आजचे राशीभविष्य 
थोडं पण कामाचं
- पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
- जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
- तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा
दैनिक राशी भविष्य 6 एप्रिल : आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात. (today horoscope Thursday 6 april 2023 daily horoscope aajche rashi bhavishya)
- मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. मित्र, नातेवाईकांसोबत भेटीगाठी होतील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळा. पिवळ्या फळांचे दान करा. आजचा शुभ रंग - लाल आणि पांढरा.
- वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट होईल. मनावर नियंत्रण ठेवा. समाजात मान-सन्मान मिळेल. मीडिया आणि आयटी क्षेत्रातील अनेक दिवसांपासून प्रलंबित कामे पूर्ण होतील. दाम्पत्यांमध्ये आनंदाचे वातावरण राहील. आजचा शुभ रंग - निळा आणि हिरवा.
- मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: व्यवसायात नफा होईल. आरोग्याची काळजी घ्या. श्री गणेशाची पूजा करा. प्रवासाचा योग आहे. गुंतवणुकीतून तुम्हाला मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पिवळा आणि लाल.
- कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: गुंतवणूक करण्याचा विचार कराल. नवी प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार कराल. नोकरी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पांढरा.
- सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: घरातील महत्त्वाच्या कामांमध्ये लक्ष द्या. शिक्षण आणि अध्यात्मिक गोष्टींमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. बाहेरील खाद्यपदार्थ खाणे शक्यतो टाळा. भगवान श्री हनुमानाची पूजा करा. आजचा शुभ रंग - पांढरा आणि केशरी.
- कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: राजकीय क्षेत्रात यश मिळेल. कामात आणि व्यवसायात यश मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मूग दान करा. नोकरी बदलण्याच्या संदर्भात कोणताही निर्णय घाईने घेऊ नका. आजचा शुभ रंग - निळा.
- तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: तब्येतीची काळजी घ्या. व्यवसायात निर्णय घेताना गोंधळात पडाल. अशावेळी वरिष्ठांचा सल्ला घेऊन मगच निर्णय घ्या. मित्र आणि नातेवाईकांची साथ तुम्हाला मिळेल. आजचा शुभ रंग - हिरवा.
- वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: आजचा दिवस काहीसा संघर्षमय असेल. ऑफिसमधील कामात मेहनत घेतल्यास तुमच्या कार्यात यश प्राप्त होईल. कुटुंबातील व्यक्तींकडून चांगली बातमी मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - लाल.
- धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: बुध आणि शुक्राचे संक्रमण तुम्हाला आर्थिक लाभ मिळवून देईल. वडिलांच्या आशीर्वादाचा लाभ होईल. धार्मिक तीर्थयात्रा करू शकाल. आजचा शुभ रंग - पांढरा आणि जांभळा.
- मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: नोकरीतील बदलाबद्दल तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. व्यापारात संघर्षाची चिन्हे आहेत. आर्थिक प्रगती होईल. गुळाचे दान करा. आजचा शुभ रंग - जांभळा आणि नारंगी.
- कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायातील कामात यशप्राप्ती होईल. नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होईल. आजचा शुभ रंग - नारंगी आणि पिवळा.
- मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: नोकरी आणि व्यवसायाच्या संदर्भात चांगली बातमी येईल. नवीन कराराने व्यवसायात प्रगती होण्याची चिन्हे आहेत. गरिबांना अन्न दान करा. आजचा शुभ रंग - हिरवा आणि आकाशी.