राशीभविष्य : शुक्रवार २२ ऑक्टोबर २०२१

भविष्यात काय
Updated Oct 22, 2021 | 02:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

Daily Horoscope राशी भविष्य, 22 ऑक्टोबर 2021 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

today horoscope, bhavishya in marathi, rashi bhavishya, bhavishya, 22 october 2021 friday
राशीभविष्य : शुक्रवार २२ ऑक्टोबर २०२१ 
थोडं पण कामाचं
  • राशीभविष्य : शुक्रवार २२ ऑक्टोबर २०२१
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

Horoscope Today 22 October 2021 : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope: कृती करण्याआधी तसेच बोलण्याआधी विचार करणे हिताचे. स्वभावात परिस्थितीनुरुप बदल करणे फायद्याचे. शुभ रंग - किरमिजी
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope: शब्द जपून वापरणे, वेळेच्या बाबतीत काटेकोर राहणे आणि वास्तवाचे भान राखून वागणे हिताचे. संयम आणि मौन प्रसंगी प्रभावी ठरतात याचा अनुभव मिळेल. शुभ रंग - निळा
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope: प्रवासाचा योग आहे, नव्या ओळखी होतील. वास्तवाचे भान राखले आणि व्यावहारिक निर्णय घेतल्यास प्रगती होईल. शुभ रंग - पोपटी
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope:  हुशारीने प्रश्न सोडवू शकाल. जपून बोलून परिस्थिती सांभाळणे शक्य असते याचा अनुभव घ्याल. प्रिय व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा मान राखाल. शुभ रंग - चंदेरी
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope: आस्वाद घ्यावा पण अतिरेक टाळावा. नियोजन करा आणि नाहीतर धावपळ होईल. कायदा पाळा.  शुभ रंग - नारिंगी
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope: प्रगती कराल, कौतुक होईल. इतरांवर प्रभाव टाकू शकाल. प्रवासाचा आणि नव्या ओळखी होण्याचा योग आहे. समतोल राहा. शुभ रंग - हिरवा
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope: अतिरेक टाळा, नियोजनावर भर द्या. वादापेक्षा मौन हिताचे. तब्येत जपा. प्रयत्नांना यश लाभेल. शुभ रंग - आकाशी
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope: समतोल वागणे, संयम राखणे आणि प्रसंगी मौन पाळणे हिताचे.  शुभ रंग - गुलाबी
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope: स्वतःला बदलल्यास जग बदलेल. परिस्थितीनुरुप बदल स्वीकारा. शब्द जपून वापरा. प्रगती कराल. शुभ रंग - सोनेरी
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope: निर्णय विचारपूर्वक घ्या. गोड बोलून प्रभाव पाडाल. हुशारीने कामं साधाल. शुभ रंग - काळा
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope: प्रयत्नांनी यश मिळेल पण अती आत्मविश्वासाने वागणे टाळा. प्रगती होईल, कौतुक होईल. शुभ रंग - निळा
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope: विचारपूर्वक कृती करणे हिताचे. नियोजन लाभाचे. शुभ रंग - सोनेरी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी