Daily Horoscope 9 April : संकष्टीचा दिवस तुमच्यासाठी कसा? वाचा 12 राशींचे राशीभविष्य

Today's Horoscope 9 April 2023: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

Today's Horoscope
आजचे राशीभविष्य 
थोडं पण कामाचं
  • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
  • जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
  • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा

Today's Horoscope, 9th April Rashi Bhavishya: आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात. (today horoscope Sunday 9 april 2023 daily horoscope aajche rashi bhavishya)

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: राजकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी चांगली संधी चालून येईल. आरोग्य सुदृढ राहील. मित्र-परिवारांसोबत पार्टी करण्याचा बेत आखाल. प्रवासाचा योग निर्माण होईल. आजचा शुभ रंग - लाल.
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: प्रवासाचा योग आहे. आरोग्याची काळजी घ्या. नातेवाईक, मित्रांची भेट होतील. आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. दिवसभरात एखादी चांगली बातमी मिळेल. आजचा शुभ रंग -  लाल आणि नारंगी.
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: राजकीय क्षेत्रात यश मिळेल. कामात आणि व्यवसायात यश मिळेल. नोकरी बदलण्याच्या संदर्भात कोणताही निर्णय घाईने घेऊ नका. आजचा शुभ रंग - निळा.
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: संपत्तीतून लाभ होईल. नोकरीची नवी संधी उपलब्ध होईल. व्यवसायात चांगला लाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. सासुरवाडीतून चांगली बातमी मिळेल. आजचा शुभ रंग - पिवळा आणि पांढरा.
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस थोडा धावपळीचा असेल. मालमत्ता खरेदी-विक्री करण्याचा विचार कराल. मालमत्ता खरेदी-विक्री करण्यापूर्वी कायदेशीर बाबींची योग्य पडताळणी करा. आजचा शुभ रंग - नारंगी आणि पांढरा.
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: नोकरीतील बदलाबद्दल तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. व्यापारात संघर्षाची चिन्हे आहेत. आर्थिक प्रगती होईल. गुळाचे दान करा. आजचा शुभ रंग - जांभळा आणि नारंगी.
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: अचानक आर्थिक लाभ होईल. कामाच्या गडबडीत व्यस्त असाल. नव्या योजनाची सुरुवात कराल. हनुमान चालीसा पठण करा. आजचा शुभ रंग - हिरवा आणि पांढरा.
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: व्यापारात चांगला नफा होईल आणि त्यामुळे आनंदाचे वातावरण असेल. व्यवसायात बदल करण्यासाठी नियोजन केले जात आहे. स्पर्धा परीक्षेत चांगले यश प्राप्त होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आजचा शुभ रंग - लाल आणि पिवळा.
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: नोकरीत प्रगतीबद्दल आनंद असेल. आर्थिक सुखासाठी श्री सूक्ताचे पाठ करा. मित्रांचा पाठिंबा मिळाल्याने रखडलेले काम मार्गी लागेल. पिवळ्या फळांचे दान करा. आजचा शुभ रंग - आकाशी आणि हिरवा.
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: व्यवसायात आजचा दिवस थोडा संघर्षाचा राहील. विद्यार्थी त्यांच्या करिअरबद्दल उत्साही आणि आनंदी राहतील. श्री गणेशाची पूजा करा. कोणतेही प्रलंबित असलेले काम पूर्ण होईल. धार्मिक पुस्तके दान करा. आजचा शुभ रंग - पिवळा आणि निळा.
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: घरात एखादी नवी वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे खर्च होऊ शकतात. आर्थिक व्यवहार करताना थोडी काळजी घ्या. अन्यथा पैसे अडकण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आजचा शुभ रंग - पांढरा.
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: नवा व्यवसाय सुरू करु शकता. आरोग्याची पूर्ण काळजी घ्या. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. कुटुंबात थोडा तणाव निर्माण होऊ शकतो. व्यवसायात चांगला नफा होईल. आजचा शुभ रंग - पांढरा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी