weekly horoscope: साप्ताहिक राशीभविष्य 2 ते 8 ऑक्टोबर 2022

weekly horoscope 2 to 8 october 2022 weekly rashi bhavishya in marathi : हा आठवडा कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती

weekly horoscope 2 to 8 october 2022 weekly rashi bhavishya in marathi
weekly horoscope: साप्ताहिक राशीभविष्य 2 ते 8 ऑक्टोबर 2022  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • weekly horoscope: साप्ताहिक राशीभविष्य 2 ते 8 ऑक्टोबर 2022
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आठवडा?
  • काय आहे आपले भविष्य?

weekly horoscope 2 to 8 october 2022 weekly rashi bhavishya in marathi :  हा आठवडा कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा आठवडा? 

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope: प्रलोभनांपासून दूर राहणे आणि वाद टाळणे हिताचे. क्षमता ओळखून आणि परिस्थितीचा अंदाज करून नियोजन करणे आणि वेळेचा सदुपयोग करणे फायद्याचे. घरच्यांना वेळ देणे सुखाचे. शुभ रंग - किरमिजी
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope: शब्द जपून वापरणे लाभाचे. सकारात्मक विचार करणे हिताचे. घरच्यांशी मुक्त संवाद राखणे आणि थोरांचा आदर करणे लाभाचे. अर्थतज्ज्ञाचा सल्ला फायद्याचा. शुभ रंग - निळा
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope: स्वावलंबन फायद्याचे, आत्मनिर्भर होणे दीर्घकालीन हिताचे. रखडलेली कामं आणि सरकारी कामं लवकर पूर्ण होतील. आर्थिक पारदर्शकता जपा. घरच्यांशी आणि जोडीदाराशी मुक्त संवाद ठेवणे लाभाचे. शुभ रंग - मोरपिशी
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope: कुसंगत टाळा, कोणाशी किती ओळख राखावी याचे भान राखा आणि कोणापासून दूर व्हावे हे समजून त्याप्रमाणे वागा. तब्येत जपा. स्थैर्याला महत्त्व द्या. तज्ज्ञांच्या सल्ल्याने नियोजन कराल तर फायदा होईल. शुभ रंग - आकाशी
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope: झेपेल तेवढे काम कराल आणि वेळेचा सदुपयोग कराल तर फायद्यात राहाल. घरच्यांना वेळ देणे लाभाचे. शुभ रंग - लाल
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope: क्षमतेपेक्षा जास्त धाडस करणे टाळा. माणसं जोडा, माणसं जपा आणि माणसं ओळखा. हा तुमच्या प्रगतीचा मूलमंत्र ठरेल. घरच्यांना वेळ देणे लाभाचे. आर्थिक पारदर्शकता जपणे हिताचे.शुभ रंग - मोरपिशी
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope: महत्त्वाचे व्यवहार टाळा, नम्रतेने जग जिंकाल. शब्द जपून वापरणे आणि वाद टाळणे हिताचे. हुशारीने वागणे फायद्याचे. घरच्यांना वेळ देणे आणि सकारात्मक राहणे लाभाचे. शुभ रंग - निळा
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope: वाद टाळला आणि हुशारीने काम केले तर प्रगती होईल आणि आत्मविश्वास वाढेल. रागावर आणि जिभेवर संयम राखा.  शुभ रंग - गुलाबी
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope: ध्येयाचा पाठपुरावा करणे आणि ज्येष्ठांचा आदर करणे हिताचे. वाद टाळणे लाभाचे. शुभ रंग - पिवळा
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope: शब्द जपून वापरणे लाभाचे. सकारात्मक विचार करणे हिताचे. नैराश्य झटकून कामाला लागणे फायद्याचे. स्वावलंबन फायद्याचे, आत्मनिर्भर होणे दीर्घकालीन हिताचे. शुभ रंग - तपकिरी
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope: अतिरेक टाळणे आणि हुशारीने कठीण प्रसंगातून मार्ग काढणे हिताचे. वाद टाळणे गरजेचे. धार्मिक कार्य घडण्याचा वा तीर्थयात्रा होण्यचा योग आहे.  शुभ रंग - तपकिरी
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope: नियोजन करून जिद्दीने प्रयत्न केले तर यशस्वी व्हाल. अनेक अनोळखी प्रतिष्ठित लोकांच्या गाठीभेठी होतील. गुरुजनांची सेवा करण्याची संधी मिळेल. धार्मिक कामातील आपला सहभाग वाढेल. तज्ज्ञांचा सल्ला आर्थिक नियोजनासाठी हिताचा. शुभ रंग - सोनेरी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी