साप्ताहिक राशी भविष्य २ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट: पाहा हा आठवडा तुमच्यासाठी कसा

साप्ताहिक राशी भविष्य: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल हा आठवडा? जाणून घ्या या राशींचे भविष्य...

Horoscope
राशी भविष्य 

थोडं पण कामाचं

  • पाहा साप्ताहिक राशी भविष्य 
  • २ ऑगस्ट ते ८ ऑगस्टचं राशी भविष्य 
  • पाहा कोणत्या राशीसाठी हा आठवडा कसा 

साप्ताहिक राशी भविष्य 2 august to 8 august 2020: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी आजचा शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल हा आठवडा? 

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope: रविवारी आणि मंगळवारी तुमच्या कार्याचा विस्तार होईल. आत्मविश्वास वाढेल. या आठवड्यात सकारात्मक बदल जाणवेल. नव्या नोकरीची संधी चालून येईल. रविवारी गहू दान करा. मंगळवारनंतर धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या आठवड्याचा शुभ रंग - नारंगी आणि पांढरा.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope: विद्यार्थ्यांच्या अभ्यासात प्रगती दिसेल. आर्थिक परिस्थिती अधिक चांगली करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील व्हाल. या आठवड्यात नोकरीशी संबंधित एखादा मोठा निर्णय घ्याल. या आठवड्यात व्यवसायात चांगली वाढ होईल. अन्नदान करा. या आठवड्याचा शुभ रंग - हिरवा.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope: या आठवड्यात आपल्याला आरोग्याबद्दल खूप जागरूक रहावे लागेल. हा आठवडा तुमच्यासाठी शुभ संधी उपलब्ध करुन देईल. आठवड्याचे पहिले दोन दिवस तुम्हाला लाभदायक ठरतील. दररोज योग आणि ध्यान करत रहा. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा आणि पांढरा.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope: या आठवड्यात व्यवसायात चांगले यश मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळेल. वरिष्ठांच्या सहकार्याने हाती घेतलेलं काम वेळेत पूर्ण होईल. मित्रांची साथ मिळाल्याने नवा उद्योग सुरू करण्याच्या दिशेने पाऊल टाकाल. आरोग्याची काळजी घ्या. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा.
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope: या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास खूपच वाढेल. नोकरीत चांगले काम केल्याने वरिष्ठांकडून आणखी जबाबदारी देण्यात येईल. सोमवार नंतरचा काळ व्यवसायासाठी लाभदायक असेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. रविवारी आणि मंगळवारी गहू दान करा. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope: या आठवड्यात नवीन काम हाती घ्याल. मेष आणि मीन राशीच्या व्यक्तींकडून मिळणाऱ्या सहकार्याने नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार कराल. आरोग्य निरोगी असेल. अन्न दान करा. नोकरीत प्रगती होईल. या आठवड्याचा शुभ रंग - हिरवा.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope: हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी यश मिळवून देणारा असेल. हाती घेतलेलं काम पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. व्यवसायात आणि इतर रखडलेली कामे या आठवड्यात पूर्ण होतील. वरिष्ठांचे आशीर्वाद घ्या. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा आणि लाल.
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope: व्यवसायातील प्रलंबित कामे पूर्ण होतील. नोकरीत प्रगती होईल, पदोन्नती मिळेल. या आठवड्यात व्यवसायात चांगले यश मिळून धनलाभ होईल. आठवड्यात मंगळ आणि गुरू हे तुमचा आत्मविश्वास वाढवतील. रविवारी अन्नदान करा. या आठवड्याचा शुभ रंग - पांढरा आणि पिवळा.
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope: व्यवसात चांगले यश मिळेल आणि मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होतील. गरीबांना अन्न दान करा. शुक्रवारी चणे, गहू दान करा. मित्रांच्या मदतीने रखडलेलं काम पूर्ण होईल. या आठवड्याचा शुभ रंग - निळा आणि हिरवा.
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope: या आठवड्यात नोकरी आणि व्यवसायात संघर्ष करावा लागेल. बुधवारनंतर उत्पन्नाचे नवे स्त्रोत तयार होतील. शनिवारी काळ्या रंगाचे वस्त्र दान करा. नोकरी बदलण्याचा विचार मनात येईल. या आठवड्याचा शुभ रंग - निळा आणि हिरवा.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope: बुधवार आणि शनिवारी तुमच्या योजना, प्रकल्प यशस्वी होण्याच्या दिशेने मार्गस्थ होतील. संपत्ती मिळण्याच्या मार्गावर येणारे अडथळे दूर होतील. गरीबांना अन्न दान करा. वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या. आरोग्य निरोगी राहील. या आठवड्याचा शुभ रंग - हिरवा, लाल आणि निळा.
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope: हा आठवडा तुमच्यासाठी खूपच लाभदायक आणि यश मिळवून देणारा ठरेल. नोकरीच्या नव्या संधी चालून येतील. उद्योगात चांगला लाभ होईल. नवा उद्योग सुरू करण्यासाठी हालचाल कराल. गुरुवार आणि शनिवारी हरभरा, डाळ दान करा. या आठवड्याचा शुभ रंग - लाल, केशरी, पांढरा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी