साप्ताहिक राशी भविष्य १६ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट: आठवड्यात 'या' राशीच्या व्यक्तींना नव्या संधी प्राप्त होतील

साप्ताहिक राशी भविष्य: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल हा आठवडा? जाणून घ्या या राशींचे भविष्य...

Weekly horoscope
साप्ताहिक राशी भविष्य 

थोडं पण कामाचं

  • पाहा साप्ताहिक राशी भविष्य 
  • १६ ऑगस्ट ते २२ ऑगस्टचं राशी भविष्य 
  • पाहा कोणत्या राशीसाठी हा आठवडा कसा 

साप्ताहिक राशी भविष्य 16 august to 22 august 2020: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी आजचा शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल हा आठवडा? 

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope: या आठवड्यात व्यवसायातील आपल्या महत्वाकांक्षी योजनांचा विस्तार होईल. बुधवारनंतरचा काळ नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी अनुकूल असेल. नोकरी बदलामध्ये तुम्हाला यश मिळेल. रविवारी आणि मंगळवारी अन्न दान करा. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope: या आठवड्यात टेक्निकल किंवा मॅनेजमेंट क्षेत्रातील व्यक्तींना नव्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. मंगळवारी श्रीगणेशाची पूजा करा. शुक्रवारी तांदूळ किंवा भात दान करा. या आठवड्यात राजकीय व्यक्तींना लाभ होईल. या आठवड्याचा शुभ रंग - पांढरा.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope: या आठवड्यात मंगळवार ते गुरुवारचा काळ शुभ आहे. या काळात कोणत्याही नव्या कार्याचा शुभारंभ करु शकता. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुरुवारी तुमच्यासाठी एक शुभ संधी चालून येईल. बुधवारी हिरव्या रंगाचे कापड दान करा. या आठवड्याचा शुभ रंग - हिरवा आणि निळा.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope: व्यवसायात नवी आणि सुवर्णसंधी प्राप्त होईल. धनलाभ होईल. विद्यार्थ्यांसाटी हा काळ खूप अनुकूल आहे. आरोग्य उत्तम असेल. गुरुवारी अन्नधान्य दान करा. मित्रांच्या सहकार्याने रखडलेले काम मार्गी लागेल. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा.
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope: एखाद्या निर्णयावरुन निर्माण झालेला वाद किंवा मतभेद या आठवड्यात संपुष्टात येईल. कुटुंब आणि मित्रांचे सहकार्य तुमच्यासोबत असेल. मंगळवारी नव्या कार्याचा शुभारंभ करु शकता. व्यवसायात नव्या संधी प्राप्त होईल. या आठवड्याचा शुभ रंग - लाल.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope: हा आठवडा नोकरी आणि व्यावसायात मोठे यश मिळवून देईल. मंगळवारनंतर आरोग्यातही सुधारणा होईल. या आठवड्यात घर बांधकामाशी संबंधित नवीन कामांना सुरुवात होईल. घऱात लवकरच शुभ कार्य होईल. या आठवड्याचा शुभ रंग - निळा.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope: रखडलेल्या प्रकल्प आणि व्यवसायाच्या संबंधित योजना सुरू करण्यासाठी हा आठवडा शुभ आहे. घरी धार्मिक कार्य होईल. दररोज सकाळी पूजा केल्यानंतर तांदूळ दान केल्यास पुण्य मिळेल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी खूपच चांगला असेल. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा आणि पांढरा.
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope: माध्यम आणि व्यवस्थापन क्षेत्रातील व्यक्ती नोकरी बदलण्याचा विचार करतील. नव्या संधी भविष्यात लाभदायक ठरतील. व्यवसायात चांगले यश प्राप्त होईल. रविवारी गहू दान करा. मंगळवारी गणपती बाप्पाची पूजा करा. या आठवड्याचा शुभ रंग - पांढरा आणि लाल.
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope: हा आठवडा तुमच्यासाठी आनंददायी असेल. बुधवारी व्यवसायातून मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. सोमवारनंतर रखडलेले सरकारी काम पूर्ण होईल. नव्या नोकरीची संधी प्राप्त होईल. वायफळ खर्च टाळा. आरोग्याची काळजी घ्या. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा.
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope: राजकीय क्षेत्रात यशस्वी होण्याची वेळ आली आहे. शनिवारी आरोग्याबाबत सतर्क रहावे लागेल. या आठवड्यात उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होऊ शकतात. नोकरीमधे सातत्याने होणारी प्रगती तुम्हाला आनंद देईल. या आठवड्याचा शुभ रंग - लाल आणि पिवळा.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope: या आठवड्यात तुम्ही अशा एखाद्या प्रोजेक्टवर काम कराल जे तुमचं स्वप्न आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. मंगळवारनंतर धनलाभ होण्याची शक्यता आहे. मित्रांच्या भेटी-गाठी होतील. या आठवड्याचा शुभ रंग - पांढरा आणि निळा.
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope: मित्रांच्या भेटी-गाठी होतील. नव्या ओळखी होतील आणि त्यामुळे नव्या संधीही प्राप्त होतील. आरोग्य उत्तम असेल. या आठवड्यात नव्या कार्याची सुरुवात करु शकता. श्री विष्णू, श्री गणेशाची पूजा करा. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी