weekly horoscope : साप्ताहिक राशीभविष्य : २ ते ८ जानेवारी २०२२

weekly rashi bhavishya 2 to 8 january 2022 weekly horoscope in marathi : साप्ताहिक राशी भविष्य: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा आठवडा? जाणून घ्या या राशींचे भविष्य...

weekly rashi bhavishya 2 to 8 january 2022 weekly horoscope in marathi
साप्ताहिक राशीभविष्य : २ ते ८ जानेवारी २०२२ 
थोडं पण कामाचं
  • साप्ताहिक राशीभविष्य : २ ते ८ जानेवारी २०२२
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आठवडा?
  • काय आहे आपले भविष्य?

weekly rashi bhavishya 2 to 8 january 2022 weekly horoscope in marathi । साप्ताहिक राशीभविष्य : २ ते ८ जानेवारी २०२२ :  हा आठवडा कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल हा आठवडा?

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope: सारासार विचार करणे आणि बुद्धीला पटेल ती कृती करणे हिताचे. शब्द जपून वापरणे फायद्याचे. कायदे पाळणे आणि तब्येत सांभाळणे लाभाचे. हा आठवडा बरा जाईल. शुभ रंग - नारिंगी
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope: माणसं ओळखणं हिताचं. व्यवहार चातुर्य दाखवावे लागेल. शब्द मोजूनमापून वापरणे फायद्याचे. झेपेल आणि जमेल तेवढेच करा. अवास्तव आश्वासन देणे टाळा.तब्येत सांभाळा. आठवडा बरा जाईल. शुभ रंग - पांढरा
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope: तब्येत जपा. संवाद साधा. प्रयत्नांती परमेश्वर हे लक्षात ठेवा. निराश होऊ नका. प्रयत्नांमध्ये सातत्य राखणे आवश्यक. प्रसंगी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आठवडा बरा जाईल. शुभ रंग - मोरपिशी
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope: अतिरेक टाळा. मस्करीची कुस्करी होणार नाही याची काळजी घ्या. बोलण्याआधी विचार करणे हिताचे. कोणालाही दुखवू नका. चांगले वागणे, चांगले बोलणे लाभाचे. आठवडा बरा जाईल. शुभ रंग - निळा
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope: नियोजन करणे या आठवड्यात लाभाचे. जपून बोला. आर्थिक बाबतीत सावध राहा. संयम राखा. अती घाई संकटाकडे नेई हे लक्षात ठेवा. आठवडा बरा जाईल. शुभ रंग - किरमिजी
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope: गोड बोलाल तर प्रगती कराल. ओळखीतल्यांची साथ लाभेल, अडचणी दूर होतील. वेळेचा सदुपयोग करणे आणि तब्येत सांभाळणे हिताचे. प्रवासात काळजी घ्या. आठवडा बरा जाईल. शुभ रंग - पोपटी
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope: शब्द, पैसा आणि वेळ जपून वापरणे. नियोजन करणे आणि वेळेचा सदुपयोग करणे हिताचे. वाद टाळणे, प्रसंगी मौन राखणे आणि संयमाने वागणे लाभाचे. आठवडा बरा जाईल. शुभ रंग - पांढरा
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope: आठवडा बरा जाईल. थांबला तो संपला हे लक्षात ठेवून वाटचाल सुरू ठेवा. प्रयत्न करणे महत्त्वाचे असते हे लक्षात ठेवा. रागावर नियंत्रण ठेवा. हातून धार्मिक कार्य घडेल. प्रवासात काळजी घ्या. नवे विचार स्वीकारणे फायद्याचे. शुभ रंग - नारिंगी
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope: आठवडा मजेत जाईल. चिंतामुक्त व्हाल. निःपक्षपाती राहणे हिताचे. गोड बोलाल तर प्रगती कराल. ओळखीतल्यांची साथ लाभेल. जमेल आणि झेपेल तेवढेच करा. शांतता आणि संयम लाभदायी ठरेल. निर्णय विचारपूर्वक करणे हिताचे. शुभ रंग - पिवळा
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope: हुशारीने वागाल. इतरांवर प्रभाव पाडाल. यशस्वी व्हाल. कायदा पाळा. प्रवास जपून करा. रागाला आवर घाला. तब्येतीला जपा. आठवडा बरा जाईल. शुभ रंग - तपकिरी
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope: आत्मनिर्भर बना. कौशल्य आत्मसात करा. प्रसंगी स्वतःचे कौशल्य वापरुन इतरांवर प्रभाव पाडाल. आठवडा चांगला जाईल. नियोजन करणे हिताचे. प्रवासात काळजी घ्या.  शुभ रंग - काळा
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope: आठवडा बरा जाईल. शब्द जपून वापरणे आणि नाती जपणे हिताचे. हुशारीने वागाल तर अडचणींमधून लवकर बाहेर पडाल.  शुभ रंग - सोनेरी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी