राशीभविष्य : शनिवार, २४ जुलै २०२१

भविष्यात काय
Updated Jul 24, 2021 | 01:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

Daily Horoscope राशी भविष्य, 24 जुलै 2021 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

horoscope
राशीभविष्य : शनिवार, २४ जुलै २०२१ 

थोडं पण कामाचं

  • राशीभविष्य : शनिवार, २४ जुलै २०२१
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

राशी भविष्य 24 July 2021 : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. मन प्रसन्न असेल. विद्यार्थी अभ्यासात चांगली प्रगती करतील. साहित्य, कला क्षेत्रातील व्यक्तींसाठी दिवस चांगला असेल. शुभ रंग - नारंगी.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. जीभेवर ताबा ठेवा आणि वाद टाळण्याचा प्रयत्न करा. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नव्या कामाची सुरूवात करण्यास दिवस चांगला आहे. शुभ रंग - निळा.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: भाऊ तसेच इतर नातेवाईकांसोबत सुरू असलेल्या व्यवहारात चांगला लाभ होईल. कामाच्या व्यापामुळे ताण जाणवण्याची शक्यता आहे. शुभ रंग - केशरी.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: नातेवाईक आणि जोडीदारांची चांगली साथ मिळेल. कार्यालयातून दिलेलं काम पूर्ण कराल. प्रवासाचा किंवा पर्यटनाचा योग महिन्याभरात निर्माण होईल. शुभ रंग - राखाडी.
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: वैवाहिक आयुष्यात जोडीदाराची चांगली साथ मिळेल. कामात चांगले यश प्राप्त होईल. वायफळ खर्च टाळा. प्रवासाचा योग लवकरच निर्माण होईल. शुभ रंग - लाल.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: भावनेच्या प्रवाहात वाहत जाऊन कुठलाही निर्णय घेऊ नका. एखाद्या व्यक्तीसोबत मोठा वाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. वाद-विवाद टाळा. कुटुंबियांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - निळा.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: बाहेरील खाद्य-पदार्थ खाणं टाळा. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी चालून येईल. व्यापाऱ्यांना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - पांढरा.
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: व्यावसायिक क्षेत्रात तुमच्या कार्याचं खूपच कौतुक होईल. कामात चांगले यश प्राप्त होईल. स्थावर संपत्ती वाढण्याचा योग निर्माण होईल. सरकारी कामे पूर्ण होतील. वैचारिक कारणांमुळे एखाद्या निश्चित निर्णयावर तुम्ही पोहोचू शकणार नाहीत. शुभ रंग - जांभळा.
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: तुमच्या स्वभावात क्रोध, राग दिसून येईल. आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक यात्रा, प्रवास करण्याचा योग निर्माण होईल. कार्यालयात वातावरण चांगले असेल. शुभ रंग - हिरवा. 
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आजारपणामुळे पैसे अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. वायफळ खर्च सुद्धा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला असेल. शुभ रंग - पांढरा.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना दिवस चांगला असेल. दिलेली जबाबदारी वेळेआधी पूर्ण करतील आणि वरिष्ठांची मनं जिंकतील. शुभ रंग - आकाशी.
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: सरकारी कार्यालयात काम करणाऱ्यांसाठी दिवस चांगला असेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. धनलाभ होण्याची चिन्हं आहेत. व्यापाऱ्यात लाभ होईल. शुभ रंग - तांबडा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी