साप्ताहिक राशी भविष्य १० ते १६ ऑक्टोबर २०२१

साप्ताहिक राशी भविष्य: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा आठवडा? जाणून घ्या या राशींचे भविष्य...

weekly rashi bhavishya 10 to 16 October weekly horoscope in marathi
साप्ताहिक राशी भविष्य १० ते १६ ऑक्टोबर २०२१ 
थोडं पण कामाचं
 • साप्ताहिक राशी भविष्य १० ते १६ ऑक्टोबर २०२१
 • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आठवडा?
 • काय आहे आपले भविष्य?

साप्ताहिक राशी भविष्य 10 to 16 October 2021: हा आठवडा कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल हा आठवडा?

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope : स्वभावाला मुरड घातल्यास वातावरण सलोख्याचे राहील. गोड बोलणाऱ्या मित्रांपासून सावध राहा. पत्रव्यवहार जपून करावा. उत्साह, आत्मविश्वास जबरदस्त जाणवेल. कौतुकास्पद कामगिरी हातून घडेल. पुढारीपण व उत्साह यामुळे यश मिळेल. सामाजिक कार्यामुळे सुख व प्रसिध्दी लाभेल. तुमच्या स्वभावात संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करा. स्वत:च्या वक्तृत्वाला उत्तेजन मिळेल. बौध्दिक क्षेत्रात चांगले कार्य तुमच्या हातून होईल. शिक्षण क्षेत्रात प्रवेशास फार अडचणी येणार नाहीत. शुभ रंग - गुलाबी
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope : व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारल्यास तुमचा आत्मविश्वास वाढेल. घेण्यापेक्षा देण्यात आनंद माना. तुमच्या बोलण्यावर संयम ठेवा. तुमचे जवळचे सहकारी तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला मदत करतील. तुमच्या जीवनांशी निगडीत असलेल्या व्यक्तींच्या विचारांचा पगडा तुमच्यावर राहील. कोर्टाबाबत शक्य होईल तर समझोता करा. एखादया नवीन विषयाची गोडी लागेल. प्रवासामुळे चांगल्या ओळखी होतील. अधिक लालसेने चुकीच्या मार्गाने धनार्जन करण्याचा मोह आवरावयास हवा. शुभ रंग - निळा
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope : सामंजस्याने मार्ग काढा. वाहने जपून चालवा. कर्म सुधारण्यांसाठी कसोशीने प्रयत्न करावेत. आपल्या कामातून ओळख निर्माण करा. मित्रांबरोबर वाद घालू नका. जिंकलात तरी मित्र गमवाल. तुमचा हट्टीपणा तुम्हाला त्रासदायक ठरेल. प्रगत शिक्षणासाठी प्राध्यापकांचे अमुल्य मार्गदर्शन मिळेल. गुरुजनांचा सन्मान करा. शुभ रंग - मोरपिशी
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope : जामीन राहणे, वचन देणे टाळा. प्रयत्न करा, यश मिळेल. सत्याची कास धरा. नावीन्याकडे तुमची झेप ठेवावी लागेल. स्वत:ची बुध्दी जागृत ठेवा. कुणांची मदत मिळेल या आशेवर राहू नका. केलेल्या परिश्रमांची फलश्रुती सफलता अनुभवास येईल. कामाचा व्याप वाढुन विविध जबाबदाऱ्या अंगावर पडतील. काम योग्य वेळात पुर्ण करण्याचा प्रयत्न करा. नविन मार्ग शोधण्याची तयारी ठेवा. शुभ रंग - निळा
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope : दृष्टिकोन सकारात्मक ठेवलात तर मार्ग निघू शकेल. मानापमानाची भावना बाजूला ठेवून काम केल्यास यश मिळेल. धीराने वाटचाल केलीत तर तुमच्या यशाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत राहील. स्वत:च्या अडीअडचणीचा इतरांकडून फायदा उठवला जाणार नाही याची काळजी घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी किरकोळ गोष्टींवरुन वाद विवाद टाळावेत. शासकीय कामात यश लाभेल. मित्रांच्या सल्ल्यातून पाहिजे तेच घ्यावे. शुभ रंग - जांभळा
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope : स्वाभिमानी, शुध्द आचरण व स्वपराक्रमाने मानसन्मान प्राप्त कराल. आपला राजकीय क्षेत्रात दरारा निर्माण होईल. अती आत्मविश्वास बाजूस ठेवून योग्यवेळी योग्य धोरण राबवणे हिताचे ठरेल. आपल्या वक्तृत्वाची छाप पडेल. घराच्या सुशोभीकरण, नूतनीकरणासारख्या गोष्टीकडे लक्ष द्या. थोर व वयोवृध्द व्यक्तींचा अपमान होऊ देऊ नका. आर्थिक गुंतवणूक भविष्यासाठी हितकारक होईल. ज्येष्ठांचा सल्ला आर्थिक कामकाजासाठी घ्या. शुभ रंग - हिरवा
 7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope : आहारनियमन हितकारक होईल. गुप्त शत्रुंपासून आपल्याला सतत सावधानता बाळगावी लागणार आहे. तुम्हाला जुने सहकारी भेटतील. कोणताही पेपर व्यवस्थित वाचल्याशिवाय त्यावर सही करु नये किंवा त्याला समंती देऊ नये. तुम्ही चिंता सोडा चिंतन करा. सात्विक विचारसरणींचा कोणी गैरफायदा घेणार नाही याची दक्षता घ्या. स्थलांतराचे योग येतील पण उतावळेपणाने निर्णय घेऊ नका. संततीच्या अडचणीकडे लक्ष द्यावे लागेल. शुभ रंग - आकाशी
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope : मने दुखवू नका. अपरिचितांवर विश्वासू नका. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थीवर्गाने अति आत्मविश्वास टाळणे, वरिष्ठांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. संततीस त्यांच्या हटृापासून प्रवृत्त करणे गरजेचे ठरेल. कौटुंबिक स्तरावर सुखासमाधानाचे वातावरण राहील. कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळेल. जमा व खर्चाचा ताळमेळ घालणे आताची गरज आहे. अर्थाजन करण्यास चुकीचा मार्ग स्विकारु नका. हिशेब आणि हिशेबीपणा ठेवला तर आपण खूप काही करु शकाल. शुभ रंग - केशरी
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope : विचारांचा पाया भक्कम असणारी माणसं संकटाला ठामपणे तोंड देतात. घडलेल्या गोष्टी आपल्या हातात नसतात त्यांचा विचार नको. तुम्हाला तणावातून मार्ग शोधावा लागेल. समाजकार्यात सरशी होईल. तुम्ही जिद्द ठेवा यश मिळेल. कामाची धावपळ, अडथळे अशा प्रसंगाना सामोरे जावे लागेल. आपल्या कार्यक्षेत्रातील प्रवास अधिक वेगवान होईल. जमेल त्या पध्दतीने थोडया थोडया आर्थिक गुंतवणुकी करणे भविष्यासाठी हितकराक आहे. आर्थिक लाभ व्यवस्थित होत राहातील. तणाव कमी करण्याचा प्रयत्न करता येईल. शुभ रंग - सोनेरी
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope : बाहेरील पदार्थ कटाक्षाने टाळावेत. आहाराचे नियमन करणे जरुरीचे आहे. वेळातवेळ काढून शरीर निरोगी राखण्यास नियमित व्यायाम, चालणे किंवा योगासाधना करणे क्रमप्राप्त आहे. गुंतवणूक करताना मनातील गैरसमज दूर करुन विवेकबुध्दीने गुंतवणुक करावयास हवी. कुटुंबातील जेष्ठ व्यक्तींच्या नावे केलेली गुंतवणूक योग्य असेल. प्रेमकरताना योग्य व्यक्तिची निवड करा. एक दुसऱ्याचा विश्वास संपन्न करा. जीवनसाथीविषयी विश्वास उत्पन्न करा. त्यांच्या भावनांची कदर करा.  शुभ रंग - जांभळा
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope : प्रवासात सावधानता बाळगा. धार्मिक कार्याचा आनंद घेता येईल. हुशारी, कल्पकता ठेवून परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येईल. सरकारी नियम व कायदा यांचे पालन करा. थोरामोठ्यांच्या भेटी गाठी होतील. स्वत:चा नवा संसार उभा करण्याची इच्छा तुर्तास पुढे ढकलणे योग्य होईल. मुलांच्या बऱ्याच समस्या अधूनमधून प्रेशर वाढवू शकतो. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणासाठी नवे वेळापत्रक तयार करावे. विद्यार्थ्यांनी काही तरी नवे शिकण्याचा प्रयत्न करावा. प्रथम आपल्या क्षमतेचा विचार करणे व मग आश्वासन देणे योग्य ठरेल. शुभ रंग - राखाडी
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope : तुम्ही अधिक कष्ट करण्याची तयारी ठेवा. बऱ्याच दिवसापासुन प्रवासाला जाण्याचे संकल्प या आठवडयात पूर्ण होण्याची संधी मिळेल. महत्वाच्या कामात वडिलांचा सल्ला उपयुक्त ठरेल. वादविवाद टाळावयास हवे. कोणतेही दस्ताऐवज पूर्ण वाचल्याशिवाय सही करु नका. व्यवहार करताना माणसांची योग्य पारख करा. वैचारिक गोंधळ नको. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळा. अर्थाजन वाढविण्यासाठी अनोळखी व्यक्तींचा सल्ला घेऊ नका, फसगत होण्याची शक्यता निर्माण होते. व्यवहाराच्या कायदेशीर बाबींकडे लक्ष द्या. शुभ रंग - पिवळा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी