Daily Horoscope: राशीभविष्य : बुधवार, १० ऑगस्ट २०२२ चे राशीभविष्य, जाणून घ्या कसा जाईल आजचा दिवस

कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

daily horoscope
राशीभविष्य   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • Daily Horoscope :आजचे राशी भविष्य बुधवार, १० ऑगस्ट २०२२
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

Daily Rashi Bhavishaya, Wednesday 10th August, 2022 Daily Horoscope : आजचे राशी भविष्य बुधवार, १० ऑगस्ट, २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस? (Wednesda10th August daily rashi bhavishaya daily horoscope in marathi) 

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today:  चांगला मित्र जोडणे हिताचे. प्रसंगी तज्ज्ञांचा सल्ला घेणे लाभाचे. योग्य अयोग्य समजून घेऊन मग निर्णय घेणे हिताचे.  शुभ रंग – सोनेरी
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: प्रतिष्ठा वाढेल. इतरांवर प्रभाव टाकाल. निर्णय घेऊन कामं वेगाने पूर्ण कराल. प्रगती होईल. शुभ रंग – नारिंगी
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today:  डोकं शांत ठेवा आणि विचारपूर्वक कृती करा. प्रसंगाला धीराने सामोरे जा. भावनांवर नियंत्रण ठेवणे आणि व्यावहारिक राहणे हिताचे. शुभ रंग - आकाशी
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today:  अतिरेक घातक असतो हे लक्षात ठेवा. आत्मविश्वास हवा पण अतिआत्मविश्वास नको. विचारपूर्वक वागणे हिताचे.  शुभ रंग – पोपटी
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: प्रयत्न केल्याशिवाय यश मिळणार नाही. प्रयत्नांसाठी नियोजन आणि सातत्य महत्त्वाचे. अनुभवींचा सल्ला घेऊन नियोजन करणे हिताचे.शुभ रंग - काळा
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: आनंदात दिवस जाईल. मनाजोगत्या घटना घडतील. प्रगतीचा योग आहे. वास्तवाचे भान राखणे आणि व्यवहारज्ञानाने वागणे हिताचे. शुभ रंग – आकाशी
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: आत्मनिर्भर व्हा. निर्णय विचारपूर्वक आणि स्वतःच्या हिंमतीने घेऊन मग ते अंमलात आणा. अनुभवींचा सल्ला घेणे हिताचे. शुभ रंग – लाल
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: थांबणे आणि विसंबून राहणे टाळा. आत्मनिर्भर व्हा. प्रगतीचा योग आहे. वास्तवाचे भान राखणे हिताचे. शुभ रंग – गुलाबी
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: तुमचा सल्ला इतरांसाठी फायद्याचा ठरेल. व्यवहारज्ञानाचा उपयोग होईल. तब्येत जपा. घरच्यांना वेळ द्याल.  शुभ रंग – मोरपिशी
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: चिंतामुक्त व्हाल. दिवस मजेत जाईल. स्वतःच्या मर्जीचे मालक असाल. स्वतःसाठी आणि घरच्यांसाठी वेळ काढाल.शुभ रंग - जांभळा 
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: खरेदीचा योग आहे. खर्च वाढेल. गरज ओळखून निर्णय घेणे हिताचे. दिवस मजेत जाईल. शुभ रंग – पिवळा
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: विशेष प्रयत्न करणे लाभाचे. दिवस प्रगतीचा. उत्साह वाढेल. आत्मविश्वास वाढेल. शुभ रंग - पांढरा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी