weekly horoscope: साप्ताहिक राशीभविष्य १० ते १६ जुलै २०२२

weekly horoscope 10 to 16 july 2022 weekly rashi bhavishya in marathi : हा आठवडा कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती

weekly horoscope 10 to 16 july 2022 weekly rashi bhavishya in marathi
weekly horoscope: साप्ताहिक राशीभविष्य १० ते १६ जुलै २०२२  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • weekly horoscope: साप्ताहिक राशीभविष्य १० ते १६ जुलै २०२२
 • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आठवडा?
 • काय आहे आपले भविष्य?

weekly horoscope 10 to 16 july 2022 weekly rashi bhavishya in marathi : हा आठवडा कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा आठवडा? 

धर्म-कर्म-भविष्यआध्यात्मभविष्यात काय

 1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope: रागावर संयम ठेवा. प्रयत्न व चिकाटीच्या जोरावर यश मिळेल. तज्ज्ञांचा सल्ला उपयुक्त ठरेल. नियोजन करुन यशस्वी होऊ शकाल. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. सरकारी कार्यात सफलता मिळेल. शुभ रंग - नारिंगी
 2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope: नवीन ओळखी करुन घ्या. नव्या जगाची ओळख करुन घ्या. बदल स्वीकारण्याची तयारी ठेवा, ताण विसरा. आशावादी राहण्यासाठी आपल्या मनाला वळण लागते. नोकरीत नवीन साहस आपण होऊन अंगावर घेऊ नका पण जबाबदारी आल्यास ती नाकारुही नका. यश मिळेल. शुभ रंग - निळा
 3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope: कामे यशस्वी करुन आर्थिक लाभ करण्याचा प्रयत्न राहील. खर्च वाढतील पण आवकही समाधानकारक राहील. प्रगतीचे मार्ग दिसतील. संततीच्या समस्यांकडे गंभीरपणे लक्ष द्या. गृहसौख्य थोडे बिघडल्यासारखे होईल. हाताखालच्या लोकांकडून कामे करुन घेणे म्हणजे कसरत राहणार आहे. विचारपूर्वक निर्णय घ्यावा. स्वबळावर चिकाटीने कष्टपूर्वक व्यवसाय चालू ठेवावा. शुभ रंग - मोरपिशी
 4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope: कृतीवर जास्त भर द्या. वादापेक्षा मौन पाळावे. गर्दीपासून दूर रहा. विरोधकांना मात द्याल. जबाबदारी ओळखून वागण्याचा काळ आहे. अचानक प्रवास ठरेल. सामाजिक, राजकीय क्षेत्रात सन्मान मिळेल. मित्र नातेवाईकांपासून सहाय्य मिळेल. मोठया लोकांच्या भेटीगाठी होतील. धावपळ, संघर्ष केल्यानंतर यश मिळेल. शुभ रंग - चंदेरी
 5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope: कामाशिवाय इतर बाबतीत पडू नका. घरातील पाळीव प्राण्यांची काळजी घ्या. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. जनसंपर्कामधून किर्ती मिळेल, लाभ होईल. नवीन करार शक्यतो करु नका. नवीन लोकांशी संपर्क राहील. नवे मित्र बनतील. कौशल्य वापरा. शुभ रंग - किरमिजी
 6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope: कष्टानेच यश मिळेल. काम करताना वेळेचे बंधन राखा. उद्योग-व्यवसायात तत्परता राखा. नोकरीतील आपले स्थान बळकट करण्याचे प्रयत्न करा. आर्थिक व्यवहार मध्यस्थांच्या हाती देऊ नयेत. आर्थिक गुंतवणूक करताना बरीच काळजी घ्यावी लागेल. समोरची व्यक्ती नाराज होणार नाही याची दक्षता घ्या. शुभ रंग - पोपटी
 7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope: वाद टाळणे, गोड बोलणे, कोणालाही न दुखावणे हिताचे आहे. सामाजिक कार्यातील सहभाग वाढेल. महत्वाच्या व्यवहारात नातेवाईकांना मध्यस्थी करु देऊ नका. राजकीय क्षेत्रात चांगले कार्यकर्ते भेटतील. जास्त पैशाच्या मोहात पडू नका. खर्चाच्या मानाने आवक तेवढी होणार नाही. शुभ रंग - पांढरा
 8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope: कागदपत्रे वाचल्याशिवाय त्यावर सही करु नका. शत्रुला किंचितसुध्दा कमी लेखू नका. घरच्यांचा दबाव वाढेल, गैरसमज न करता त्यांच्याशी चर्चा करुन तणाव कमी करावा. पैशाच्या बाबतीत कोणावरही भरवसा ठेवू नका. प्रवासात खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. शुभ रंग - लाल
 9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope: प्रिय व्यक्तीच्या कामाचे कौतुक करा. एक दुसऱ्यांच्या मतास प्राधान्य द्या. परस्परांमधील स्नेहभाव वाढवा. जे आपल्या मनाला पटते तेच करा. आपल्या कार्याची योजनांची गुप्तता पाळा. शुभ रंग - पिवळा
 10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope: क्षमतेचा विचार करुन निर्णय घ्या. वाद टाळा. एकमेकांना सहकार्य करणे हिताचे. सामंजस्य लाभाचे. जीवलग व्यक्तीवर जास्त अपेक्षांचे ओझे ठेवू नका. शुभ रंग - राखाडी
 11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope: आरोग्याची काळजी घ्या. वेळ, पैसा आणि शब्द जपून वापरणे लाभाचे. सावध राहा. हुशारीने अडचणीतून मार्ग काढाल. विरोधकांवर मात कराल. यश मिळवाल. शुभ रंग - काळा
 12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope: तब्येत सांभाळावी लागेल. संततीबाबतचे प्रश्न सोडवण्यात जाणकारांचा सल्ला घेण्याची गरज भासेल. कौटुंबिक वाद टाळण्याचा प्रयत्न करावा. प्रसंगी थोरामोठयांची मदत घ्यावी, वाद वाढवू नयेत. मनावर सयंम ठेवणे आवश्यक आहे. कायदे व वायदे तोडू नका. शुभ रंग - सोनेरी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी