साप्ताहिक राशी भविष्य २१ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी: पाहा या महिन्यातील शेवटचा आठवडा १२ राशींसाठी कसा

साप्ताहिक राशी भविष्य: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल हा आठवडा? जाणून घ्या या राशींचे भविष्य...

Horoscope
साप्ताहिक राशी भविष्य 

थोडं पण कामाचं

 • पाहा साप्ताहिक राशी भविष्य 
 • २१ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारीचं राशी भविष्य
 • पाहा कोणत्या राशीसाठी हा आठवडा कसा 

साप्ताहिक राशी भविष्य 21 February to 27 February 2021: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी आजचा शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल हा आठवडा?

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope: गुरू आणि मंगळ अनुकूल आहेत. बुधवार ते शनिवार हा काळ तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. मंगळवारी नव्या कार्याचा शुभारंभ करु शकतात. व्यवसायाच्या संबंधित रखडलेले काम मार्गी लागेल. या आठवड्याचा शुभ रंग -  पिवळा, निळा आणि लाल.
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope: विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा यशस्वी ठरेल. बुधवार ते शनिवार या काळात व्यवसायात धनलाभ होईल. रखडलेले काम मार्गी लागेल. अन्न दान करा. शनिवारी आरोग्याची काळजी घ्या. या आठवड्याचा शुभ रंग - पांढरा आणि निळा. 
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope: बुधवार नंतर व्यवसायात कोणत्याही नव्या कामाचा शुभारंभ करु शकता. राजकीय व्यक्तींना कामात यश मिळेल. विद्यार्थी प्रगती करतील. स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी यशस्वी होतील. गुरुवारी हरभरा डाळीचे दान करा. या आठवड्याचा शुभ रंग -  हिरवा आणि नारंगी.
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope: शनि, बुध आणि चंद्र यांचे संक्रमण व्यवसायासाठी अनुकूल आहे. अनेक रखडलेली कामे मार्गी लागतील. मंगळवारनंतर व्यवसायात पैशाचे आगमन होईल आणि त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. गुरुवार ते शनिवार या दरम्यान प्रवासाची शक्यता आहे. या आठवड्याचा शुभ रंग -  केशरी आणि लाल.
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope: मंगळवारपर्यंत कामात अडथळा येण्याची शक्यता आहे. बुधवार नंतरचा काळ तुमच्यासाठी उत्तम असेल. मंगळवार ते शुक्रवार या काळात नवीन वाहने खरेदी करता येतील. या आठवड्याचा शुभ रंग -  नारंगी.
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope: नोकरीच्या संदर्भात थोडा ताणतणाव असेल. बुधवारनंतर शुक्र आणि चंद्र व्यवसायात लाभ देतील. बुधवार ते शनिवार हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला आहे. श्री विष्णूजींची उपासना करत रहा धनलाभ होण्याची शक्यता आहे. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा आणि केशरी.
 7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope: मंगळवारनंतर तुम्हाला यश प्राप्त होईल आणि धनलाभ होईल. व्यवसायाच्या दृष्टीने बुधवारनंतरचा काळ लाभदायक असणार आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. अन्न, कपडे दान करा. या आठवड्याचा शुभ रंग -  पांढरा आणि हिरवा.
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope: हा आठवडा थोडासा संघर्षमय असणार आहे. व्यवसायात गुरुवारनंतर यश प्राप्त होईल. आरोग्याबाबत जागरूक रहावे लागेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. श्री लक्ष्मीमातेची पूजा करा. धनलाभ होण्याची शक्यता आहे. या आठवड्याचा शुभ रंग -  लाल.
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope: या आठवड्यात घर बांधकामाशी संबंधित कामे हाती घ्याल. बुधवार ते शनिवार या काळात नोकरी, कामाधंद्यात व्यस्त असाल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठी होतील. या आठवड्याचा शुभ रंग -  पिवळा आणि पांढरा.
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope: नोकरीत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. व्यवसायाच्या संदर्भात कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी ही वेळ योग्य आहे. आई-वडिलांच्या आशीर्वादाने प्रगती होईल. श्री गणेशाची पूजा करा. या आठवड्याचा शुभ रंग - हिरवा आणि निळा.
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope: या आठवड्यात नवीन वाहन खरेदी कराल. बुधवार नंतर व्यवसायात प्रगती आणि धनलाभ होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना आपल्या कार्यात यश मिळेल. मंगळवारी आणि रविवारी अन्न दान करा. या आठवड्याचा शुभ रंग -  निळा आणि पांढरा.
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope: या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल. आरोग्य चांगले राहील. व्यवसायात चांगली प्रगती होईल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत उपलब्ध होतील. नियमितपणे पूजा-अर्चा करा. मित्रांच्या सहकार्याने नवीन योजना, प्रकल्प सुरू कराल. या आठवड्याचा शुभ रंग -  पिवळा आणि लाल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी