साप्ताहिक राशी भविष्य १८ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर: पाहा नवरात्रोत्सवाचा हा आठवडा १२ राशींसाठी कसा 

साप्ताहिक राशी भविष्य: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल हा आठवडा? जाणून घ्या या राशींचे भविष्य...

Weekly horoscope
साप्ताहिक राशी भविष्य 

थोडं पण कामाचं

 • पाहा साप्ताहिक राशी भविष्य 
 • १८ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबरचं राशी भविष्य 
 • पाहा कोणत्या राशीसाठी हा आठवडा कसा 

साप्ताहिक राशी भविष्य 18 october to 24 october 2020: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी आजचा शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल हा आठवडा?

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope: या आठवड्यात विद्यार्थ्यांची प्रगती होईल. व्यवसायात उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होतील. मित्रांचे चांगले सहकार्य मिळेल. राजकीय व्यक्ती यशस्वी होतील. भगवान शिव शंकराची नियमित पूजा करा. मंगळवार आणि रविवारी गहू दान करा. आठवड्याचा शुभ रंग - पिवळा.
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope: या आठवड्यात नोकरीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. मंगळवार ते शुक्रवार या कालावधीत नवीन वाहने खरेदी करु शकता. गुरुवार नंतर व्यवसायात चांगला लाभ होईल. लवकरच नवीन व्यवसाय सुरू करण्याची संपूर्ण योजना आखाल. शुक्रवारी तांदूळ आणि साखर दान करा. आठवड्याचा शुभ रंग - पांढरा.
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope: बुधवारनंतर व्यवसायात लाभ होईल. नवा व्यवसाय सुरू करण्याची तुमची योजना लवकरच पूर्ण होईल. मित्र-परिवारांच्या भेटी गाठी होतील. आरोग्य चांगले राहील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आठवड्याचा शुभ रंग - हिरवा.
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope: या आठवड्यात तुम्ही मुलांच्या पुढील शिक्षणाच्या संबंधित योजना आखाल. नव्या नोकरीची संधी चालून येईल. गुरुवार, शुक्रवारी धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. शिक्षण आणि स्पर्धेत चांगले यश मिळेल. राजकीय व्यक्तींना आपल्या क्षेत्रात यश मिळेल. आठवड्याचा शुभ रंग - पिवळा.
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope: या आठवड्यात बऱ्याच दिवसांपासून रखडलेले मोठे कार्य पूर्ण होईल आणि त्याचा तुम्हाला लाभ होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना फायदा होऊ शकतो. दुर्गा मातेचं दर्शन घेऊन पूजा करा. नियमित उपासना करा. रविवारी, मंगळवारी अन्न दान करा. आठवड्याचा शुभ रंग - हिरवा.
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope: या आठवड्यात राजकारणी व्यक्ती यशस्वी होतील आणि राजकारणात तुमचा प्रभाव अधिक चांगला होईल. व्यवसायात धनलाभ होईल. वडिलांच्या आशीर्वादाचा फायदा होईल. तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. आठवड्याचा शुभ रंग - हिरवा आणि निळा.
 7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope: मंगळवारपर्यंत कुटुंबात तणावाचे वातारवण असू शकते. या आठवड्यात धनलाभ होईल. नोकरीत चांगली कामगिरीच्या जोरावर तुम्हाला प्रमोशन मिळेल आणि जबाबदारी वाढेल. विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. आठवड्याचा शुभ रंग - पांढरा.
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope: गुरुवारपर्यंत व्यवसायात चांगला फायदा होईल. या आठवड्यात आर्थिक प्रगतीमुळे तुम्हाला आनंद होईल. बुधवारनंतर वाहने खरेदी करता येईल. या आठवड्यात तुमचे अडकलेले पैसे मिळतील. शनिवारी तीळ, उडीद दान करा. आठवड्याचा शुभ रंग - केशरी.
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope: या आठवड्यात तुमच्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. नोकरीत प्रगती होईल, व्यवसायात धनलाभ होईल. या आठवड्यात मित्र-मैत्रिणींकडून चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आठवड्याचा शुभ रंग - लाल.
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope: मंगळवार आणि शुक्रवारी धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. शनिवारी तिळाचे दान करा. आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात आणि नोकरीत नव्या संधी उपलब्ध होतील. या आठवड्याचा शुभ रंग - निळा.
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope: मंगळवार नंतर रखडलेले काम मार्गी लागेल. बाहेरील खाद्य-पदार्थ खाणे टाळा. वायफळ खर्च टाळा. येणाऱ्या काळात तुम्हाला नवी जबाबदारी मिळेल. आरोग्य चांगले राहील. आठवड्याचा शुभ रंग - हिरवा आणि पांढरा.
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope: हा आठवडा तुमच्यासाठी खूपच अनुकूल आहे. आरोग्य चांगले राहील. मुलांच्या शिक्षणाच्या संबंधित कामे पूर्ण केली जातील. वाहन चालवताना काळजी घ्या. आठवड्याचा शुभ रंग - पांढरा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी