मुंबई: शुक्र(venus) २३ मेला मंगळ राशी मेषमध्ये(aries) परिवर्तन करत आहे. या दरम्यान शुक्र आपली उच्च राशी मीनमधून मेषमध्ये प्रवास करत आहे. शुक्राचे मेष राशीतील परिवर्तन(transist) अनेक राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. शुक्र आपले लक्ष्य मिळवण्यासाठी तुमच्या दृष्टिकोनात साहस घेऊन येणार सोबत जीवनात नवी उर्जा आणि नव्या गोष्टी बनवण्यासाठी अनेक संधी निर्माण करणार. जाणून घेऊया शुक्राचे मेष राशीमधील परिवर्तन कोणत्या राशींसाठी आर्थिक आणि कौटुंबिक सुखद ठरणार आहे. venus transistion will be beneficial for this zodiac sign
अधिक वाचा - बापरे ! खूनाचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले
मेष राशींच्या व्यक्तींसाठी शुक्राचे परिवर्तन सुखद ठरू शकते. या दरम्यान तुम्ही स्वत:ला अधिक चांगले बनवण्यासाठी प्रयत्न कराल. सोबतच या राशीच्या व्यक्ती ब्युटी उत्पादने आणि कपड्यांवरची पैसा खर्च करू शकतात. कौटुंबिक जीवन चांगले राहील. वैवाहिक जीवनात आनंदीआनंद राहील. ज्या व्यक्ती महागडे रत्ने आणि दागिन्यांशी संबंधित व्यापारात आहेत त्यांच्यासाठी हे परिवर्तन लाभदायक ठरू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी करिअरमध्ये चांगले परिणाम मिळवण्यासाठी थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल.
या राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे परिवर्तन अनेक संधी निर्माण करू शकते. या वेळेस जीवनातील विविध क्षेत्रातून तुम्हाला लाभ मिळू शकतो. घरच्या लोकांसोबतच तुमचे संबंध चांगले राहतील. मोठ्या भाऊ-बहिणींच्या मदतीने कामे साधाल. शुक्र तुमच्या पंचम भावाचा स्वामी असल्याने नवविवाहितांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचे आगमन होऊ शकते.
मेष राशीच्या परिवर्तनादरम्यान शुक्र यांच्यात दशम भावात राहतील. यावेळेस कर्क राशीच्या त्या लोकांना खास लाभ मिळू शकतो जे कला, सौंदर्य, अभिनय या क्षेत्रात आहेत. व्यापाऱ्यांच्या योजना सफल होतील. तुमचा आर्थिक पक्ष शुक्राच्या परिवर्तनादरम्यान मजबूत असेल त्यामुळे पैसा साठवण्यास मदत होईल. दरम्यान या राशीच्या लोकांनी शुक्राच्या परिवर्तनादरम्यान गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करावा.
शुक्राचे परिवर्तन अनेक बाजूंनी फायदेशीर ठरणार आहे. वैवाहिक जीवनात समस्या होत्या त्या या परिवर्तनादरम्यान संपतील. जे लोक विवाहयोग्य आहेत त्यांचा विवाह या दरम्यान ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी येणारे अडथळेही यावेळी कमी होतील. भागीदारीच्या व्यवसायात आपल्या पार्टनरवरील विश्वास वाढेल. या दरम्यान तुम्ही काही नवीन गोष्टींसह प्रयोग कराल.
अधिक वाचा - एकदंत संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी
धनू राशीवर परिणाम
शुक्राचे परिवर्तन आपल्या राशीतील पंचम भावात असेल. हा भाव प्रेम, भावना आणि शिक्षेचा भाव म्हटला जातो. शुक्राच्या परिवर्तनाने धमू राशीचया व्यक्तींच्या प्रेमसंबंधात सुधारणा पाहायला मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे. विद्यार्थी आपल्या कुटुंबातील तसेच मित्रांच्या मदतीने कठीण विषयावर चांगली पकड मिळवू शकतात. हे परिवर्तन नोकरीपेशा लोकांसाठी चांगले सिद्ध होऊ शकते. नोकरीपेशा लोकांना पदोन्नती मिळू शकते. धनू राशीच्या लोकांनी या दरम्यान अति उत्साहात काम करू नये नाहीतर कामे बिघडू शकतात.