Vastu Tips:तुम्हाला सतत पैशाची तंगी सतावतेय का? दूर करतील या टिप्स

भविष्यात काय
Updated May 06, 2022 | 12:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vastu Shastra: पैशाची तंगी ही अनेक लोकांच्या जीवनातील मोठी समस्या असते. अनेकदा पुरेसा पैसा कमावूनही ही तंगी मागे सुटत आहे. या मागे अशाही काही चुका असतील ज्यांचा संबंध वास्तुशास्त्राशी असतो. 

vastu tips
थोडं पण कामाचं
  • रात्रीच्या वेळेस कधीही पाण्याची भांडी रिकामी ठेवू नयेत.
  • वास्तुशास्त्रात अंथरूणावर बसून जेवण करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे
  • घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ असला पाहिजे यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहते.

मुंबई: भरपूर पैसा, सुख-सुविधा मिळवण्यासाठी सगळीच माणसे प्रयत्न करतात. मात्र अनेकदा भरपूर प्रयत्न करूनही ते यशस्वी होत नाहीत. यामागे अनेक कारणे जबाबदार असतात ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. वास्तुशास्त्रात(vastu shastra) अनेक अशा गोष्टी सांगण्यात आल्यात ज्या कंगालीचे कारण ठरतात. या चुका आर्थिक स्थिती(economic), प्रगती आणि यशामध्ये अडथळा ठरता. जाणून घेऊया वास्तुशास्त्रात सांगण्यात आलेल्या त्या बाबींबद्दल...

अधिक वाचा - आयुष्मान खुरानाच्या 'अनेक' ने प्रश्न उपस्थित

आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम करतात या चुका

पुजा घरात देवाच्या मूर्त्या समोरासमोर ठेवणे 

वास्तुशास्त्रानुसार  पुजा देवी-देवतांच्या मूर्ती समोरासमोर ठेवू नयेत. अथवा त्यांचे फोटो समोरा-समोर ठेवू नयेत. यामुळे घरात वाद होण्याची शक्यता असते. तसेच घरात नकारात्मकता येते. त्यामुळे ही चूक करू नका. 

अंथरूणावर बसून जेवण करणे

वास्तुशास्त्रात अंथरूणावर बसून जेवण करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. असे केल्याने जीवनात अनेक समस्या येतात. ही चूक आर्थिक स्थिती आणि आरोग्यावर परिणाम करू शकते. धनहानी होण्याची शक्यता असते.कर्जाचे कारण ठरू शकते. 

रात्री किचन घाणेरड्या अवस्थेत ठेवणे

अनेक घरांमध्ये रात्री जेवणानंतर किचन साफ केले जात नाही.  ही चूक लक्ष्मी मातेला नाराज करते. कधीही रात्रीच्या वेळेस किचन घाणेरड्या स्थितीत ठेवू नये. तसेच किचनमध्ये भांडी खरकटी ठेवू नयेत.

मुख्य दरवाजावर कचरा ठेवणे 

घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ असला पाहिजे यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहते. कधीही घराच्या मुख्य दरवाजावर कचरा अथवा कचऱ्याचा डबा ठेवू नये. दरवाजावर जाळे येऊ देऊ नका. तो नेहमी स्वच्छ ठेवा. याशिवाय दरवाजा उघडण्यात अडथळा आला नाही पाहिजे. 

पाणी वाहत राहणे

कधीही पाणी वाया घालवू नका. तसेच घरातही गळका नळ असू नये. यामुळे पैसा पाण्यासारखा वाहत जातो. 

अधिक वाचा - ५ दिवसांनी या ५ राशींच्या लोकांचे चांगले दिवस होणार सुरू

घरात ठेवू नका पाण्याची रिकामी भांडी

रात्रीच्या वेळेस कधीही पाण्याची भांडी रिकामी ठेवू नयेत. मग ते बाथरूममध्ये ठेवलेली बादली असो वा किचनमध्ये ठेवलेली भांडी. ही नेहमी भरून ठेवा. पाण्याची रिकामी भांडी नेहमी आर्थिक तंगी निर्माण करतात. 

Disclaimer:येथे देण्यात आलेली माहिती सामान्य मान्यता आणि माहितीच्या आधारावर आहे. Times Now Marathi याला दुजोरा देत नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी