साप्ताहिक राशी भविष्य २ ते ८ मे : पाहा हा आठवडा १२ राशींसाठी कसा?

साप्ताहिक राशी भविष्य: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल हा आठवडा? जाणून घ्या या राशींचे भविष्य...

Weekly rashi bhavishya 2 to 8 May weekly horoscope in marathi
साप्ताहिक राशी भविष्य २ ते ८ मे 

थोडं पण कामाचं

 • साप्ताहिक राशी भविष्य २ ते ८ मे : पाहा हा आठवडा १२ राशींसाठी कसा?
 • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
 • काय आहे आपले भविष्य?

साप्ताहिक राशी भविष्य 2 to 13 May 2021: हा आठवडा कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल हा आठवडा?

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope: या आठवड्यात व्यवसायात चांगले यश आणि नफा होईल. नोकरीतही चांगली प्रगती दिसून येईल. नव्या नोकरीची संधी चालून येईल. वायफळ खर्च टाळा. वाहन चालवताना काळजी घ्या. या आठवड्याचा शुभ रंग - नारंगी आणि पांढरा.
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope: नोकरी संदर्भात वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या स्वप्नातील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न सुरू कराल. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. शनिवारी तिळ दान करा. या आठवड्याचा शुभ रंग - निळा आणि केशरी. 
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope: मंगळवार ते शुक्रवार हा व्यवसायासाठी उत्तम काळ आहे. या आठवड्यात उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार केले जातील. श्री गणेशाची पूजा करा. नोकरीत प्रगतीमुळे तुम्हाला आनंद होईल. या आठवड्याचा शुभ रंग - हिरवा.
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope: आरोग्याच्या दृष्टीकोनातून हा आठवडा थोडा त्रासदायक असेल. गुरुवार नंतर व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. बुधवार नंतर नोकरीत प्रगती दिसून येईल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळतील. मंगळवार नंतर सरकारी कामे पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करतील. या आठवड्याचा शुभ रंग - नारंगी, पिवळा.
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope: नोकरीच्या संदर्भात तुम्ही आनंदी असाल. व्यवसायात देखील यश मिळेल. रविवारी गुळ दान करा. श्री गणेशाची पूजा करा. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा आणि निळा. 
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope: या आठवडयात नोकरी संदर्भात तणावाची परिस्थिती उद्भवू शकते. व्यवसाय सुरळीत सुरू राहील. मंगळवार नंतर घर बांधण्याच्या संबंधित काम होईल. दररोज सकाळी पक्षांना दाणे, पाणी द्या. गुरुवार नंतरचा काळ तुमच्यासाठी खूपच चांगला आहे. या आठवड्याचा शुभ रंग - हिरवा.
 7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope: या आठवड्यात अनेक महत्वाच्या कामांना गती मिळेल. नोकरीत चांगले यश मिळेल. वरिष्ठांकडून चांगले मार्गदर्शन मिळेल. या आठवड्यात आरोग्य सुधारेल. व्यवसायाच्या संबंधित नवीन कामे या आठवड्यात सुरू होतील. विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या मार्गावरील अडथळे दूर होतील. या आठवड्याचा शुभ रंग - निळा आणि लाल.
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope: मंगळवार नंतर मुलाच्या विवाहाशी संबंधित असलेले अडथळे दूर होण्यास सुरूवात होईल. आरोग्य चांगले राहील. मोठ्या भावाच्या सहकार्याने व्यापारात मोठा धनलाभ होईल. दररोज अन्न दान करा. या आठवड्याचा शुभ रंग - पांढरा.
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope: हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध करुन देईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी आठवडा चांगला आहे. गुरुवार नंतर व्यवसायात चांगला फायदा होईल. आरोग्य चांगले राहील. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा आणि पांढरा.
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope: बुधवार नंतरचा काळ तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे. गुरुवारी व्यवसायात चांगली आणि मोठी संधी उपलब्ध होईल. मंगळवारी लाल वस्त्र किंवा अन्न दान करा. या आठवड्याचा शुभ रंग - हिरवा आणि पांढरा.
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope: या आठवड्यात नोकरीत नव्या जबाबदाऱ्या मिळतील. आरोग्याची काळजी घ्या. सोमवारी अन्न दान करा. व्यवसायात चांगला लाभ होईल. या आठवड्याचा शुभ रंग - निळा.
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope: या आठवड्यात तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही पाहिलेल्या स्वप्नांना पूर्ण करण्याकडे कल राहील. मंगळवारी व्यवसायाची परिस्थिती अनुकूल राहील. नोकरीत चांगले यश मिळेल. संपत्तीचा विस्तार होण्याची शक्यता आहे. अन्न दान करा. या आठवड्याचा शुभ रंग - लाल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी