राशीभविष्य : रविवार २५ जुलै २०२१

Daily Horoscope राशी भविष्य, २५ जुलै २०२१ : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

horoscope
राशीभविष्य : रविवार २५ जुलै २०२१ 

थोडं पण कामाचं

  • राशीभविष्य : रविवार २५ जुलै २०२१
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

राशी भविष्य 25 July 2021 : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope: व्यावहारिक राहणे, गोड बोलणे, प्रवासात काळजी घेणे आणि नियोजन करणे हिताचे शुभ रंग - लाल
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope: प्रामाणिक आणि सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवणे आजच्या दिवशी सोयीचे आहे. शुभ रंग - निळा
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope: संयम आणि प्रसंगी मौन हिताचे आहे. वाद टाळणे लाभाचे आहे. नियोजनावर भर द्या. शुभ रंग - हिरवा
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope: संवादातून मार्ग काढणे हिताचे. चांगल्या शब्दात स्वतःचे म्हणणे समोरच्याला सांगा. इतरांचाही विचार कराल तर आनंदी राहाल. नवे शिका प्रगती करा. शुभ रंग - पांढरा
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope: तब्येत सांभाळा. साहस टाळा. हिशेबी राहा. पैशांचे नियोजन करा. शुभ रंग - लाल
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope: व्यावहारिक राहणे हिताचे. नवे शिका प्रगती करा. विचारपूर्वक निर्णय घेणे लाभाचे. वाद टाळणे फायद्याचे. शुभ रंग - मोरपिशी
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope: संवाद साधणे, विचारपूर्वक आणि पुरेशी माहिती घेऊन नंतर निर्णय घेणे हिताचे. प्रयत्नांमध्ये सातत्य राखा. गोड बोलून प्रभाव पाडणे लाभाचे. शुभ रंग - आकाशी
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope: अतिरेक टाळा. जबाबदाऱ्या सांभाळून साहस करा. आत्मनिर्भर व्हा. गोड बोलाल तर यशस्वी व्हाल. शुभ रंग - किरमिजी
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope: झेपेल ते काम करा. बुद्धी वापराल आणि हिशोबी राहाल तर यशस्वी व्हाल. प्रयत्नांमध्ये सातत्य राखणे आवश्यक आहे. नियोजनाला महत्त्व द्या. शुभ रंग - सोनेरी
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope: आळस झटकून कामाला लागा. जबाबदारीने काम करा.  शुभ रंग - काळा
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope: तब्येत सांभाळा. महत्त्वाचे निर्णय आणि महत्त्वाचे व्यवहार करताना पूर्ण खात्री करुन घ्या. वाद टाळणे लाभाचे. कृतीला महत्त्व द्या. शुभ रंग - निळा
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope: माणसं, शब्द, वेळ आणि पैसे यांचे महत्त्व ओळखा. नियोजन करणे हिताचे.  शुभ रंग - पिवळा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी