Daily Horoscope 11 April : 'या' राशीच्या व्यक्तींना मोठा नफा होईल, वाचा तुमच्यासाठी कसा असेल हा मंगळवार

Today's Horoscope 11 April 2023: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

Today's Horoscope
आजचे राशीभविष्य 
थोडं पण कामाचं
 • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
 • जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
 • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा

Today's Horoscope, 11th April Rashi Bhavishya: आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात. (today horoscope Tuesday 11 april 2023 daily horoscope aajche rashi bhavishya)

 1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: नोकरीत प्रगती होईल. रखडलेले काम मार्गी लागण्यास सुरुवात होईल.  बेल आणि तुळशीचे रोप लावा. आजचा शुभ रंग - लाल आणि पिवळा.
 2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: नवीन जबाबदारी तुम्हाला मिळू शकेल. प्रवासाची योजना पुढे ढकलणं योग्य नाही. मित्र-मैत्रिणींची भेट होण्याची शक्यता आहे. कामानिमित्त दौरा होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पिवळा आणि केशरी. 
 3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today:  कार्यालयातील कामामुळे दबाव असेल. व्यापाऱ्यांनी एखादी डील करण्यापूर्वी काळजी घ्यावी. एकत्रित कुटुंबात राहणाऱ्यांनी वाद-विवाद टाळा. आरोग्य सुदृढ राहील. वाहन चालवताना काळजी घ्या. आजचा शुभ रंग - लाल.
 4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: नोकरीत प्रगती होईल. व्यवसायात लाभ होईल. श्री गणेशाची पूजा करा. गरिबांना अन्न दान करा. घरबांधणी संदर्भात निर्णय घ्याल आणि त्याच कामात आज व्यस्त राहाल. आजचा शुभ रंग - लाल आणि पिवळा.
 5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. चांगले यश मिळेल. मेष आणि कन्या राशीचे मित्र आज तुमच्या मदतीसाठी धावून येतील. आजचा शुभ रंग - लाल आणि पांढरा. 
 6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: व्यापाऱ्यांना परदेशी कंपनीकडून एखादी मोठी ऑफर मिळण्याची शक्यता आहे. यामुळे व्यापारात मोठा नफा होण्याची शक्यता आहे. नव्याने गुंतवणूक करण्याचा विचार कराल. आजचा शुभ रंग - पिवळा.
 7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: व्यवसायात नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. हातात घेतलेले काम पूर्ण करा आणि मगच दुसरे काम हाती घ्या. कोणताही व्यवसाय किंवा योजना पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊ नका. आजचा शुभ रंग - केशरी आणि पिवळा.
 8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: नोकरीत बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. कन्या राशीच्या मित्रांकडून तुम्हाल सहकार्य मिळेल. व्यवसायात चांगले मार्गदर्शन मिळाल्याने नफा होईल. अनावधानाने होणाऱ्या पैशाच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. आजचा शुभ रंग - हिरवा आणि जांभळा. 
 9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: तुमच्या स्वभावामुळे रखडलेले काम मार्गी लागेल. व्यापाऱ्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - नारंगी आणि पांढरा.
 10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: कामानिमित्त प्रवास होण्याची शक्यता आहे. घरी पाहुणे येतील. जुने-मित्रमंडळी भेटतील. प्रवासाची शक्यता आहे. नोकरीत बढतीची शक्यता आहे. बेल आणि तुळशीचे रोप लावा. आजचा शुभ रंग - निळा आणि पिवळा.
 11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: नोकरीत बढतीबाबत चांगली बातमी मिळेल. नवीन करारामुळे व्यवसायात प्रगती होण्याची चिन्ह आहेत. घरी पाहुण्यांचे आगमन होईल. जुने मित्र-मैत्रिण बऱ्याच वर्षांनी भेटतील. आजचा शुभ रंग - केशरी आणि पांढरा.
 12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: या राशीच्या व्यक्तींना व्यापारात चांगला नफा होईल. काही कार्यात अडचणी येऊ शकतात. तरुणांनी कोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक विचार करा. दीर्घकाळानंतर एखाद्या ट्रिपवर जाण्याचा योग निर्माण होईल. आजचा शुभ रंग - लाल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी