weekly rashi bhavishya साप्ताहिक राशी भविष्य १२ ते १८ डिसेंबर २०२१

weekly rashi bhavishya 12 to 18 december 2021 weekly horoscope in marathi साप्ताहिक राशी भविष्य: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा आठवडा? जाणून घ्या या राशींचे भविष्य...

weekly rashi bhavishya 12 to 18 december 2021 weekly horoscope in marathi
साप्ताहिक राशी भविष्य १२ ते १८ डिसेंबर २०२१ 
थोडं पण कामाचं
 • साप्ताहिक राशी भविष्य १२ ते १८ डिसेंबर २०२१
 • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आठवडा?
 • काय आहे आपले भविष्य?

weekly rashi bhavishya 12 to 18 december 2021 weekly horoscope in marathi हा आठवडा कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल हा आठवडा?

 1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope: वाद टाळणे, संयम राखणे हिताचे. कुटुंबीयांच्यासाठी वेळ आणि पैसा खर्च होईल. अर्थाजन वाढविण्यासाठी अनोळखी व्यक्तींचा सल्ला घेणे हितावह ठरणार नाही. आर्थिक नियोजन करणे हिताचे. नोकरीत स्थैर्याला महत्त्व द्या. टिकून राहण्याला प्राधान्य द्या. शुभ रंग - गुलाबी
 2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope: नवे कौशल्य आत्मसात करा. आत्मनिर्भर व्हा. स्वतःच्या क्षमतेनुसार कृती करा. तब्येत जपा, दगदग टाळा आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत काळजी घ्या. विचारल्याशिवाय बोलू नये आणि नेहमी जपून बोलावे हे कायम लक्षात ठेवा. गोडीगुलाबीने राहाल तर फायद्यात राहाल. शुभ रंग - आकाशी
 3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope: तब्येत जपा, घरातले ताजे सकस अन्न खा. व्यायाम करणे हिताचे. समोरच्याचे पूर्ण ऐकून नंतर बोला. व्यवहारी राहा आणि वास्तवाचे भान राखा, यातच हित आहे. शुभ रंग  - पोपटी
 4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope: प्रिय व्यक्तीच्या अडचणीवर मार्ग काढा. वाद टाळणे आणि गोड बोलून मार्ग काढणे हिताचे. कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही हे लक्षात ठेवा. सावध राहा. शब्द, वेळ, पैसा यांचे योग्य नियोजन करणे हिताचे. शुभ रंग - पांढरा
 5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope: व्यवहारात सावधगिरी महत्त्वाची. चुका टाळणे हिताचे. मौल्यवान असेल ते जपा. वाद टाळा, संयम राखा. कष्ट कराल तर यश तुमचेच आहे हे लक्षात ठेवा. नियोजन करुन कृती करा. शुभ रंग -  किरमिजी
 6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope: हुशारीने काम करणे महत्त्वाचे. पूर्ण माहिती घ्या नंतर कृती करा. पूर्वग्रहदूषित विचाराने वागू नका. नम्र राहा. वाद टाळा. वरिष्ठांची मर्जी राखा. जबाबदाऱ्या वाढल्या तर समर्थपणे सांभाळा. शुभ रंग - हिरवा
 7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope: क्षमता ओळखून वागणे हिताचे. हिशोबी राहणे लाभाचे. अयोग्य कृती टाळा. कायदा पाळा. व्यवहार करताना आणि बोलताना सावध राहा. शुभ रंग - निळा
 8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope: प्रवास यशस्वी होईल. हुशारीने प्रश्न सोडवू शकाल. व्यवहारी राहाल, मानापमान विसरुन कृती कराल तर गुंतागुंत सोडवाल. कायदा पाळणे, वाद टाळणे, संयम राखणे हिताचे. शुभ रंग - लाल
 9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope: आपल्याला घरासाठी योग्य तो वेळ द्यावा लागेल. आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. घडलेल्या गोष्टी आपल्या हातात नसतात त्यांचा विचार टाळा. बदल स्वीकारण्याची तयारी ठेवा. जागेच्या व्यवहारात वाद होणार नाहीत याची दक्षता घ्या. नात्यातील प्रेमळ धागा जपा. प्रवास यशस्वी होईल. शुभ रंग - सोनेरी
 10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope: आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न करा. गरजेपेक्षा जास्त वस्तू खरेदी करु नका. आपल्या कौटुंबिक कर्तव्यासाठी खर्चाची तयारी ठेवा. वाहवत जाऊ नका. वाद टाळून गोडीगुलाबीने वागणे हिताचे. शुभ रंग - राखाडी
 11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope: योग्य संधी साधण्यावर भर द्या. संवादातून गैरसमज दूर करण्यावर आणि वाद टाळण्यावर भर देणे हिताचे. नवे कौशल्य शिकून घेणे लाभाचे. सातत्य राखणे हिताचे. प्रवास यशस्वी होईल. शुभ रंग - राखाडी
 12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope: हिशोबी राहणे आणि नियोजन करुन कृती करणे हिताचे. वाद टाळणे लाभाचे. क्षमता ओळखून कृती करणे फायद्याचे. गोड बोला, इतरांना आदर द्या यातून लाभच होईल. शुभ रंग - सोनेरी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी