंग - आकाशी
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: शब्द, पैसा आणि वेळ यांचा जपून वापर करा. हुशारीने वागाल तर अडचणी सोडवाल. तब्येत जपा. सामंजस्य लाभाचे. शुभ रंग - गुलाबी
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today:  हिशेबी राहा, व्यावहारिक भान राखा. शब्द, पैसा आणि वेळ यांचा जपून वापर करा. हुशारीने वागाल तर प्रगती साधाल. विचारपूर्वक काम कराल तर कमाल कराल. शुभ रंग - तपकिरी
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: हाती घेतलेली जबाबदारी चोख पार पाडाल. इतरांवर प्रभाव पाडाल. प्रगती कराल. शुभ रंग - जांभळा
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: संयमाने आणि विचारपूर्वक कृती करणे लाभाचे. शब्द, पैसा आणि वेळ यांचा जपून वापर करा. तब्येत जपा. सामंजस्य लाभाचे. शुभ रंग - जांभळा
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: प्रयत्न कराल तर यश मिळवाल. प्रामाणिक राहाल तर प्रगती कराल. व्यावहारिक राहाल तर यशस्वी व्हाल. शुभ रंग - पिवळा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी